कारखाना चालतोय 'सहकारा'वर, शेतकरी जगतोय 'उधारी'वर..! पाटलांच्या 'कर्मयोगीला' लागला थकीत बिलांचा डाग.; शेतकरी आक्रमक!
इंदापूर:- एकेकाळी सहकार क्षेत्रात आदर्श मानला जाणाऱ्या इंदापूरच्या 'कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखान्या'च्या नावाला आज ग्रहण लागले आहे. कर्मयोगी शंकरराव भाऊ पाटील आणि गोकुळदास भाई शहा यांनी अत्यंत शिस्तबद्ध नियोजनाने जो कारखाना शेतकऱ्यांचा 'आधारस्तंभ' बनवला होता, त्याच कारखान्यात आज शेतकऱ्यांच्या हक्काच्या पैशांसाठी त्यांना रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची वेळ आली आहे. शेतकऱ्यांच्या संयमाचा अंत; घामाचे दाम अडकले एक काळ असा होता की, कारखान्याच्या गेटमधून ऊस गेला की काही दिवसांतच शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा व्हायचे. 'शेतकरी सुखी तरच कारखाना सुखी' हे ब्रीदवाक्य या दिग्गज नेत्यांनी प्रत्यक्ष कृतीत आणले होते. मात्र, आज चित्र पूर्णपणे बदलले आहे. कारखान्याचे सूत्रे बाबुराव बोत्रे यांच्या हाती सोपवल्यापासून शेतकऱ्यांच्या नशिबी केवळ हतबलता आली आहे. ऊस देऊन पाच-सहा महिने उलटले, तरी अद्याप शेतकऱ्यांना त्यांच्या घामाचे दाम मिळालेले नाहीत. भाऊ-भाई'च्या सुवर्णकाळाची आज आठवण मा.ना.हर्षवर्धनभाऊ पाटील आणि मा.भरतभाऊ शहा यांच्या काळात कारख...