मुख्य सामग्रीवर वगळा

डोंबिवली स्थानकात लोकल ट्रेनचा डब्बा रुळावरुन घसरला

मुंबई प्रतिनिधी: (सतिश पाटील )डोंबिवलीमध्ये लोकल ट्रेनचा डबा रुळावरुन घसरल्याने मध्य रेल्वेची वाहतूक खोळंबली, आठवड्याच्या पहिल्याच दिवशी प्रवाशांचे हाल
डोंबिवली स्थानकात रिकाम्या लोकलचा डबा रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले आहे. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी मुंबईकरांचे हाल झाले असून कल्याण ते सीएसएमटी एसी लोकलवरही टांगती तलवार 
ठाणे: मुंबईची जीवनवाहिनी मानली जाणारी लोकल सेवा आठवड्याच्या पहिल्याच दिवशी आज सोमवारी विस्कळीत झाली आहे. डोंबिवली स्थानकात लोकलचा एक डबा रुळावरून घसरल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याचा मोठा फटका मध्य रेल्वेच्या वाहतुकीला बसला आहे. विशेषतः कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या धिम्या मार्गावरील वाहतूक सध्या ठप्प झाली असून, कामावर निघण्यासाठी घराबाहेर पडलेल्या चाकरमान्यांचे प्रचंड हाल होत आहेत.
कालही फलाट बंद होते
कोपर आणि ठाकुर्ली स्थानकातील धीम्या मार्गावरील वाहतूक रविवारी फलाट रुंदीकरणासाठी बंद ठेवण्यात आल्याने प्रवाशांचे हाल झाले असताना आठवड्याचा पहिलाच दिवस रेल्वे प्रवाशासाठी डोकेदुखीचा ठरला. सकाळी ८.३० वाजताची कल्याणच्या दिशेने जाणारी लोकल डोंबिवली स्थानकातून मार्गस्थ होत असतानाच घसरली. यामुळे डोंबिवली पुढील प्रवासाचा खोळंबा झाला. या लोकलच्या मागे असलेल्या डोंबिवली ते दिवा दरम्यानच्या चार लोकल डोंबिवली स्थानकातून पुन्हा मुंबईच्या दिशेने वळवण्यात आल्या असून मागील तासभरापासून लोकल सेवा ठप्प आहे.
कोपर, ठाकुर्लीला एकही ट्रेन थांबणार नाही
मुंबईकडून कल्याणच्या दिशेने जाणारी सकाळी ८.३० वाजताची लोकलचे दोन डबे डोंबिवली स्थानकात घसरले. यामुळे रेल्वे सेवा विस्कळीत झाली असून कल्याण कडून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या आणि येणाऱ्या लोकलचे वेळापत्रक कोलमडले आहे. दरम्यान कोपर आणि ठाकुर्ली दरम्यान पुढील काही काळ एकही लोकल थांबणार नसून प्रवाशांनी डोंबिवली स्थानकातून जलद लोकलने प्रवास करावा, कल्याण ते दिवा दरम्यान सर्व लोकल जलद मार्गावरून चालवल्या जात असल्याची उद्घोषणा रेल्वे प्रशासनाकडून केली जात आहे.या अशा घटना वारंवार का घडत आहे रेल्वे प्रशासन प्रवाशांच्या जीवाशी खेळ करत आहेत का? अत्यानुधिक युगातही असा भोंगळ कारभार कसा काय चालतो.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

