कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते उद्घाटन; विविध आजारांच्या ५,३२५ हून अधिक तपासण्या - नगराध्यक्ष भरतभाऊ शहा इंदापूर | प्रतिनिधी उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मा. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व नारायणदास रामदास ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने इंदापूर येथे भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे कृषीमंत्री मा. दत्तात्रय (दत्तामामा) भरणे यांच्या हस्ते उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. यावेळी जिजामाता शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष मा. अप्पासाहेब जगदाळे, इंदापूर नगरपरिषदेचे नगराध्यक्ष मा. भरतशेठ शहा, डॉ. विद्युत शहा, शकीलभाई सय्यद, अक्षय सूर्यवंशी यांची समयोचित भाषणे झाली. कार्यक्रमास वृक्षप्रेमी मुकुंदशेठ शहा, माजी नगराध्यक्षा सौ. अंकिताताई शहा, वैशालीताई शहा, डॉ. संजय शहा, डॉ. रोहन हेगडे, डॉ. श्रेणिक शहा, डॉ. सुहास शेळके यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. तसेच अंगद शहा, अजिंक्य डहाणे, निखिल महाजन, अमोल माने, मनोज राजगुरू, शेखर पवार, गणेश महाजन, आरशाद सय्यद, ...
SHIVSRUSTHI NEWS