मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कुलदैवत श्री लक्ष्मी नृसिंह देवतांचे दर्शन घेऊन राज्य बलवान होऊ दे, अन्नदाता बळी राजा, महिला व कामगार सबलीकरण होऊ दे असे घातले साकडे
इंदापूर, डॉ. संदेश शहा. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिनांक २९ मार्च रोजी दुपारी इंदापूर तालुक्यातील नीरा नरसिंहपूर येथील कुलदैवत श्री लक्ष्मी नृसिंह देवतांचे दर्शन घेऊन पूजा केली. यावेळी राज्य सर्वात बलवान होऊ दे, अन्नदाता बळीराजा, महिला तसेच कामगारांचे देखील सबलीकरण होऊ दे असे साकडे त्यांनी देवास घातले. मुख्यमंत्री येणार असल्याने नीरा नरसिंहपूर गावास पोलीस छावणी तसेच जनयात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते. राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, आमदार विजय शिवतारे, राहुल कुल, माजी खासदार रणजितसिंह देशमुख, माजी आमदार राम सातपुते यांच्या समवेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देवाची पूजा अर्चा केली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्री नृसिंह यांची कर्पूर तसेच महाआरती केली तसेच श्री लक्ष्मीचे दर्शन घेतले. मंदिराचे मुख्य पुजारी प्रसाद दंडवते यांनी पूजा केली. प्रदक्षिणा वेळी मुख्यमंत्र्यांनी श्री क्षेत्र नीरा नरसिंहपूर विकास आराखड्यातील बिडकर ओवरी सह कामांच्या प्रगतीची अधिकाऱ्यांकडून व विश्वस...