*इंदापूर नगरपरिषदेचा ऐतिहासिक निर्णय: कामगारांच्या आयुष्यात 'दिवाळी'; १.५७ कोटींचा निधी 'वन स्ट्रोक'मध्ये वितरित !*
*नगराध्यक्ष भरत(भाऊ)शहा यांच्या नेतृत्वाखाली कामगारांना मिळाला न्याय; अजितदादांना वाहिली कृतीतून श्रद्धांजली.*
इंदापूर राजकारणा पलीकडे जाऊन समाजकारण आणि कामगार कल्याण कशाला म्हणतात, याचा वस्तुपाठ आज इंदापूर नगरपरिषदेने घालून दिला आहे. नगराध्यक्ष भरत भाऊ शहा यांच्या कणखर नेतृत्वाखाली आणि महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली, नगरपरिषदेच्या इतिहासात पहिल्यांदाच १ कोटी ५७ लाख ५४ हजार ८४० रुपयांचे थकीत देयके कामगारांना एकाच वेळी वितरित करण्यात आली आहेत.
उपमुख्यमंत्री मा.सुनेत्राताई पवार, कृषिमंत्री मा.दत्तात्रय भरणे आणि आप्पासाहेब जगदाळे यांनी ज्या विश्वासाने भरत भाऊ शहा यांना नगराध्यक्षपदाची जबाबदारी दिली, त्या विश्वासाला शहा यांनी सार्थ ठरवले आहे. कामगारांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावणे, हीच अजितदादांना खरी 'भावपूर्ण श्रद्धांजली' ठरेल, अशा भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या.
नगरपरिषदेने अत्यंत पारदर्शकपणे खालीलप्रमाणे निधीचे वाटप केले आहे:
४१ नियमित कर्मचारी वेतनातील फरकाची रक्कम ₹ ८०,९३,८३३
०८ सेवानिवृत्त कर्मचारी ग्रॅच्युइटी व रजा रोखीकरण ₹ ६४,०६,३५०,
२९ सेवानिवृत्त कर्मचारी १०/२०/३० वर्षांच्या सेवेचा फरक ₹ १२,४९,६५७एकूण सर्व समावेशक रक्कम
इंदापूर नगरपरिषदेच्या इतिहासात आजवर कधीही एवढी मोठी रक्कम एकाच वेळी कामगारांच्या हाती सुपूर्त करण्यात आली नव्हती. प्रशासकीय दिरंगाई बाजूला सारून मुख्याधिकारी मा.रमेश ढगे आणि सर्व नगरसेवकांच्या सहकार्याने नगराध्यक्षांनी हा 'ऐतिहासिक' टप्पा गाठला आहे.
*"कामगार हा नगरपरिषदेचा कणा आहे. त्यांच्या कष्टाचा मोबदला त्यांना वेळेवर मिळणे हा त्यांचा हक्क आहे. वरिष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनामुळेच आज आम्ही ही मोठी रक्कम वितरित करू शकलो. कामगारांच्या चेहऱ्यावरील समाधान हीच आमची पावती आहे."
कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण
या निर्णयामुळे नगरपरिषदेच्या आजी-माजी कर्मचाऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले प्रश्न मार्गी लागल्याने कामगारांनी नगराध्यक्ष आणि प्रशासनाचे जाहीर आभार मानले. या प्रसंगी सर्व नगरसेवक, पदाधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विरोधकांनी केवळ राजकारण करण्यासाठी ज्या मुद्द्यांचा वापर केला, तेच प्रश्न भरतभाऊ शहा यांनी 'मार्गी' लावून विरोधकांच्या हातातून आयता मुद्दा काढून घेतला आहे. "कामगार हिताच्या गप्पा मारणाऱ्यांनी एकदा ही आकडेवारी पहावी," असा सूर आता इंदापूरच्या राजकीय वर्तुळात उमटत आहे.
'-------------------------‐---------------------------
टिप्पण्या