मुख्य सामग्रीवर वगळा

उजणीच्या कुशीत 'वाळू'माफियांचा बाजार; प्रशासनाच्या डोळ्यावर 'गांधीजी,पण जातीयवाद बोकाळणार, मोठ्या रक्तापाताची प्रतीक्षा ? मुडदे पडतील याला जबाबदार कोण.?

इंदापूर | विशेष प्रतिनिधी
उजणी धरण म्हणजे सोलापूर आणि पुण्याची जीवनवाहिनी. पण सध्या ही जीवनवाहिनी वाळू चोरांसाठी 'सोन्याची अंडी देणारी कोंबडी' ठरत आहे. प्रशासकीय यंत्रणेने डोळ्यावर गांधी वादाची पट्टी बांधली आहे की काय, असा सवाल आता सामान्य जनता विचारू लागली आहे. इंदापूर तालुक्यातील बॅकवॉटरच्या गावांमध्ये सध्या जो नंगानाच सुरू आहे, तो पाहता येथे 'खाकी'चा धाक उरलाय की 'खादी'च्या आशीर्वादाने हे दुकान सुरू आहे, हे शोधण्याची वेळ आली आहे.
वाळू उपसा हा केवळ पर्यावरणाचा ऱ्हास नाही, तर तो आता सामाजिक शांततेसाठी 'कॅन्सर' ठरू लागला आहे. या अवैध व्यवसायातून जातीयवादाचे विष पेरले जात असून, वर्चस्ववादातून मोठा रक्तापात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या संपूर्ण खेळात 'झारीतील शुक्राचार्य' नेमके कोण आहेत? हे शुक्राचार्य एसी केबिनमध्ये बसून वसुलीचे आकडे मोजत आहेत की बांधावर उभे राहून मलिदा खात आहेत, याचा शोध घेण्याचे आव्हान पुणे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांसमोर आहे.असे म्हणतात की 'पैसा फेकला की तमाशा दिसतो', पण इथे पैसा फेकला की 'प्रशासन झोपते' असे चित्र आहे. डोळ्यावर हप्त्याची पट्टी बांधल्यामुळे की काय, धडधडणारे सक्शन पंप आणि रात्रभर चालणारी वाळूची अवैध वाहतूक अधिकाऱ्यांना दिसत नाही.
धक्कादायक बाब म्हणजे, इंदापूरच्या बॅकवॉटरमधील गावागावांत आता नवीन 'रोजगार' उपलब्ध झाला आहे. 
 चौकात बसून येणाऱ्या-जाणाऱ्या गाड्यांवर लक्ष ठेवणे.
मानधन दिवसाला तब्बल १००० रुपये रोख त्याची 
कार्यपद्धती साहेब निघाले की लगेच 'सिग्नल' दिला जातो. पोलीस येण्यापूर्वीच वाळूचे ट्रक गायब..! 
हे 'भामटे' लोक हजार रुपयांच्या हजरीसाठी प्रशासकीय यंत्रणेला चकवा देत आहेत आणि प्रशासन मात्र 'आंधळी कोशिंबीर' खेळण्यात मग्न आहे.

तालुक्यातील राजकीय धुरिण आणि वजनदार नेते आ. दत्तात्रय भरणे, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, भाजपा नेते प्रवीण माने आणि प्रदीपदादा गारटकर यांनी या विषयात गांभीर्याने लक्ष घालण्याची वेळ आली आहे. गुन्हेगारी प्रवृत्तींना राजकीय पाठबळ मिळत असल्याच्या चर्चेमुळे सर्वसामान्य जनतेत भीतीचे वातावरण आहे.आज जर या अवैध धंद्यांना लगाम घातला नाही, तर उद्या उजणीच्या काठावर मुडदे पडतील आणि या अराजकतेला सर्वस्वी प्रशासन आणि स्थानिक नेतृत्व जबाबदार असेल." - स्थानिक नागरिकांचा संताप.

जर पुणे जिल्हा प्रशासन आणि पोलीस अधीक्षकांनी यावर तातडीने कारवाई केली नाही, तर इंदापूर तालुक्यातील पत्रकारांचे शिष्टमंडळ थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहे. "तुमच्या राज्यात हे काय चाललंय?" असा सवाल विचारण्यासाठी जनतेचा दबाव वाढत आहे. 
 प्रशासनाने वेळीच डोळ्यावरची पट्टी काढली नाही, तर उजणीची वाळू उद्या कुणाच्या तरी रक्ताने माखलेली दिसेल. साहेब, गांधींची चटक लागली असेल तर ती उतरवण्यासाठी जनतेचा संताप पुरेसा आहे! आता तरी 'खाकी' व तहसीलदार जागे होणार की मुख्यमंत्र्यांच्या दरबारातच साहेबांची इज्जत निघणार? हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

