मुख्य सामग्रीवर वगळा

श्री.रणछोडदास कल्याणदास शहा विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन व बक्षीस वितरण सोहळा उत्साहात संपन्न

इंदापूर शहर विकास प्रतिष्ठान संचलित, श्री. रणछोडदास कल्याणदास शहा विद्यालय येथे वार्षिक स्नेहसंमेलन आणि बक्षीस वितरण समारंभ अत्यंत दिमाखात पार पडला. जल्लोष चिमुकल्यांचा, आविष्कार कलागुणांचा'या संकल्पनेवर आधारित या कार्यक्रमाने उपस्थितांची मने जिंकली.
कार्यक्रमाचे उद्घाटन मा. डॉ. अविनाश पाणबुडे आणि प्राचार्य जीवन सरवदे यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आले.
विद्यार्थ्यांनी नृत्य, संगीत आणि नाटिकांच्या माध्यमातून विविध कलागुणांचे सादरीकरण केले. चिमुकल्यांनी आपल्या सादरीकरणातून महत्त्वाचे सामाजिक संदेश दिले. शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मधील क्रीडा, कला आणि शैक्षणिक क्षेत्रात विशेष प्राविण्य मिळवणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात आले.
 या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन इंदापूर शहर विकास प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष ॲड. गिरीश शहा यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते.


या सोहळ्याला अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावून विद्यार्थ्यांचे कौतुक केले:प्राचार्य जीवन सरवदे (अध्यक्ष, आय कॉलेज), ॲड. गिरीश शहा (संस्थापक अध्यक्ष).
 प्रा. शिवाजीराव,वीर श्री. पुष्पराज जमदाडे (माजी विस्तार अधिकारी), हमीदभाई आत्तार, सौ. सायराभाभी अत्तार, वृक्षमित्र चंद्रकांत देवकर, श्री. अशोक अनपट,सोमेश सर (अंगणवाडी समन्वयक).
सौ. उमा गिरीश शहा, सौ. अर्पिता आदित्य शहा, श्री. आदित्य गिरीश शहा, ॲड. ओमकार गिरीश शहा, आणि हुसेन इलाही मोमीन (अध्यक्ष, शाळा व्यवस्थापन समिती).
या कार्यक्रमासाठी पालकांनी मोठी गर्दी केली होती. मुख्याध्यापक, शिक्षक वृंद, अंगणवाडी सेविका आणि शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला. विद्यार्थ्यांच्या कलागुणांच्या या आविष्काराचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

---

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

जय भवानीगड विकास प्रतिष्ठान मधील बालचिमुकल्यानी घेतला आठवडा बाजाराचा आनंद

  इंदापूर जय भवानी गड विकास प्रतिष्ठान संचलित, विद्या निकेतन स्कूल अ‍ॅण्ड जुनियर कॉलेज व प्रेसिडेंसी इंटरनॅशनल स्कूल, विद्या निकेतन कॉलेज ऑफ फार्मसी व विद्यानिकेतन इन्स्टिटय़ूट ऑफ इंजिनिअरिंग अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 05/12/2025 रोजी आठवडा बाजाराचे नियोजन करण्यात आले होते.  विद्यार्थ्यांंना बाजारातल्या व्यवहाराची माहिती देण्यासाठी आणि त्यांना प्रत्यक्ष अनुभव देण्यासाठी प्रशाले मध्ये आठवडा बाजार भरवला होता. बाजारातील खरेदी विक्रीची माहिती मिळावी, पैश्याचा वापर कसा करावा याची जाणीव असावी, या उद्देशाने या आठवडे बाजाराचे नियोजन करण्यात आले होते.विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढावा पैश्याचे महत्त्व समजावे . भाजीपाला विक्री सोबत फळभाज्या विविध फळे, विविध खाद्यपदार्थ यांच्या खवय्यांनी विद्यार्थ्यांनी मनसोक्त आनंद लुटला.  फळे , भाजीपाला विक्री करताना विद्यार्थ्यांच्या चेहर्‍यावरचा आनंद ओसंडून वहात होता.  बाजारातील उत्साह आणि लगबग पाहून संस्थेच्या उपाध्यक्षा चित्रलेखा ढोले यांनी विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक केले. सदर कार्यक्रमा...

*जय भवानीगड विकास प्रतिष्ठान लाखेवाडीमध्ये वार्षिक क्रिडा सप्ताहाचे आयोजन*

 इंदापूर जय भवानीगड विकास प्रतिष्ठान संचलित, विद्यानिकेतन स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज व प्रेसिडेन्सी इंटरनॅशनल स्कूल लाखेवाडी यांच्या संयुक्त विद्यमानाने दिनांक 17 /11/ 2025 ते 22/11/2025 रोजी क्रिडा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.   खेळ ही शारीरिक व मानसिक कला आहे. खेळामुळे शारीरिक  चपळता वाढते.खेळाचे प्रामुख्याने मैदानी खेळ व बैठे खेळ असे दोन प्रकार मानले जातात. प्रशालेमध्ये क्रिकेट, कबड्डी, खो-खो,लंगडी, रस्सीखेच,रिले 100 मी ,रिले 400 मी, थालीफेक इ खेळाचे आयोजन करण्यात आले.  विद्यार्थ्यांचा सर्वागीण विकास व्हावा या उद्देशानेच प्रशालेमध्ये क्रिडा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.  क्रिडा सप्ताहाच्या निमित्ताने प्रशालेतील मैदानावर विविध खेळाची जयंत तयारी करण्यात आली.  क्रिडा सप्ताहाच्या उद्घाटनप्रसंगी मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे तसेच मैदान पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.  मशाल फेरी काढून विविध खेळांच्या सामन्यांची सुरवात करण्यात आली.   कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्या निकेतन स्कूल जुनियर कॉलेजचे प्राचार्य गणेश पवार...

जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेस बाजी मारणार - फडतरे

वाल्हे प्रतिनिधी- सिकंदर नदाफ आगामी जिल्हा परिषदेसह पंचायत समितीच्या निवडणुकीत जनशक्तीच्या जोरावर काँग्रेसच बाजी मारणार असल्याचा आशावाद काँग्रेस कमिटीचे नवनिर्वाचित तालुकाध्यक्ष साहेबराव फडतरे यांनी व्यक्त केला. वाल्हे ( ता. पुरंदर ) येथील महर्षी वाल्मीकी ऋषींच्या मंदिरात काँग्रेससह उध्दव बाळासाहेब ठाकरे तसेच आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांकडून साहेबराव फडतरे यांच्या निवडीबद्दल सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सत्काराला प्रतिउत्तर देताना फडतरे हे बोलत होते. ते पुढे म्हणाले आज मिळालेला सन्मान माझ्यासाठी खूप मोलाचा आहे. या सन्मानामुळे मला माझ्या कामाची जबाबदारी अधिक जाणवते. यापुढेही मी माझ्या कार्यातून समाजाची सेवा करण्याचा प्रयत्न करणार आहे. तसेच जिल्हा परिषदेसह पुरंदर पंचायत समितीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीतील इच्छुक उमेदवारांच्या प्रचारार्थ पूर्ण ताकतीने रिंगणात उतरणार आहे. याप्रसंगी काँग्रेस ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र बरकडे शिक्षक काँग्रेसचे विभागीय अध्यक्ष सचिन दुर्गाडे तसेच किरण कुमठेकर माजी सभापती गिरीश पवार सामाजिक कार्यकर्ते अतिश...