जय भवानीगड विकास प्रतिष्ठान मधील बालचिमुकल्यानी घेतला आठवडा बाजाराचा आनंद

  इंदापूर जय भवानी गड विकास प्रतिष्ठान संचलित, विद्या निकेतन स्कूल अ‍ॅण्ड जुनियर कॉलेज व प्रेसिडेंसी इंटरनॅशनल स्कूल, विद्या निकेतन कॉलेज ऑफ फार्मसी व विद्यानिकेतन इन्स्टिटय़ूट ऑफ इंजिनिअरिंग अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 05/12/2025 रोजी आठवडा बाजाराचे नियोजन करण्यात आले होते.  विद्यार्थ्यांंना बाजारातल्या व्यवहाराची माहिती देण्यासाठी आणि त्यांना प्रत्यक्ष अनुभव देण्यासाठी प्रशाले मध्ये आठवडा बाजार भरवला होता. बाजारातील खरेदी विक्रीची माहिती मिळावी, पैश्याचा वापर कसा करावा याची जाणीव असावी, या उद्देशाने या आठवडे बाजाराचे नियोजन करण्यात आले होते.विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढावा पैश्याचे महत्त्व समजावे . भाजीपाला विक्री सोबत फळभाज्या विविध फळे, विविध खाद्यपदार्थ यांच्या खवय्यांनी विद्यार्थ्यांनी मनसोक्त आनंद लुटला.  फळे , भाजीपाला विक्री करताना विद्यार्थ्यांच्या चेहर्‍यावरचा आनंद ओसंडून वहात होता.  बाजारातील उत्साह आणि लगबग पाहून संस्थेच्या उपाध्यक्षा चित्रलेखा ढोले यांनी विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक केले. सदर कार्यक्रमा...

*जय भवानीगड विकास प्रतिष्ठान लाखेवाडीमध्ये वार्षिक क्रिडा सप्ताहाचे आयोजन*

 इंदापूर जय भवानीगड विकास प्रतिष्ठान संचलित, विद्यानिकेतन स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज व प्रेसिडेन्सी इंटरनॅशनल स्कूल लाखेवाडी यांच्या संयुक्त विद्यमानाने दिनांक 17 /11/ 2025 ते 22/11/2025 रोजी क्रिडा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.   खेळ ही शारीरिक व मानसिक कला आहे. खेळामुळे शारीरिक  चपळता वाढते.खेळाचे प्रामुख्याने मैदानी खेळ व बैठे खेळ असे दोन प्रकार मानले जातात. प्रशालेमध्ये क्रिकेट, कबड्डी, खो-खो,लंगडी, रस्सीखेच,रिले 100 मी ,रिले 400 मी, थालीफेक इ खेळाचे आयोजन करण्यात आले.  विद्यार्थ्यांचा सर्वागीण विकास व्हावा या उद्देशानेच प्रशालेमध्ये क्रिडा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.  क्रिडा सप्ताहाच्या निमित्ताने प्रशालेतील मैदानावर विविध खेळाची जयंत तयारी करण्यात आली.  क्रिडा सप्ताहाच्या उद्घाटनप्रसंगी मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे तसेच मैदान पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.  मशाल फेरी काढून विविध खेळांच्या सामन्यांची सुरवात करण्यात आली.   कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्या निकेतन स्कूल जुनियर कॉलेजचे प्राचार्य गणेश पवार...

जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेस बाजी मारणार - फडतरे

वाल्हे प्रतिनिधी- सिकंदर नदाफ आगामी जिल्हा परिषदेसह पंचायत समितीच्या निवडणुकीत जनशक्तीच्या जोरावर काँग्रेसच बाजी मारणार असल्याचा आशावाद काँग्रेस कमिटीचे नवनिर्वाचित तालुकाध्यक्ष साहेबराव फडतरे यांनी व्यक्त केला. वाल्हे ( ता. पुरंदर ) येथील महर्षी वाल्मीकी ऋषींच्या मंदिरात काँग्रेससह उध्दव बाळासाहेब ठाकरे तसेच आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांकडून साहेबराव फडतरे यांच्या निवडीबद्दल सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सत्काराला प्रतिउत्तर देताना फडतरे हे बोलत होते. ते पुढे म्हणाले आज मिळालेला सन्मान माझ्यासाठी खूप मोलाचा आहे. या सन्मानामुळे मला माझ्या कामाची जबाबदारी अधिक जाणवते. यापुढेही मी माझ्या कार्यातून समाजाची सेवा करण्याचा प्रयत्न करणार आहे. तसेच जिल्हा परिषदेसह पुरंदर पंचायत समितीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीतील इच्छुक उमेदवारांच्या प्रचारार्थ पूर्ण ताकतीने रिंगणात उतरणार आहे. याप्रसंगी काँग्रेस ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र बरकडे शिक्षक काँग्रेसचे विभागीय अध्यक्ष सचिन दुर्गाडे तसेच किरण कुमठेकर माजी सभापती गिरीश पवार सामाजिक कार्यकर्ते अतिश...