मुख्य सामग्रीवर वगळा

मालोजीराजे भोसले आयटीआय इंदापूर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती उत्साहात साजरी

इंदापूर येथील मालोजीराजे भोसले औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत (ITI)** आज, १३ एप्रिल २०२६ रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती अत्यंत उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात साजरी करण्यात आली. या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील विविध मान्यवरांनी उपस्थित राहून महामानवास अभिवादन केले.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान संस्थेचे प्राचार्य श्री. दिनेश पानसरे यांनी भूषवले. याप्रसंगी इंदापूर नगर परिषदेचे नगराध्यक्ष श्री. मा.भरतभाऊ शहा, उपनगराध्यक्ष श्री. बाळासाहेब ढवळे शाहू फुले आंबेडकर विकास प्रतिष्ठानचे संस्थापक श्री. संदिपान कडवळे,आरपीआय पुणे जिल्हा अध्यक्ष श्री. शिवाजीराव मखरे, आरपीआय पुणे जिल्हा उपाध्यक्ष श्री. राजाभाऊ घाडगे,नगरपरिषदेचे गटनेते.शकिलभाई सय्यद माजी गटनेते श्री. कैलास कदम यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
  या वेळी बोलताना श्री. भरतभाऊ शहा (नगराध्यक्ष) संस्थेला दैनंदिन कामकाजात पाणी, वीज, रस्ते किंवा स्वच्छता यांबाबत कोणत्याही अडचणी येत असतील, तर नगर परिषद सदैव सहकार्यासाठी तत्पर राहील," असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.श्री. बाळासाहेब ढवळे (उपनगराध्यक्ष): थोर नेत्यांचे गुण आणि चरित्र आत्मसात करून, आपल्या आचरणातून त्याची प्रतिभा दिसावी, असे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले.श्री. संदिपान कडवळे:"विद्यार्थ्यांनी जे शिक्षण घेत आहात, त्या पदवीचा उपयोग आपल्या आई-वडिलांच्या डोळ्यांतील अश्रू पुसण्यासाठी करावा, असे भावूक आवाहन त्यांनी केले.श्री. कैलास कदम:आज आपण सर्वजण एका व्यासपीठावर एकत्र येऊन कार्यक्रम करू शकतो, हा अधिकार आपल्याला बाबासाहेबांनी संविधानाच्या माध्यमातून दिला आहे, याची जाणीव त्यांनी करून दिली.
श्री. शिवाजीराव मखरे बाबासाहेबांचे विचार केवळ सप्ताहापुरते मर्यादित न ठेवता, विद्यार्थ्यांनी ते आयुष्यभर आपल्या आचरणात आणावेत, असे प्रतिपादन त्यांनी केले.
कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या श्रीमती रुपाली पाटील यांनी बाबासाहेबांच्या संघर्षमय जीवनप्रवासावर अभ्यासपूर्ण प्रकाशझोत टाकला. तसेच, इयत्ता चौथीमधील चि. संबुद्ध वाघमारे याने संविधानाची प्रस्तावना इंग्रजीतून सादर करून सर्वांची मने जिंकली.
या कार्यक्रमाला संस्थेचे गटनिदेशक, निदेशक, निदेशिका, तासिका निदेशक, कार्यालयीन कर्मचारी आणि मोठ्या संख्येने प्रशिक्षणार्थी युवक-युवती उपस्थित होते. 
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. संजय चौगुलेयांनी केले, तर उपस्थितांचे आभार राष्ट्रीय सेवा योजनेचे (NSS) अध्यक्ष श्री. राम खत्री यांनी मानले. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

