मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

एप्रिल, २०२६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या; पतीसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

इंदापूर (पुणे ग्रामीण): [असिफभाई शेख यांचेकडन ] इंदापूर तालुक्यातील वरकुटे बुद्रुक येथे सासरच्या छळाला कंटाळून एका १९ वर्षीय विवाहितेने गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी इंदापूर पोलिसांनी पती, दीर आणि सासू अशा तिघांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शिवानी विकास शिंदे (वय १९ वर्षे ७ महिने) असे मृत विवाहितेचे नाव आहे. शिवानीचा विवाह मे २०२५ मध्ये वरकुटे बुद्रुक येथील विकास अजिनाथ शिंदे याच्याशी झाला होता. लग्नानंतर सुरुवातीचे काही महिने सर्व काही सुरळीत होते. मात्र, त्यानंतर पती विकास, दीर प्रकाश आणि सासू सुरेखा शिंदे यांनी शिवानीच्या चारित्र्यावर संशय घेण्यास सुरुवात केली.फिर्यादीत नमूद केल्यानुसार, आरोपी तिला नेहमी फोनवर कोणाशी बोलते, यावरून टोचून बोलत असत. तसेच, वॉटर फिल्टर प्लांट टाकण्यासाठी माहेरून २ लाख रुपये घेऊन ये, अशी मागणी करत तिचा शारीरिक आणि मानसिक छळ केला जात होता. या जाचाला कंटाळून शिवानीने सोमवार, २७ एप्रिल २०२६ रोजी दुपारी सव्वा दोनच्या सुमारास राहत्या घरी गळफास घेऊन ...

उजणीच्या कुशीत 'वाळू'माफियांचा बाजार; प्रशासनाच्या डोळ्यावर 'गांधीजी,पण जातीयवाद बोकाळणार, मोठ्या रक्तापाताची प्रतीक्षा ? मुडदे पडतील याला जबाबदार कोण.?

इंदापूर | विशेष प्रतिनिधी उजणी धरण म्हणजे सोलापूर आणि पुण्याची जीवनवाहिनी. पण सध्या ही जीवनवाहिनी वाळू चोरांसाठी 'सोन्याची अंडी देणारी कोंबडी' ठरत आहे. प्रशासकीय यंत्रणेने डोळ्यावर गांधी वादाची पट्टी बांधली आहे की काय, असा सवाल आता सामान्य जनता विचारू लागली आहे. इंदापूर तालुक्यातील बॅकवॉटरच्या गावांमध्ये सध्या जो नंगानाच सुरू आहे, तो पाहता येथे ' खाकी'चा धाक उरलाय की 'खादी'च्या आशीर्वादाने हे दुकान सुरू आहे , हे शोधण्याची वेळ आली आहे. वाळू उपसा हा केवळ पर्यावरणाचा ऱ्हास नाही, तर तो आता सामाजिक शांततेसाठी 'कॅन्सर' ठरू लागला आहे. या अवैध व्यवसायातून जातीयवादाचे विष पेरले जात असून, वर्चस्ववादातून मोठा रक्तापात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या संपूर्ण खेळात 'झारीतील शुक्राचार्य' नेमके कोण आहेत? हे शुक्राचार्य एसी केबिनमध्ये बसून वसुलीचे आकडे मोजत आहेत की बांधावर उभे राहून मलिदा खात आहेत, याचा शोध घेण्याचे आव्हान पुणे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांसमोर आहे.असे म्हणतात की 'पैसा फेकला की तमाशा दिसतो', पण इथे पैसा फे...

गायीला 'राज्यमाता' दर्जा द्या; इंदापुरात तहसीलदारांना निवेदनराधाई रुक्मिणी गोशाळा ट्रस्टची मागणी; 'गो सन्मान आवाहन अभियाना'तंर्गत प्रशासनाला साकडे.

इंदापूर :संपूर्ण भारतात राबविल्या जाणाऱ्या 'गो सन्मान आवाहन अभियाना'च्या पार्श्वभूमीवर, इंदापूर तालुक्यातील हिंगणगाव येथील **राधाई रुक्मिणी गोशाळा ट्रस्ट**च्या वतीने विविध मागण्यांचे निवेदन आज इंदापूरचे तहसीलदार यांना देण्यात आले. गायीला 'राज्यमाता' आणि 'राष्ट्रधरोहर' असा दर्जा देण्यात यावा, ही या निवेदनाची प्रमुख मागणी आहे. २७ एप्रिल हा दिवस 'गो सन्मान दिवस'** म्हणून साजरा करत असताना, देशभरातील गोप्रेमी आपल्या स्थानिक महसूल कार्यालयामार्फत देशाचे राष्ट्रपती, पंतप्रधान, राज्याचे राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांना आपले गाऱ्हाणे मांडत आहेत. याच अनुषंगाने हिंगणगाव येथील गोशाळेचे संस्थापक अध्यक्ष **श्री. नितीन मारुती आरडे पाटील** यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन सादर करण्यात आले.  गो सेवागायींच्या संगोपन, संवर्धन आणि संशोधनासाठी गोशाळांना आवश्यक तो शासकीय निधी आणि अनुदान उपलब्ध करून द्यावे.  गो सुरक्षा, संपूर्ण देशभरात गोहत्या पूर्णपणे बंद करण्यासाठी कठोर आणि एकसमान केंद्रीय कायदा तातडीने लागू करावा. गो सन्मान गायीला केवळ प्राणी न मानता तिला 'राज्...

उजनीतून भीमा नदीत पाणी सोडले ; नागरिकांनी हर्षवर्धन पाटील यांचे मानले आभार!

इंदापूर : उजनी धरणातून भीमा नदीमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी शुक्रवार (दि. 24) पासून पाणी सोडण्यात आले आहे. भीमा नदी पात्रामध्ये पाणी सोडणेसाठी सतत वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा केलेबद्दल राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे नदीकाठच्या गावांमधील नागरिकांनी निरा भिमा कारखान्यावरती शनिवारी (दि. 25) भेट घेऊन सहकार्याबद्दल आभार व्यक्त केले.        सध्या उजनी धरणाच्या पावर हाऊस मधून 1600 क्युसेक्स व दरवाजामधून 4000 क्युसेक्स याप्रमाणे एकूण 6000 क्युसेक्स या क्षमतेने भीमा नदीच्या पात्रात पाणी सोडले जात आहे. इंदापूर व माढा तालुक्यातील नदीकाठच्या गावांमधील नागरिक, ग्रामपंचायतींचे सरपंच, पाणीपुरवठा संस्थांचे पदाधिकारी आदींनी हर्षवर्धन पाटील यांची भेट घेत नदीत पाणी सोडण्यासाठी महत्वाची भूमिका पार पडलेबद्दल आभार व्यक्त केले.    भीमा नदीकाठच्या गावांमधील व नदी पात्रातील पात्रातील पाण्यावरती अवलंबून असणाऱ्या पिण्याच्या पाणीपुरवठा योजनांसाठी त्याचबरोबर जनावरांना पिण्यासाठी पाणी सोडण्यात येत आहे. पाणी काटकसरी...

इंदापुरात गुंजणार 'संघर्ष योद्धा'चा आवाज; मनोज जरांगे पाटील २४ एप्रिलला येणार!

