इंदापूर येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी होणार
इंदापूर:कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग, महाराष्ट्र शासन संचलित मालोजीराजे भोसले शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI), इंदापूर येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात येणार आहे. राज्याचे कौशल्य विकास मंत्री ना. मंगल प्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.या सोहळ्यासाठी श्रीमती रुपाली कृष्णा पाटील (शिल्प निर्देशिका - यांत्रिक मोटार गाडी) या प्रमुख वक्त्या म्हणून उपस्थित राहणार असून त्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवर प्रकाश टाकणार आहेत.
या कार्यक्रमाला इंदापूरमधील विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत: मा. श्री. भरत भाऊ शहा (नगरअध्यक्ष, इंदापूर नगरपरिषद) मा. श्री. बाळासाहेब ढवळे (उपनगरअध्यक्ष, इंदापूर नगरपरिषद) मा. श्री. कैलास कदम (माजी गटनेते, इंदापूर नगरपरिषद) मा. श्री. शिवाजीराव मखरे(कार्याध्यक्ष, आर.पी.आय. पुणे जिल्हा)मा. श्री. संदिपान कडवळे (संस्थापक, शाहू फुले आंबेडकर विकास प्रतिष्ठान) हा कार्यक्रम महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्ताने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचे स्मरण करत सामाजिक समता आणि शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले जाणार आहे. संस्थेतील सर्व प्रशिक्षणार्थी आणि कर्मचाऱ्यांनी या कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
---
टिप्पण्या