जय भवानीगड विकास प्रतिष्ठान मधील बालचिमुकल्यानी घेतला आठवडा बाजाराचा आनंद

  इंदापूर जय भवानी गड विकास प्रतिष्ठान संचलित, विद्या निकेतन स्कूल अ‍ॅण्ड जुनियर कॉलेज व प्रेसिडेंसी इंटरनॅशनल स्कूल, विद्या निकेतन कॉलेज ऑफ फार्मसी व विद्यानिकेतन इन्स्टिटय़ूट ऑफ इंजिनिअरिंग अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 05/12/2025 रोजी आठवडा बाजाराचे नियोजन करण्यात आले होते.  विद्यार्थ्यांंना बाजारातल्या व्यवहाराची माहिती देण्यासाठी आणि त्यांना प्रत्यक्ष अनुभव देण्यासाठी प्रशाले मध्ये आठवडा बाजार भरवला होता. बाजारातील खरेदी विक्रीची माहिती मिळावी, पैश्याचा वापर कसा करावा याची जाणीव असावी, या उद्देशाने या आठवडे बाजाराचे नियोजन करण्यात आले होते.विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढावा पैश्याचे महत्त्व समजावे . भाजीपाला विक्री सोबत फळभाज्या विविध फळे, विविध खाद्यपदार्थ यांच्या खवय्यांनी विद्यार्थ्यांनी मनसोक्त आनंद लुटला.  फळे , भाजीपाला विक्री करताना विद्यार्थ्यांच्या चेहर्‍यावरचा आनंद ओसंडून वहात होता.  बाजारातील उत्साह आणि लगबग पाहून संस्थेच्या उपाध्यक्षा चित्रलेखा ढोले यांनी विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक केले. सदर कार्यक्रमा...

*जय भवानीगड विकास प्रतिष्ठान लाखेवाडीमध्ये वार्षिक क्रिडा सप्ताहाचे आयोजन*

 इंदापूर जय भवानीगड विकास प्रतिष्ठान संचलित, विद्यानिकेतन स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज व प्रेसिडेन्सी इंटरनॅशनल स्कूल लाखेवाडी यांच्या संयुक्त विद्यमानाने दिनांक 17 /11/ 2025 ते 22/11/2025 रोजी क्रिडा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.   खेळ ही शारीरिक व मानसिक कला आहे. खेळामुळे शारीरिक  चपळता वाढते.खेळाचे प्रामुख्याने मैदानी खेळ व बैठे खेळ असे दोन प्रकार मानले जातात. प्रशालेमध्ये क्रिकेट, कबड्डी, खो-खो,लंगडी, रस्सीखेच,रिले 100 मी ,रिले 400 मी, थालीफेक इ खेळाचे आयोजन करण्यात आले.  विद्यार्थ्यांचा सर्वागीण विकास व्हावा या उद्देशानेच प्रशालेमध्ये क्रिडा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.  क्रिडा सप्ताहाच्या निमित्ताने प्रशालेतील मैदानावर विविध खेळाची जयंत तयारी करण्यात आली.  क्रिडा सप्ताहाच्या उद्घाटनप्रसंगी मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे तसेच मैदान पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.  मशाल फेरी काढून विविध खेळांच्या सामन्यांची सुरवात करण्यात आली.   कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्या निकेतन स्कूल जुनियर कॉलेजचे प्राचार्य गणेश पवार...

जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेस बाजी मारणार - फडतरे

वाल्हे प्रतिनिधी- सिकंदर नदाफ आगामी जिल्हा परिषदेसह पंचायत समितीच्या निवडणुकीत जनशक्तीच्या जोरावर काँग्रेसच बाजी मारणार असल्याचा आशावाद काँग्रेस कमिटीचे नवनिर्वाचित तालुकाध्यक्ष साहेबराव फडतरे यांनी व्यक्त केला. वाल्हे ( ता. पुरंदर ) येथील महर्षी वाल्मीकी ऋषींच्या मंदिरात काँग्रेससह उध्दव बाळासाहेब ठाकरे तसेच आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांकडून साहेबराव फडतरे यांच्या निवडीबद्दल सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सत्काराला प्रतिउत्तर देताना फडतरे हे बोलत होते. ते पुढे म्हणाले आज मिळालेला सन्मान माझ्यासाठी खूप मोलाचा आहे. या सन्मानामुळे मला माझ्या कामाची जबाबदारी अधिक जाणवते. यापुढेही मी माझ्या कार्यातून समाजाची सेवा करण्याचा प्रयत्न करणार आहे. तसेच जिल्हा परिषदेसह पुरंदर पंचायत समितीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीतील इच्छुक उमेदवारांच्या प्रचारार्थ पूर्ण ताकतीने रिंगणात उतरणार आहे. याप्रसंगी काँग्रेस ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र बरकडे शिक्षक काँग्रेसचे विभागीय अध्यक्ष सचिन दुर्गाडे तसेच किरण कुमठेकर माजी सभापती गिरीश पवार सामाजिक कार्यकर्ते अतिश...