इंदापूर: मराठा आरक्षणाच्या लढ्यातील अग्रगण्य नेतृत्व आणि 'संघर्ष योद्धा' म्हणून ओळखले जाणारे **मा. श्री. मनोज दादा जरांगे पाटील** हे येत्या **शुक्रवारी, २४ एप्रिल २०२६** रोजी इंदापूर शहरात येत आहेत. त्यांच्या या दौऱ्यामुळे इंदापूर तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मनोज जरांगे पाटील हे समाजातील नागरिकांशी संवाद साधण्यासाठी आणि प्रत्यक्ष गाठीभेटी घेण्यासाठी इंदापूर दौऱ्यावर येत आहेत. या कार्यक्रमाचे नियोजन भव्य स्वरूपात करण्यात आले असून, इंदापूर तालुक्यातील सर्व समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. शुक्रवार, २४ एप्रिल २०२६,सकाळी ठीक १०:०० वाजता,गुरुकृपा सांस्कृतिक भवन, राहुल सिनेमा शेजारी, इंदापूर.येथे या संवाद मेळाव्याच्या माध्यमातून जरांगे पाटील आरक्षणाच्या लढ्याची पुढील दिशा आणि समाजापुढील आव्हाने यावर भाष्य करण्याची शक्यता आहे. "चलो इंदापूर" असा नारा देत या सभेची तयारी सध्या जोरात सुरू आहे. प्रशासनाकडूनही या पार्श्वभूमीवर योग्य ती खबरदारी घेतली जात असून, जनसमुदाया...

माथाडी कामगार संघटनेच्या अध्यक्षपदी उषा कोपुलवार

वाल्हे प्रतिनिधी - सिकंदर नदाफ राष्ट्रवादी माथाडी व जनरल कामगार युनियनच्या पिंपरी चिंचवड शहराध्यक्षपदी उषा श्रीकांत कोपुलवार यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.यावेळी संघटनेचे अध्यक्ष उमेश पाटील यांनी पत्राद्वारे सदरची निवड जाहीर केली असून या निवडीमुळे कामगार चळवळीला नव्याने बळ मिळणार असल्याची भावना सर्वसामान्य वर्गामधून व्यक्त केली जात आहे. पिंपरी चिंचवड शहरात गेल्या अनेक वर्षांपासून उषा कोपुलवार यांनी सामाजिक तसेच राजकीय क्षेत्रात देखील आपल्या नावाचा आगळा वेगळा ठसा उमटविला होता. त्यांच्या कार्याची दखल घेऊनच राष्ट्रवादी माथाडी व जनरल कामगार युनियनच्या पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष पदाची जवाबदारी त्यांना देण्यात आली असल्याची माहिती संघटनेचे महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष उमेश पाटील तसेच कार्याध्यक्ष महेश पाटील व सरचिटणीस प्रसाद तनपुरे यांनी दिली. तर या निवडीबद्दल सामाजिक कार्यकर्ते मनोज साळवे राकेश वाघमारे अतुल चव्हाण रवी शिंगे गणेश गायकवाड विजय राठोड राजन नायर स्वाती शिंगे आरपीआयचे अध्यक्ष शैलेंद्र भोसले यांसह विविध सामाजिक संघटनेच्या वतीने उषा कोपुलवार यांचा विशेष सत्कार देखील क...

एल निनो'च्या पार्श्वभूमीवर पशुसंवर्धन विभाग सज्ज-*डॉ. किरण पाटील

* पशुधनाच्या सुरक्षिततेसाठी नियोजन व अंमबजावणीचे मार्गदर्शक तत्वे जारी * पुणे, दि. २२: राज्यात वाढत्या तापमानाची शक्यता व उष्णलहरींचा धोका लक्षात घेता, पशुसंवर्धन विभागाने राज्यातील पशुपालक, कुक्कुटपालक व्यावसायिकांसाठी मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली आहेत. वाढत्या उष्णतेमुळे पशुधनावर होणारे विपरीत परिणाम टाळण्यासाठी विभागाने सर्व पशुवैद्यकीय संस्थांना सतर्क राहण्याचे आदेश दिले असून, पशुपालकांनी विशेष दक्षता घेण्याचे आवाहन केले आहे. उष्णलहरींच्या काळात पशुधनाची कशी काळजी घ्यावी व याबाबत क्षेत्रिय स्तरावर काय जनजागृती करण्यात यावी, याबाबत पशुसंवर्धन विभागाने मार्गदर्शक सूचनांच्या माध्यमातून अधिनस्त संस्थाप्रमुखांना अवगत केले  आहे. तसेच पशुपालकांना मार्गदर्शक सूचनांच्या माध्यमातून पशुधनाची काळजी घेण्याबाबत आवाहन केले आहे. यामध्ये, पशुधनाला पुरेसे स्वच्छ आणि थंड पिण्याचे पाणी उपलब्ध करून द्यावे. आहारात क्षार मिश्रणे व जीवनसत्वांचा समावेश करावा. दुभत्या जनावरांना संतुलित आहार द्यावा.  शेतीच्या किंवा वहनाच्या कामासाठी वापरल्या जाणाऱ्या पशुधनाला सकाळी ११ ते साय...

भलतंच अंतर..! शाळेपासून घर फक्त ३४ सेंटीमीटर..? आरटीई प्रवेशाच्या 'घोटाळा एक्स्प्रेस'चा पर्दाफाश..! - सौ.अनिताताई खरात

इंदापूर:  गरिबांच्या मुलांच्या हक्काच्या आरटीई (RTE) प्रवेशावर यंदा श्रीमंतांनी आणि काही 'जुगाडू' पालकांनी डल्ला मारल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शाळेपासून घर लांब असूनही चक्क ३४ सेंटीमीटर, ३७ सेंटीमीटर आणि ४७ सेंटीमीटर एवढ्या "नगण्य" अंतरावर घर असल्याचे दाखवून अनेकांनी प्रवेश लाटले आहेत. आता प्रश्न असा पडला आहे की, हे विद्यार्थी शाळेच्या आवारातच राहतात की काय?  सेंटीमीटरचा अजब खेळ शाळेपासून घराचे अंतर किमीमध्ये असण्याऐवजी चक्क काही सेंटीमीटर दाखवून गुपचूप प्रवेश निश्चित करण्यात आले आहेत. ३४ सेंटीमीटर म्हणजे एका फुटापेक्षा थोडे जास्त! इतक्या अंतरावर घर असू शकते का? असा सवाल तेजपृथ्वी (फाउंडेशन) ग्रुप'ने उपस्थित केला आहे.   अनेक धनदांडग्यांनी आणि राजकारण्यांनी पैशांच्या जोरावर शाळेच्या जवळ राहणाऱ्या लोकांच्या नावे खोटे भाडेकरार (Rent Agreement) बनवून घेतले आहेत. विशेष म्हणजे, हे करार शाळा सुटल्यानंतरच्या तारखेचे असल्याचेही पत्रात म्हटले आहे. आरटीईचा मूळ उद्देश आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील मुलांना शिक्षण देणे हा आहे. मात्र, इथे २५-३० किमी लांब र...

