मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

जून, २०२४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

*इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळावर प्रशासक नेमा --- आप्पासाहेब जगदाळे तर गटविकास अधिकाऱ्यांना दिले निवेदन*

इंदापूर येथील श्री. नारायणदास रामदास हायस्कूल व ज्यु. कॉलेज येथील कथीत शालेय पोषण आहार योजने अंतर्गत विद्यार्थ्यांना देण्यात येणारा आहार यामध्ये संबंधीत मुख्याध्यापक आणि इतरांनी अपहार केल्याचे चौकशी अहवालावरून सिध्द झाले आहे. शिक्षण अधिकारी (प्राथमिक), पुणे जिल्हा परिषद, पुणे यांनी मुख्याध्यापक, श्री. ना.रा. हायस्कूल व ज्यु. कॉलेज, इंदापूर यांना शापोआ योजना वसुली बाबतचे पत्र जा.क्र.जिप/शिक्षण/प्राथ/ पीएमपोषण /२६४/२०२४ दि.३१/०५/२०२४ प्रमाणे त्यांना रक्कम शासन खाती जमा करण्याचे आदेश दिलेले असताना त्यावर अद्याप काही कारवाही झालेली दिसत नाही. यासाठी इंदापूर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती आप्पासाहेब जगदाळे, माजी उपनगराध्यक्ष भरतशेठ शहा यांनी शालेय पोषण आहार योजनेमध्ये झालेल्या अपहाराची चौकशी झालेला अहवाल व कार्यवाहीची अंमलबजावणी तसेच संबंधीतांवर कडक कारवाई करण्यात यावी यासाठी संबंधित प्रशासनाला निवेदन दिले आहे.    आप्पासाहेब जगदाळे व भरतशेठ शहा यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, १९३८ सालापासून इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळ, इंदापूर यांचे मार्फत ...