*इंदापूर ता.११:इंदापूर येथील मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यार्थी वसतिगृह ट्रस्ट संचलित प्राथमिक,माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा तसेच मुलांचे व मुलींचे अनुदानित वसतीगृह यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर शैक्षणिक संकुलात क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती साजरी केली.
यावेळी क्रांतीसुर्य महात्मा फुले, तथागत गौतम बुद्ध व संस्थेचे दिवंगत अध्यक्ष रत्नाकर (तात्या) मखरे यांच्या प्रतिमांचे पूजन प्राथमिक आश्रमशाळेचे मुख्याध्यापक साहेबराव पवार व माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळेच्या प्राचार्या अनिता साळवे यांच्या हस्ते केले.
यावेळी सर्व विद्यार्थी, अधिक्षक, शिक्षक - शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
टिप्पण्या