डोंबिवली स्थानकात लोकल ट्रेनचा डब्बा रुळावरुन घसरला

मुंबई प्रतिनिधी: (सतिश पाटील )डोंबिवलीमध्ये लोकल ट्रेनचा डबा रुळावरुन घसरल्याने मध्य रेल्वेची वाहतूक खोळंबली, आठवड्याच्या पहिल्याच दिवशी प्रवाशांचे हाल डोंबिवली स्थानकात रिकाम्या लोकलचा डबा रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले आहे. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी मुंबईकरांचे हाल झाले असून कल्याण ते सीएसएमटी एसी लोकलवरही टांगती तलवार  ठाणे: मुंबईची जीवनवाहिनी मानली जाणारी लोकल सेवा आठवड्याच्या पहिल्याच दिवशी आज सोमवारी विस्कळीत झाली आहे. डोंबिवली स्थानकात लोकलचा एक डबा रुळावरून घसरल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याचा मोठा फटका मध्य रेल्वेच्या वाहतुकीला बसला आहे. विशेषतः कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या धिम्या मार्गावरील वाहतूक सध्या ठप्प झाली असून, कामावर निघण्यासाठी घराबाहेर पडलेल्या चाकरमान्यांचे प्रचंड हाल होत आहेत. कालही फलाट बंद होते कोपर आणि ठाकुर्ली स्थानकातील धीम्या मार्गावरील वाहतूक रविवारी फलाट रुंदीकरणासाठी बंद ठेवण्यात आल्याने प्रवाशांचे हाल झाले असताना आठवड्याचा पहिलाच दिवस रेल्वे प्रवाशासाठी डोकेदुखीचा ठरला. सकाळी ८.३० वाजताची कल्याणच्या दिश...

इंदापुरात 'डॉ. तांबिले आयकेअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल'चे आज भव्य उद्घाटन; बड्या नेत्यांची मांदियाळी.

इंदापूर शहराच्या आरोग्य सेवेत मोठी भर पडत असून, 'डॉ. तांबिले आयकेअर सुपर स्पेशालिटी आय अँड डेंटल हॉस्पिटल'चा भव्य उद्घाटन समारंभ आज, रविवार दि. १९ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ६:०० वाजता संपन्न होत आहे. या सोहळ्यासाठी महाराष्ट्र राज्यातील दिग्गज राजकीय नेते आणि वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.या कार्यक्रमाचे   उद्घाटक मा. श्री. विजयसिंह मोहिते-पाटील (माजी उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य).अध्यक्ष: डॉ. एम. के. इनामदार सर (सीनियर कार्डिओलॉजिस्ट, अकलूज).प्रमुख पाहुणे: मा. ना. श्री. दत्तात्रय (मामा) भरणे (कृषी मंत्री, महाराष्ट्र राज्य).मा. श्री. हर्षवर्धनजी पाटील (अध्यक्ष, राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ).  मा. खा. श्री. धैर्यशील मोहिते-पाटील (खासदार, माढा लोकसभा) या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून श्री. प्रदीपदादा गारटकर (ज्येष्ठ नेते, भाजपा), श्री. भरतभाऊ शहा (नगराध्यक्ष, इंदापूर नगरपरिषद) आणि श्री. प्रवीणभैय्या माने (युवा नेते, भाजपा) उपस्थित राहणार आहेत. तसेच वैद्यकीय क्षेत्रातील डॉ. संतोष कुलकर्णी, डॉ. अनिल शिर्के आणि डॉ. संजय सिद यांसारख...

श्री.रणछोडदास कल्याणदास शहा विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन व बक्षीस वितरण सोहळा उत्साहात संपन्न

इंदापूर शहर विकास प्रतिष्ठान संचलित, श्री. रणछोडदास कल्याणदास शहा विद्यालय येथे वार्षिक स्नेहसंमेलन आणि बक्षीस वितरण समारंभ अत्यंत दिमाखात पार पडला. जल्लोष चिमुकल्यांचा, आविष्कार कलागुणांचा'या संकल्पनेवर आधारित या कार्यक्रमाने उपस्थितांची मने जिंकली. कार्यक्रमाचे उद्घाटन मा. डॉ. अविनाश पाणबुडे आणि प्राचार्य जीवन सरवदे यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आले. विद्यार्थ्यांनी नृत्य, संगीत आणि नाटिकांच्या माध्यमातून विविध कलागुणांचे सादरीकरण केले. चिमुकल्यांनी आपल्या सादरीकरणातून महत्त्वाचे सामाजिक संदेश दिले. शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मधील क्रीडा, कला आणि शैक्षणिक क्षेत्रात विशेष प्राविण्य मिळवणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात आले.  या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन इंदापूर शहर विकास प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष ॲड. गिरीश शहा यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. या सोहळ्याला अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावून विद्यार्थ्यांचे कौतुक केले:प्राचार्य जीवन सरवदे (अध्यक्ष, आय कॉलेज), ॲड. गिरीश शहा...

'जिम' तोडली पण 'पट्या' नडला! इंदापूरच्या अधिकाऱ्यांच्या 'फिल्डिंग'समोर गावकऱ्यांची 'बॅटिंग'; जिल्हा परिषदेत उपोषणाचा धडाका!

जिममध्ये घाम गाळण्याऐवजी आता जिल्हा परिषदेच्या दारात उपोषणाचा 'परफॉर्मन्स'! इंदापूर १४ व्या वित्त आयोगातून उभारलेली गावाची हक्काची 'ओपन जिम' एका रात्रीत जेसीबी लावून भुईसपाट केली आणि आता त्या भ्रष्ट अधिकाऱ्यांना पाठीशी घालणाऱ्यांच्या विरोधात गावकऱ्यांनी पुणे जिल्हा परिषदेसमोर ठिय्या मांडला आहे. काळठण नंबर १ मध्ये नागरिकांच्या आरोग्यासाठी सुमारे २.६३ लाखांची ओपन जिम बसवण्यात आली होती. पण जिल्हा परिषद शाळेच्या नवीन बांधकामाचे 'वस्त्रहरण' होऊ नये म्हणून की काय, कनिष्ठ अभियंता वसंत शेंडे यांनी कोणालाही न सांगता, परस्पर जेसीबी लावून या जिमचा 'चक्काचूर' केला.चौकशीवर दबाव येऊ नये म्हणून बी.डी.ओ. सचिन खुडे आणि कनिष्ठ अभियंता शेंडे यांना तात्काळ सक्तीच्या रजेवर पाठवण्याची मागणी.कारवाई टाळण्यासाठी मोठी 'आर्थिक देवाणघेवाण' झाली असावी, असा गावकऱ्यांचा थेट संशय.लाखो रुपयांची सरकारी मालमत्ता जेसीबीने उद्ध्वस्त केल्याचा आरोप. या प्रकरणात फक्त शेंडे साहेबच नाहीत, तर त्यांना 'कव्हर' देणाऱ्यांची फौज मोठी आहे. कनिष्ठ अभियंत्यापासून ते गटविकास अध...

*राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार युवा पिढीने नवनवीन कौशल्य आत्मसात करावे- माजी मंत्री हर्षवर्धन पाटील*

 इंदापूर  तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयाचा वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा महाविद्यालयाच्या शाहीर अमर शेख सभागृहामध्ये पार पडला यावेळी बोलताना राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष, माजी मंत्री व संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी वरील मत व्यक्त केले. यावेळी पिंपरी चिंचवड विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संतोष सोनवणे उपस्थित होते.     हर्षवर्धन पाटील म्हणाले की,' नवीन शैक्षणिक धोरणामुळे शिक्षण क्षेत्रात अमुलाग्र बदल झाले असून विद्यार्थ्यांनी नवनवीन कौशल्य आत्मसात केली पाहिजे. विविध भाषा, तंत्रज्ञान आणि संशोधन वृत्ती जोपासणे आवश्यक आहे.      कुलगुरू डॉ. संतोष सोनवणे म्हणाले की,' आजच्या स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांसाठी मोठ्या संधी उपलब्ध आहेत. बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या गरजा ओळखून कौशल्यधिष्ठित विद्यार्थी होण्यासाठी आपण प्रयत्नशील राहिले पाहिजे. माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या माध्यमातून पिंपरी चिंचवड विद्यापीठ विद्यार्थ्यांना जागतिक संधी उपलब्ध करून देत आहे.एआय भीती नसून ती एक स...

