इंदापूर तालुक्यातील तरंगवाडी तलावात खडकवासला कॅनलमधून पाणी सोडावे; शेतकऱ्यांचे कृषीमंत्र्यांना साकडे
इंदापूर
तालुक्यातील तरंगवाडी, गोखळी आणि पोंदकुलवाडी परिसरातील शेतीचा आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी तरंगवाडी तलावात खडकवासला कॅनलमधून त्वरित पाणी सोडावे, या मागणीसाठी शेतकऱ्यांनी महाराष्ट्र राज्याचे कृषीमंत्री **नामदार दत्तात्रय (मामा) भरणे** यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली व त्यांना निवेदन दिले.यावेळी तरंगवाडीचे सरपंच कांतीलाल तरंगे यांच्या नेतृत्वाखाली परिसरातील शेतकरी आणि ग्रामस्थांनी मंत्र्यांशी सविस्तर चर्चा केली.
गेल्या काही दिवसांपासून परिसरात पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे. भूगर्भातील पाणीपातळी खालावल्याने शेती पिकांचे नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जर खडकवासला कालव्याचे पाणी तरंगवाडी तलावात सोडले, तर तरंगवाडीसह गोखळी आणि पोंदकुलवाडी या तिन्ही गावांतील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. याच उद्देशाने ग्रामस्थांच्या वतीने हे अधिकृत निवेदन कृषीमंत्र्यांना देण्यात आले.
निवेदन स्वीकारल्यानंतर नामदार दत्तात्रय मामा भरणे यांनी शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. तलावात पाणी सोडण्याबाबत संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या जातील, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.
या प्रसंगी सरपंच कांतीलाल तरंगे यांच्यासह गावातील प्रमुख पदाधिकारी, शेतकरी बांधव आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.आशी माहीती मा.तुकाराम तात्या करे यांनी दिली,
टिप्पण्या