इंदापूर:भारतीय समाजक्रांतीचे जनक महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती इंदापूर नगरपरिषदेच्या वतीने अत्यंत उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी इंदापूर शहरातील सर्व महापुरुषांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.या सोहळ्याप्रसंगी इंदापूरचे नगराध्यक्ष भरतशेठ शहा यांच्या हस्ते महात्मा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी उपनगराध्यक्ष बाळासाहेब ढवळे-पवार गटनेते शकीलभाई सय्यद,विरोधी पक्षनेते अनिल अण्णा पवार,प्रशांत उंबरे, नगरसेवक,अक्षय सूर्यवंशी,पोपट शिंदे,श्रीनिवास माने,स्वप्नील राऊत मा.नगरसेवक, आणि नगरसेवक डोनाल्ड शिंदे, यांच्यासह नगरपरिषदेचे अधिकारी, कर्मचारी व शहरातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात महात्मा ज्योतिराव फुले यांच्या प्रतिमेच्या पूजनाने झाली. त्यानंतर नगराध्यक्ष आणि इतर मान्यवरांनी शहरातील विविध चौकातील महापुरुषांच्या स्मारकांना भेटी देऊन पुष्पहार अर्पण केले."महात्मा ज्योतिराव फुले यांनी समाजातील उपेक्षितांसाठी आणि स्त्री शिक्षणासाठी दिलेले योगदान अविस्मरणीय आहे. त्यांचे विचार आजही समाजाला दिशा देणारे आहेत," असे गौरवद्गार यावेळी नगराध्यक्ष भरतशेठ शहा यांनी काढले.
टिप्पण्या