उजणीच्या कुशीत 'काळ्या सोन्याचा' मांडलाय बाजार: प्रशासनाच्या डोळ्यावर पट्टी,जातीयवादी पणा, की मोठ्या रक्तापाताची प्रतीक्षा? आ.दत्तात्रय भरणे तालुक्यात लक्ष घाला,

इंदापूर उजणी धरणाचे पात्र सध्या शेतीसाठी पाणी नाही, तर वाळू माफियांसाठी 'सोन्याची खाण' बनले आहे. रात्रंदिवस धरणाच्या छाताडावर यंत्रे चालवून वाळूची चोरी सुरू असताना, याकडे जाणीवपूर्वक डोळेझाक करणाऱ्या नालायक' आणि 'लाचखोर' यंत्रणेला आता जनतेच्या संतापाचा सामना करावा लागणार आहे.  आज ज्या हातांनी कायद्याचे रक्षण करायचे, तेच हात जेव्हा वाळू माफियांकडून 'हप्ते' घेण्यासाठी पुढे सरसावतात, तेव्हा या व्यवस्थेची लक्तरे वेशीवर टांगली जातात. या हप्तेखोर अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना एक प्रश्न विचारण्याची वेळ आली आहे ,  ज्या पैशांनी तुम्ही तुमच्या मुलांची स्वप्ने सजवत आहात, तो पैसा उजणीच्या काळजाला पडलेल्या जखमांचा आहे. निसर्गाचा हा ऱ्हास उद्या तुमच्याच लेकराबाळांच्या तोंडचे पाणी पळवल्याशिवाय राहणार नाही. भ्रष्टाचाराच्या पैशाने माजलेली ही श्रीमंती उद्याच्या वाळवंटाची नांदी आहे, याचे भान या 'लाज गहाण' ठेवलेल्या लोकांना राहिलेले नाही..!  नेत्यांनो लक्ष घाला, अन्यथा परिस्थिती हाताबाहेर जाईल .! तालुक्यातील राजकीय धुरंधर आणि वजनदार नेते कृषीमंत्री. दत्तात्...

महापुरुषांच्या विचारांची जयंती साजरी व्हावी -प्रा. दुर्गाडे

वाल्हे प्रतिनिधी- सिकंदर नदाफ देशात वेगवेगळे धर्म, जाती,पोटजाती असून अनेक भाषा बोलल्या जातात तसेच सण उत्सव देखील गुण्यागोविंदाने साजरे केले जातात परंतु या सर्वांना एकत्र जोडण्याचे काम महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानामुळे शक्य झाले आहे महापुरुषांनी केलेले महान कार्यआजच्या पिढीपर्यंत पोहचण्यासाठी महापुरुषांची जयंती डीजेच्या तालावर नव्हे तर त्यांचे विचार वाचून साजरी करायला हवी असे मत पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष प्रा.दिगंबर दुर्गाडे यांनी व्यक्त केले. वाल्हे ( ता. पुरंदर ) येथील सिद्धार्थ नगरमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी आयोजित कार्यक्रमात प्रा. दिगंबर दुर्गाडे हे बोलत होते.ते पुढे म्हणाले छत्रपती शिवाजी महाराज क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अतुलनीय कार्याची व त्याच्या प्रगल्भ विचारांची पारदर्शक माहिती आजच्या पिढीला असणे तितकेच गरजेचे आहे . या प्रसंगी वाल्हे गावचे सरपंच अतुल गायकवाड जिल्हा परिषदेच्या सदस्या प्राजक्ता दुर्गाडे उपसरपंच सागर भुजबळ आरपीआयचे अध्यक्ष शै...

इंदापूरच्या कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयात आज वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात संपन्न होणार

इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या **कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयात** शैक्षणिक वर्ष २०२५-२६ चा भव्य **वार्षिक पारितोषिक वितरण आणि वार्षिक क्रीडा व गुणवत्ता पारितोषिक वितरण समारंभ** आज, गुरुवार दि. १६ एप्रिल २०२६ रोजी आयोजित करण्यात आला आहे. हा सोहळा पिंपरी चिंचवड विद्यापीठाचे कुलगुरू मा. डॉ. संतोष सोनवणे** यांच्या शुभहस्ते संपन्न होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष **मा. श्री. हर्षवर्धनजी पाटील** राहणार आहेत. याप्रसंगी मंडळाचे सचिव मा. श्री. अॅड. मनोहर चौधरी आणि विश्वस्त मा. राजवर्धनदादा पाटील यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.दिनांक: गुरुवार, १६ एप्रिल २०२६ सकाळी ठीक १०:०० वाजता,शाहीर अमर शेख सभागृह, कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय, इंदापूर. या कार्यक्रमात वर्षाभरात विविध क्रीडा स्पर्धांमध्ये नैपुण्य मिळवलेल्या खेळाडूंचा आणि शैक्षणिक क्षेत्रात विशेष गुणवत्ता प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात येणार आहे. या सोहळ्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जीवन सरवदे, उपप्राचार्य प्रा. दत्तात्रय गोळे, क्री...

प्रकाश भोईटे यांनी ग्रामीण पत्रकारितेला ओळख दिली - हर्षवर्धन पाटील

इंदापूर :प्रतिनिधी  जेष्ठ पत्रकार प्रकाश भोईटे यांनी सन 1990 च्या दशकामध्ये ग्रामीण पत्रकारितेला ओळख निर्माण करून दिली, त्याचबरोबर ग्रामीण पत्रकारितेचा दर्जाही उंचावला. तसेच त्यांनी ग्रामीण पत्रकारितेला महत्त्व प्राप्त करून दिले. प्रकाश भोईटे यांच्या निधनाने पत्रकारिता क्षेत्रातील माझा मित्र हरपला आहे, या शब्दात राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली.          पुणे श्रमिक पत्रकार संघ, पुणे पत्रकार प्रतिष्ठानचे माजी अध्यक्ष, ज्येष्ठ पत्रकार प्रकाश ज्ञानेश्वर भोईटे (वय 62 ) यांचे सोमवारी (दि.13) दुपारी पुण्यात निधन झाले.      प्रकाश भोईटे यांची सन 1995 च्या सुमारास मी कृषी राज्यमंत्री असताना ओळख निर्माण झाली. त्यावेळी असलेल्या ठराविक पत्रकारांमध्ये ते अभ्यासू व उत्साही पत्रकार होते. ग्रामीण भागातील पत्रकारितेची व शेतकऱ्यांच्या प्रश्नांची त्यांना सखोल माहिती होती, त्यातूनच त्यांनी पुणे जिल्ह्यातील प्रश्नांना वाचा फोडण्याचे व पत्रकारितेच्या माध्यमातून न्याय देण्याचे ...

