इंदापूर, (डॉ. संदेश शहा.याज कडून) बुधवार दिनांक ३० एप्रिल २०२५ रोजी पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी व उपविभागीय अधिकारी बारामती उपविभाग वैभव नावडकर यांच्या मार्गदर्शनाखाली इंदापूर तालुक्याचे तहसीलदार जीवन बनसोडे, इंदापूर तालुक्याचे पोलीस निरीक्षक श्रीकांत कोकणे यांच्या नेतृत्वा खाली महसूल पथकाने उजनी जलाशयात इंदापूर तालुक्यातील महादेवनगर येथे एका बोटीस उडवून जलसमाधी दिली. विशेष म्हणजे दिनांक २५ एप्रिल रोजी कारवाईत ही बोट नष्ट करण्यात आली होती मात्र वाळू तस्करांनी या बोटीची पुन्हा दुरुस्त करून ही बोट अवैध वाळू उपसा करण्या साठी पाण्यात उतरवली होती. प्रशासनाच्या निरंतर कारवाई मुळे वाळू तस्कर जेरीस आले आहेत. या कारवाईत पथकाने बोट दुरुस्त करण्यासाठी लागणारे सर्व साहित्य ज्यामध्ये ऑक्सिजन सिलेंडर, व्यावसायिक गॅस सिलेंडर, वेल्डिंग व गॅस कटर, ८० लिटर डिजेल, सर्व प्रकारचे पान्हे, स्टेनलेस स्टील अंगल जप्त करून वाळू तस्करांचे कंबरडे मोडले आहे. सदर कारवाई मध्ये इंदापूर मंडळ अधिकारी श्याम झोडगे, माळवाडी मंडळ अधिकारी औदुंबर शिंदे, ग्राम महसूल अधिकारी वैभव मुळे,तालुक्यात...
SHIVSRUSTHI NEWS