जय भवानीगड विकास प्रतिष्ठान मधील बालचिमुकल्यानी घेतला आठवडा बाजाराचा आनंद

  इंदापूर जय भवानी गड विकास प्रतिष्ठान संचलित, विद्या निकेतन स्कूल अ‍ॅण्ड जुनियर कॉलेज व प्रेसिडेंसी इंटरनॅशनल स्कूल, विद्या निकेतन कॉलेज ऑफ फार्मसी व विद्यानिकेतन इन्स्टिटय़ूट ऑफ इंजिनिअरिंग अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 05/12/2025 रोजी आठवडा बाजाराचे नियोजन करण्यात आले होते.  विद्यार्थ्यांंना बाजारातल्या व्यवहाराची माहिती देण्यासाठी आणि त्यांना प्रत्यक्ष अनुभव देण्यासाठी प्रशाले मध्ये आठवडा बाजार भरवला होता. बाजारातील खरेदी विक्रीची माहिती मिळावी, पैश्याचा वापर कसा करावा याची जाणीव असावी, या उद्देशाने या आठवडे बाजाराचे नियोजन करण्यात आले होते.विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढावा पैश्याचे महत्त्व समजावे . भाजीपाला विक्री सोबत फळभाज्या विविध फळे, विविध खाद्यपदार्थ यांच्या खवय्यांनी विद्यार्थ्यांनी मनसोक्त आनंद लुटला.  फळे , भाजीपाला विक्री करताना विद्यार्थ्यांच्या चेहर्‍यावरचा आनंद ओसंडून वहात होता.  बाजारातील उत्साह आणि लगबग पाहून संस्थेच्या उपाध्यक्षा चित्रलेखा ढोले यांनी विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक केले. सदर कार्यक्रमा...

*जय भवानीगड विकास प्रतिष्ठान लाखेवाडीमध्ये वार्षिक क्रिडा सप्ताहाचे आयोजन*

 इंदापूर जय भवानीगड विकास प्रतिष्ठान संचलित, विद्यानिकेतन स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज व प्रेसिडेन्सी इंटरनॅशनल स्कूल लाखेवाडी यांच्या संयुक्त विद्यमानाने दिनांक 17 /11/ 2025 ते 22/11/2025 रोजी क्रिडा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.   खेळ ही शारीरिक व मानसिक कला आहे. खेळामुळे शारीरिक  चपळता वाढते.खेळाचे प्रामुख्याने मैदानी खेळ व बैठे खेळ असे दोन प्रकार मानले जातात. प्रशालेमध्ये क्रिकेट, कबड्डी, खो-खो,लंगडी, रस्सीखेच,रिले 100 मी ,रिले 400 मी, थालीफेक इ खेळाचे आयोजन करण्यात आले.  विद्यार्थ्यांचा सर्वागीण विकास व्हावा या उद्देशानेच प्रशालेमध्ये क्रिडा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.  क्रिडा सप्ताहाच्या निमित्ताने प्रशालेतील मैदानावर विविध खेळाची जयंत तयारी करण्यात आली.  क्रिडा सप्ताहाच्या उद्घाटनप्रसंगी मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे तसेच मैदान पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.  मशाल फेरी काढून विविध खेळांच्या सामन्यांची सुरवात करण्यात आली.   कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्या निकेतन स्कूल जुनियर कॉलेजचे प्राचार्य गणेश पवार...

जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेस बाजी मारणार - फडतरे

वाल्हे प्रतिनिधी- सिकंदर नदाफ आगामी जिल्हा परिषदेसह पंचायत समितीच्या निवडणुकीत जनशक्तीच्या जोरावर काँग्रेसच बाजी मारणार असल्याचा आशावाद काँग्रेस कमिटीचे नवनिर्वाचित तालुकाध्यक्ष साहेबराव फडतरे यांनी व्यक्त केला. वाल्हे ( ता. पुरंदर ) येथील महर्षी वाल्मीकी ऋषींच्या मंदिरात काँग्रेससह उध्दव बाळासाहेब ठाकरे तसेच आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांकडून साहेबराव फडतरे यांच्या निवडीबद्दल सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सत्काराला प्रतिउत्तर देताना फडतरे हे बोलत होते. ते पुढे म्हणाले आज मिळालेला सन्मान माझ्यासाठी खूप मोलाचा आहे. या सन्मानामुळे मला माझ्या कामाची जबाबदारी अधिक जाणवते. यापुढेही मी माझ्या कार्यातून समाजाची सेवा करण्याचा प्रयत्न करणार आहे. तसेच जिल्हा परिषदेसह पुरंदर पंचायत समितीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीतील इच्छुक उमेदवारांच्या प्रचारार्थ पूर्ण ताकतीने रिंगणात उतरणार आहे. याप्रसंगी काँग्रेस ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र बरकडे शिक्षक काँग्रेसचे विभागीय अध्यक्ष सचिन दुर्गाडे तसेच किरण कुमठेकर माजी सभापती गिरीश पवार सामाजिक कार्यकर्ते अतिश...