* मा.रत्नाकर तात्यांच्या भिमाई आश्रमशाळेत डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन..*

*इंदापूर ता.१४: येथील मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यार्थी वसतिगृह ट्रस्ट संचलित प्राथमिक,माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा तसेच मुलांचे व मुलींचे अनुदानित वसतीगृह यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर शैक्षणिक संकुलात भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती साजरी केली. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर , तथागत गौतम बुद्ध व संस्थेचे दिवंगत अध्यक्ष रत्नाकर (तात्या) मखरे यांच्या प्रतिमांचे पूजन माजी नगरसेविका,संस्थेच्या अध्यक्षा शकुंतला मखरे (काकी), सचिव ॲड. समीर मखरे यांच्या हस्ते यांच्या हस्ते केले. यावेळी सामूहिक बुद्ध वंदना घेण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जीवनपट उलगडला. तसेच काही विद्यार्थ्यांनी डॉ. आंबेडकरांच्या जीवनावर गीतं गायली. यावेळी प्रश्न मंजुषा घेण्यात आली. प्रश्न मंजुषेत प्रथम क्रमांक आलेली कु. देवयानी माने हिस सचिव ॲड. समीर मखरे यांनी बुद्धांचे चांदीचे नाणे भेट दिले. यावेळी संचालक गोरख तिकोटे, गलांडवाडी नंबर २चे सरपंच आप्पा गाडे, माजी सरपंच गोपीचंद गलांडे, सामाजिक कार्यकर्ते सतीश आढाव, ...

मालोजीराजे भोसले आयटीआय इंदापूर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती उत्साहात साजरी

इंदापूर येथील मालोजीराजे भोसले औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत (ITI)** आज, १३ एप्रिल २०२६ रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती अत्यंत उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात साजरी करण्यात आली. या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील विविध मान्यवरांनी उपस्थित राहून महामानवास अभिवादन केले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान संस्थेचे प्राचार्य श्री. दिनेश पानसरे यांनी भूषवले. याप्रसंगी इंदापूर नगर परिषदेचे नगराध्यक्ष श्री. मा.भरतभाऊ शहा, उपनगराध्यक्ष श्री. बाळासाहेब ढवळे शाहू फुले आंबेडकर विकास प्रतिष्ठानचे संस्थापक श्री. संदिपान कडवळे,आरपीआय पुणे जिल्हा अध्यक्ष श्री. शिवाजीराव मखरे, आरपीआय पुणे जिल्हा उपाध्यक्ष श्री. राजाभाऊ घाडगे,नगरपरिषदेचे गटनेते.शकिलभाई सय्यद माजी गटनेते श्री. कैलास कदम यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.   या वेळी बोलताना श्री. भरतभाऊ शहा (नगराध्यक्ष) संस्थेला दैनंदिन कामकाजात पाणी, वीज, रस्ते किंवा स्वच्छता यांबाबत कोणत्याही अडचणी येत असतील, तर नगर परिषद सदैव सहकार्यासाठी तत्पर राहील," असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.श्री...

थकीत ऊस बिले आणि कामगारांच्या वेतनासाठी 'रयत क्रांती संघटना' आक्रमक; २० एप्रिलला आंदोलनाचा इशारा

इंदापूर तालुक्यातील कर्मयोगी शंकरराव पाटील सह.साखर कारखाना म.फुलेनगर  सहयोग-ओंकार शुगर लिमिटेड (युनिट नं. ११, बिजवडी) या कारखान्याकडे शेतकऱ्यांची ऊस बिले, वाहतूक कंत्राटदारांचे पैसे आणि कामगारांचे अनेक महिन्यांचे वेतन थकीत असल्याने रयत क्रांती संघटनेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. यासंदर्भात संघटनेचे पुणे जिल्हाध्यक्ष निलेश देवकर यांच्या नेतृत्वाखाली कारखान्याचे जनरल मॅनेजर तावरे साहेब यांना निवेदन देण्यात आले असून, मागण्या मान्य न झाल्यास २० एप्रिल २०२६ रोजी तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.  १ जानेवारी २०२६ पासून कारखान्याला गाळपासाठी दिलेल्या उसाचे बिल अद्याप शेतकऱ्यांना मिळालेले नाही. नियमानुसार ऊस तुटल्यानंतर १४ दिवसांच्या आत पेमेंट मिळणे बंधनकारक असताना कारखान्याने अद्याप ही रक्कम अदा केलेली नाही.            गळीत हंगाम २०२५-२६ मधील ऊस तोडणी आणि वाहतूक करणाऱ्या ठेकेदारांची (शेतकऱ्यांची) बिले देखील थकीत आहेत. कारखान्यात काम करणाऱ्या कामगारांचे गेल्या अनेक महिन्यांचे पगार रखडलेले असून, त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आह...

उजणीच्या कुशीत वाळूमाफियांचा ‘रात्रंदिवस’ नंगानाच; प्रशासकीय मेहेरबानी की राजकीय वरदहस्त?

इंदापूर: पुणे आणि सोलापूर जिल्ह्याची भाग्यरेखा समजले जाणारे उजणी धरण सध्या पाणीसाठ्यापेक्षा 'वाळू उपशाच्या' महाभयंकर विळख्यामुळे चर्चेत आले आहे. नियमांची पायमल्ली, पर्यावरणाचा ऱ्हास आणि कोट्यवधी रुपयांची अनधिकृत उलाढाल या त्रिसूत्रीवर इंदापूर तालुक्यात वाळूचा काळा बाजार जोमात सुरू आहे. धक्कादायक बाब म्हणजे, दिवसाढवळ्या आणि रात्रीच्या काळोखात सुरू असणारा हा बेकायदेशीर उपसा रोखण्यात महसूल प्रशासन पूर्णपणे अपयशी ठरले असून, हे दुर्लक्ष 'जाणीवपूर्वक आणि अर्थपूर्ण' असल्याचा खळबळजनक आरोप आता नागरिक उघडपणे करू लागले आहेत. बोटींचे जाळे आणि हायटेक तस्करी  उजणीच्या विस्तीर्ण जलाशयात अत्याधुनिक यंत्रसामग्रीने सज्ज असलेल्या शेकडो बोटी बेकायदेशीरपणे वाळू उपसा करत आहेत. या बोटी नक्की कुणाच्या? हा प्रश्न सर्वसामान्यांना पडला असला, तरी त्याचे उत्तर 'राजकीय आडोशात' दडलेले आहे. इंदापूर तालुक्यातील काही बड्या राजकीय धेंडांच्या आणि त्यांच्या समर्थकांच्या मालकीच्या या बोटी असल्याचे बोलले जाते. 'आदर्श व्यक्तिमत्त्व' म्हणून मिरवणाऱ्या नेत्यांच्या वरदहस्...

इंदापूर येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी होणार

इंदापूर: कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग, महाराष्ट्र शासन संचलित मालोजीराजे भोसले शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI), इंदापूर येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात येणार आहे. राज्याचे कौशल्य विकास मंत्री ना. मंगल प्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.या सोहळ्यासाठी श्रीमती रुपाली कृष्णा पाटील (शिल्प निर्देशिका - यांत्रिक मोटार गाडी) या प्रमुख वक्त्या म्हणून उपस्थित राहणार असून त्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवर प्रकाश टाकणार आहेत. या कार्यक्रमाला इंदापूरमधील विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत: मा. श्री. भरत भाऊ शहा (नगरअध्यक्ष, इंदापूर नगरपरिषद) मा. श्री. बाळासाहेब ढवळे (उपनगरअध्यक्ष, इंदापूर नगरपरिषद) मा. श्री. कैलास कदम (माजी गटनेते, इंदापूर नगरपरिषद) मा. श्री. शिवाजीराव मखरे(कार्याध्यक्ष, आर.पी.आय. पुणे जिल्हा)मा. श्री. संदिपान कडवळे (संस्थापक, शाहू फुले आंबेडकर विकास प्रतिष्ठान) हा कार्यक्रम महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत आयोजित करण्यात आला आहे. ...

किरण बाबा गायकवाड यांच्या पुढाकारातून भव्य रक्तदान व आरोग्य शिबिर; संयुक्त जयंती उत्साहात साजरी

अकलूज (प्रतिनिधी):  माळशिरस तालुक्यात क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीचे औचित्य साधून, किरण बाबा गायकवाड (बाबा ग्रुप) यांच्या वतीने भव्य रक्तदान आणि मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. माळशिरस तालुक्याचे आमदार मा. रामभाऊ सातपुते साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हा समाजोपयोगी उपक्रम अत्यंत यशस्वीपणे पार पडला. १३७ जणांचे रक्तदान, ७३२ नागरिकांची आरोग्य तपासणी   या शिबिरास परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सामाजिक बांधिलकी जपत १३७ रक्तदात्यांनी रक्तदान केले. तसेच, सेवासदन मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल, मिरज यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आरोग्य शिबिरात ७३२ नागरिकांनी आपली आरोग्य तपासणी करून घेतली. तज्ज्ञ डॉक्टरांनी रुग्णांना तपासणीअंती मोफत सल्ला व उपचार प्रदान केले श्री. सुजयसिंह माने-पाटील (अकलूज मंडळ अध्यक्ष) श्री. महादेवराव कावळे (अकलूज शहराध्यक्ष) श्री. महेशभाऊ शिंदे (नगरसेवक) श्री. राहुलभैय्या लोंढे (नगरसेवक तथा गटनेते) श्री. किसनराव शिंदे (ओबीसी सेल शहराध्यक्ष) सौ. ज...

स्वरसम्राज्ञी आशा भोसले यांचे निधन; इंदापूरचे नगराध्यक्ष मा.भरतभाऊ शहा यांच्याकडून भावपूर्ण श्रद्धांजली

इंदापूर: भारतीय संगीत क्षेत्रातील एक अढळ तारा आणि कोट्यवधी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचे दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने संगीत क्षेत्राची कधीही न भरून निघणारी हानी झाली असून, संपूर्ण देशात शोककळा पसरली आहे. इंदापूर नगरपरिषदेचे नगराध्यक्ष मा. भरतभाऊ शहा यांनी आशा भोसले यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त करत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.          श्रद्धांजली वाहताना भरतभाऊ शहा म्हणाले की आशाताईंचे जाणे हे केवळ संगीत क्षेत्राचेच नव्हे, तर प्रत्येक भारतीयाचे वैयक्तिक नुकसान आहे. त्यांनी आपल्या मंत्रमुग्ध करणाऱ्या आवाजाने अनेक पिढ्यांना आनंद दिला. त्यांच्या गायकीतील वैविध्य आणि ऊर्जा नेहमीच प्रेरणादायी राहील. परमेश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो आणि त्यांच्या परिवाराला या दुःखातून सावरण्याची शक्ती देवो. आशा भोसले यांनी केवळ मराठी आणि हिंदीच नव्हे, तर विविध भाषांमध्ये हजारो गाणी गायली आहेत. त्यांच्या निधनामुळे भारतीय संगीतातील 'आशा' नावाचा एक सुवर्णकाळ संपल्याची भावना सर्वत्र व्यक्त होत आहे....

सोशल मीडियावर पोस्ट करणाऱ्यांवर कारवाई करता येणार नाही

मुंबई प्रतिनिधी:(सतिश पाटील ) सर्वोच्च न्यायालयचा ऐतिहासिक निर्णय  सर्वोच्च न्यायालयाने कलम ६६(A) अंतर्गत सोशल मीडिया पोस्टवर होणारी कारवाई बेकायदेशीर ठरवली असली तरी, देशाचे ऐक्य, सुरक्षा किंवा जातीय सलोखा बिघडवणारी पोस्ट केल्यास कारवाई होऊ शकते. आक्षेपार्ह मजकुरासाठी आयटी कायदा आणि IPC अंतर्गत गुन्हे दाखल होऊ शकतात, तसेच सरकारी कर्मचाऱ्यांसाठी कडक नियमावली लागू आहे.  महत्त्वाचे मुद्दे: सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय: कलम ६६(A) रद्द केल्यामुळे पोलिसांना पोस्टवरून थेट कारवाई करता येत नाही, हे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा भाग मानले जाते. कायदेशीर मर्यादा: जर पोस्टमुळे दंगल, हिंसाचार किंवा देशाच्या सुरक्षिततेला धोका निर्माण होत असेल, तर कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते. सरकारी कर्मचारी: सरकारी कर्मचाऱ्यांनी सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट केल्यास किंवा शिस्तभंग केल्यास नोकरीवर कारवाई होऊ शकते. गोपनीयता (Privacy): कोणाच्या संमतीशिवाय त्यांची चित्रे किंवा व्हिडिओ टाकणे हा गुन्हा आहे. बदलाव: केंद्र सरकार सोशल मीडियावरील मजकूर ब्लॉक करण्याचे नियम कडक करत आहे.  टीप: सोशल मीडिया...

इंदापूर तालुक्यातील तरंगवाडी तलावात खडकवासला कॅनलमधून पाणी सोडावे; शेतकऱ्यांचे कृषीमंत्र्यांना साकडे

इंदापूर तालुक्यातील तरंगवाडी, गोखळी आणि पोंदकुलवाडी परिसरातील शेतीचा आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी तरंगवाडी तलावात खडकवासला कॅनलमधून त्वरित पाणी सोडावे, या मागणीसाठी शेतकऱ्यांनी महाराष्ट्र राज्याचे कृषीमंत्री **नामदार दत्तात्रय (मामा) भरणे** यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली व त्यांना निवेदन दिले. यावेळी तरंगवाडीचे सरपंच कांतीलाल तरंगे यांच्या नेतृत्वाखाली परिसरातील शेतकरी आणि ग्रामस्थांनी मंत्र्यांशी सविस्तर चर्चा केली. गेल्या काही दिवसांपासून परिसरात पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे. भूगर्भातील पाणीपातळी खालावल्याने शेती पिकांचे नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जर खडकवासला कालव्याचे पाणी तरंगवाडी तलावात सोडले, तर तरंगवाडीसह गोखळी आणि पोंदकुलवाडी या तिन्ही गावांतील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. याच उद्देशाने ग्रामस्थांच्या वतीने हे अधिकृत निवेदन कृषीमंत्र्यांना देण्यात आले. निवेदन स्वीकारल्यानंतर नामदार दत्तात्रय मामा भरणे यांनी शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. तलावात पाणी सोडण्याबाबत संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून...

इंदापुरात १७ एप्रिल रोजी 'विराट हिंदू संमेलन'चे आयोजन; सकल हिंदू समाजाची मोठी तयारी

इंदापूर शहरात सकल हिंदू समाजाच्या वतीने येत्या १७ एप्रिल २०२६रोजी भव्य 'विराट हिंदू संमेलन' आयोजित करण्यात आले आहे. हिंदू संस्कृतीचे रक्षण, सामाजिक समरसता आणि राष्ट्र सुरक्षेच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेले हे संमेलन इंदापूर नगरपरिषद मैदानात सायंकाळी ५ ते रात्री ८ या वेळेत पार पडणार आहे. या संमेलनासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून मातृशक्तीच्या प्रतिनिधी कु. जागृती आयचीत आणि पुणे विभागाचे सह-संयोजक श्री. सुनील भालेराव उपस्थित राहणार आहेत. तसेच, हिंदुत्ववादी वक्ते आशुतोष झा यांची प्रमुख उपस्थिती या कार्यक्रमाला लाभणार असून, त्यांच्या प्रभावी भाषणातून हिंदुत्वाचा जागर केला जाणार आहे. आयोजकांनी या संमेलनाचे आयोजन करण्यामागची भूमिका स्पष्ट केली असून, त्यात खालील मुद्द्यांवर भर दिला आहे: स्वराज्य रक्षण छत्रपती शिवरायांच्या स्वराज्य विचारांची जोपासना करणे. राष्ट्र सुरक्षा हिंदू संघटित तरच राष्ट्र आणि संविधान सुरक्षित राहू शकते, हा संदेश देणे.सामाजिक एकताजातीपाती विसरून 'हिंदू' म्हणून एकत्र येणे आणि सामाजिक समरसता वाढवणे. जागृती:कुटुंब प्रबोधन, आत्मबोध, पर्यावरण संर...

क्रांतीसूर्य महात्मा जोतिबा फुलेयांच्या १९९ व्या जयंती निमित्त नागरी संघर्ष समितीचे विनम्र अभिवादन

 इंदापूर क्रांतीसूर्य महात्मा जोतिबा फुले जयंती उत्साहात साजरी  यांच्या १९९ व्या जयंती निमित्त अभिवादन करण्यात आले.. इंडियन युथ आयकॉन 2026 हा अंबुज चित्रपटाचे दिग्दर्शक नरेंद्र गायकवाड यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल इंदापूर शहर नागरी संघर्ष समितीच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आला. या वेळी बोलताना प्राकृष्णा ताटे म्हणाले की नरेंद्र गायकवाड यांनी इंदापूरच्या सुवर्णमय इतिहासाला उजळा दिला असून इंदापूर शहराने यापुर्वी इतिहासामध्ये अनेक लेखक, चित्रपट निर्माते, चित्रपट दिग्दर्शक, गायक, कवियत्री दिले आहेत यामध्ये ग .प . प्रधान ,शांता शेळके, यु . म . पठाण' प्रतिभाताई गारटकर, अरुण ढवळे यासारखे नामवंत लेखक चित्रपट दिग्दर्शक शृंखलेमध्ये नरेंद्र गायकवाड यांनी सर्वसामान्य गरीब दलित माणसाच्या जीवनाचे चित्रण करून एक उत्तम" अंबुज " नावाचा चित्रपट दिला त्या चित्रपटाला उत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून युथ इंडियन आयकॉन 2026 हा पुरस्कार त्यांना मिळाला . त्याबद्दल इंदापूर शहरवासीयांच्या वतीने त्यांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन  यावेळी संघर्ष समितीचे हमीदभाई आत्तार , कवी महादेव चव्हाण, भीमराव...

इंदापूर नगरपरिषदेत महात्मा ज्योतिराव फुले जयंती उत्साहात साजरी

इंदापूर: भारतीय समाजक्रांतीचे जनक महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती इंदापूर नगरपरिषदेच्या वतीने अत्यंत उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी इंदापूर शहरातील सर्व महापुरुषांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.या सोहळ्याप्रसंगी इंदापूरचे नगराध्यक्ष भरतशेठ शहा यांच्या हस्ते महात्मा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी उपनगराध्यक्ष बाळासाहेब ढवळे-पवार गटनेते शकीलभाई सय्यद,विरोधी पक्षनेते अनिल अण्णा पवार,प्रशांत उंबरे, नगरसेवक,अक्षय सूर्यवंशी,पोपट शिंदे,श्रीनिवास माने,स्वप्नील राऊत मा.नगरसेवक, आणि नगरसेवक डोनाल्ड शिंदे, यांच्यासह नगरपरिषदेचे अधिकारी, कर्मचारी व शहरातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात महात्मा ज्योतिराव फुले यांच्या प्रतिमेच्या पूजनाने झाली. त्यानंतर नगराध्यक्ष आणि इतर मान्यवरांनी शहरातील विविध चौकातील महापुरुषांच्या स्मारकांना भेटी देऊन पुष्पहार अर्पण केले." महात्मा ज्योतिराव फुले यांनी समाजातील उपेक्षितांसाठी आणि स्त्री शिक्षणासाठी दिलेले योगदान अविस्मरणीय आहे. त्यांचे विचार आजही स...

*भिमाई आश्रमशाळेत महात्मा फुलेंना अभिवादन..**

*इंदापूर ता.११: इंदापूर येथील मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यार्थी वसतिगृह ट्रस्ट संचलित प्राथमिक,माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा तसेच मुलांचे व मुलींचे अनुदानित वसतीगृह यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर शैक्षणिक संकुलात क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती साजरी केली. यावेळी क्रांतीसुर्य महात्मा फुले, तथागत गौतम बुद्ध व संस्थेचे दिवंगत अध्यक्ष रत्नाकर (तात्या) मखरे यांच्या प्रतिमांचे पूजन प्राथमिक आश्रमशाळेचे मुख्याध्यापक साहेबराव पवार व माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळेच्या प्राचार्या अनिता साळवे यांच्या हस्ते केले. यावेळी सर्व विद्यार्थी, अधिक्षक, शिक्षक - शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

इंदापुरात महात्मा ज्योतिराव फुले यांची १९९ वी जयंती उत्साहात साजरी होणार; भव्य बाईक रॅली आणि मिरवणुकीचे आयोजन

इंदापूर: भारतीय सामाजिक क्रांतीचे जनक, स्त्री शिक्षणाचे प्रणेते आणि सत्यशोधक समाजाचे संस्थापक **महात्मा ज्योतिराव फुले यांच्या १९९ व्या जयंतीनिमित्त** आज, शनिवार दि. ११ एप्रिल २०२६ रोजी इंदापूर तालुक्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. 'महात्मा ज्योतिराव फुले जयंती उत्सव समिती, इंदापूर तालुका' यांच्या वतीने या कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले असून शहरात उत्साहाचे वातावरण आहे. १. भव्य बाईक रॅली (सकाळी १०:०० वाजता): सकाळी १० वाजता श्री संत सावतामाळी नगर येथून भव्य बाईक रॅलीला सुरुवात होईल. ही रॅली शहरातील विविध भागांतून मार्गक्रमण करत महापुरुषांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करेल. * **मार्ग:** श्री संत सावतामाळी नगर → आंबेडकर नगर (बौद्ध विहार जवळ) → अण्णाभाऊ साठे पुतळा → नेहरू चौक → श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक (खडकपुरा) → महात्मा फुले पुतळा → अहिल्यादेवी पुतळा → इंदापूर नगरपालिका (श्री छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा). **२. भव्य दिव्य मिरवणूक (सायंकाळी ०५:३० वाजता):** सायंकाळी साडेपाच वाजता 'महात्मा फुले रोड, इंदापूर' येथून मु...

मंथन सामान्य ज्ञान परीक्षेत 'विद्या निकेतन स्कूल'व ज्युनिअर कॉलेज चे दैदीप्यमान यश; ७२ विद्यार्थी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण - मा.श्रीमंत ढोले सर

लाखेवाडी (ता. इंदापूर):जय भवानीगड विकास प्रतिष्ठान संचलित **विद्या निकेतन स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, लाखेवाडी** येथील विद्यार्थ्यांनी 'मंथन सामान्य ज्ञान परीक्षा २०२६' मध्ये उज्ज्वल यश संपादन केले आहे. या परीक्षेत विद्यालयातील एकूण ७२ विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य मिळवून संस्थेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. विद्यालयातील अनेक विद्यार्थ्यांनी २०० पेक्षा जास्त गुण मिळवून आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. काही उल्लेखनीय यश खालीलप्रमाणे: दर्शन रासकर (इ. ४ थी):२४८ गुण अपेक्षा सोलनकर (इ. ५ वी): २४६ गुण प्रांजल तरंगे (इ. ५ वी):२४० गुण अनुष्का गायकवाड (इ. ५ वी):२३६ गुण स्वरा अवताडे (इ. ५ वी): २३४ गुण शंभू साबळे व श्रेया देवकर (इ. ५ वी): प्रत्येकी २३० गुण अविष्कार क्षीरसागर (इ. ३ री): २१६ गुण याव्यतिरिक्त श्रुती वाघमोडे, राजवर्धन इंगळे, नम्रता घोगरे, भाग्यश्री काटे, आदिती ढोले, आराध्या हांगे आणि प्रचिती सावंत यांसह अनेक विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट गुण प्राप्त केले आहेत. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल जय भवानीगड विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष आणि पुणे जिल्हा...

हिंगणगाव येथे महामार्गावरील गोकुळ वाईन्स च्याच बोर्डमुळे वाहनधारकांचा जीव जाणार..! जबरदस्त अपघात होणार..!

इंदापूर  पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर इंदापूर तालुक्यातील हिंगणगाव हद्दीत वळण रस्ता असतानाही, रस्त्यालगत लावण्यात आलेल्या एका मोठ्या जाहिरात बोर्डमुळे वाहनधारकांना समोरील वाहने दिसण्यात अडथळा निर्माण होत आहे. यामुळे या ठिकाणी अपघातांचे प्रमाण वाढले असून, टोलनाका प्रशासनाच्या दुर्लक्षाबद्दल संताप व्यक्त होत आहे. हिंगणगाव परिसरात महामार्गाला मोठे वळण आहे. याच वळणावर ' गोकुळ वाईन्स बार अँड लॉजिंग' नावाचा एक मोठा फलक (बोर्ड) अगदी रोडलगत लावण्यात आला आहे.   वळण घेताना समोरून येणारी वाहने या बोर्डमुळे वेळेवर दिसत नाहीत.  वाहनचालकांना अंदाज येत नसल्याने या ठिकाणी छोटे-मोठे अपघात नित्याचेच झाले आहेत. महामार्गाच्या नियमांनुसार वळणावर किंवा 'व्हिजिबिलिटी' बाधित होईल अशा ठिकाणी जाहिरात फलक लावणे धोकादायक आहे, मात्र तरीही हा बोर्ड हटवण्यात आलेला नाही. महामार्गावरील प्रवाशांची सुरक्षितता आणि अडथळे दूर करण्याची जबाबदारी संबंधित टोलनाका व्यवस्थापनाची आहे. मात्र, इतका मोठा धोका समोर दिसत असतानाही टोलनाका प्रशासनाने याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केल्याचे दिसून येते. ...

कारखान्यांना साखर विकास निधीतून दिलेल्या कर्जाच्या परतफेडीसाठी व्याजामध्ये 50 टक्के सवलत द्यावी-हर्षवर्धन पाटील

इंदापूर : नवी दिल्ली येथे केंद्र सरकारच्या सहकार विभागाकडे व्याज व्याज सवलत मागणीचे पत्र देताना राष्ट्रीय अध्यक्ष हर्षवर्धन पाटील. प्रतिनिधी दि. 8/4/26                                     देशातील साखर उद्योग सध्या आर्थिक संकटातून जात आहे. त्यामुळे ऊस विकास निधी (SDF) तून साखर कारखान्यांना दिलेल्या कर्जाच्या परतफेडीसाठी जाहीर करण्यात आलेल्या एकरक्कमी परतफेड योजने(ओ.टी.एस.) मध्ये व्याजाच्या एकूण देय रू. 1440.04 कोटी रक्कमेवरती 50 टक्के सवलत देण्यात यावी. परिणामी, देशातील 65 कारखान्यांना सदर एकरकमी कर्जफेड योजनेतून संपूर्ण कर्ज थकबाकी फेडीसाठी घेता येईल, अशी मागणी राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी केंद्र सरकारच्या सहकार मंत्रालयाच्या सचिवांना भेटून नवी दिल्ली येथे मंगळवारी (दि. 7) केली.        यासंबंधीचे मागणीचे निवेदन हर्षवर्धन पाटील यांनी सहकार मंत्रालयाचे सचिव आशिष कुमार भुतानी यांना दिले व यासंदर्भात सविस्तर आपले म्हणणे सादर केल...

*इंदापूर नगरपरिषदेचा ऐतिहासिक निर्णय: कामगारांच्या आयुष्यात 'दिवाळी'; १.५७ कोटींचा निधी 'वन स्ट्रोक'मध्ये वितरित !*

*नगराध्यक्ष भरत(भाऊ)शहा यांच्या नेतृत्वाखाली कामगारांना मिळाला न्याय; अजितदादांना वाहिली कृतीतून श्रद्धांजली.* इंदापूर राजकारणा पलीकडे जाऊन समाजकारण आणि कामगार कल्याण कशाला म्हणतात, याचा वस्तुपाठ आज इंदापूर नगरपरिषदेने घालून दिला आहे. नगराध्यक्ष भरत भाऊ शहा यांच्या कणखर नेतृत्वाखाली आणि महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली, नगरपरिषदेच्या इतिहासात पहिल्यांदाच १ कोटी ५७ लाख ५४ हजार ८४० रुपयांचे थकीत देयके कामगारांना एकाच वेळी वितरित करण्यात आली आहेत. उपमुख्यमंत्री मा.सुनेत्राताई पवार, कृषिमंत्री मा.दत्तात्रय भरणे आणि आप्पासाहेब जगदाळे यांनी ज्या विश्वासाने भरत भाऊ शहा यांना नगराध्यक्षपदाची जबाबदारी दिली, त्या विश्वासाला शहा यांनी सार्थ ठरवले आहे. कामगारांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावणे, हीच अजितदादांना खरी 'भावपूर्ण श्रद्धांजली' ठरेल, अशा भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या. नगरपरिषदेने अत्यंत पारदर्शकपणे खालीलप्रमाणे निधीचे वाटप केले आहे: ४१ नियमित कर्मचारी वेतनातील फरकाची रक्कम ₹ ८०,९३,८३३ ०८ सेवानिवृत्त कर्मचारी ग्रॅच्युइटी व रजा रोखीकरण ₹ ६४,०...