देशात वेगवेगळे धर्म, जाती,पोटजाती असून अनेक भाषा बोलल्या जातात तसेच सण उत्सव देखील गुण्यागोविंदाने साजरे केले जातात परंतु या सर्वांना एकत्र जोडण्याचे काम महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानामुळे शक्य झाले आहे महापुरुषांनी केलेले महान कार्यआजच्या पिढीपर्यंत पोहचण्यासाठी महापुरुषांची जयंती डीजेच्या तालावर नव्हे तर त्यांचे विचार वाचून साजरी करायला हवी असे मत पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष प्रा.दिगंबर दुर्गाडे यांनी व्यक्त केले.
वाल्हे ( ता. पुरंदर ) येथील सिद्धार्थ नगरमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी आयोजित कार्यक्रमात प्रा. दिगंबर दुर्गाडे हे बोलत होते.ते पुढे म्हणाले छत्रपती शिवाजी महाराज क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अतुलनीय कार्याची व त्याच्या प्रगल्भ विचारांची पारदर्शक माहिती आजच्या पिढीला असणे तितकेच गरजेचे आहे .
या प्रसंगी वाल्हे गावचे सरपंच अतुल गायकवाड जिल्हा परिषदेच्या सदस्या प्राजक्ता दुर्गाडे उपसरपंच सागर भुजबळ आरपीआयचे अध्यक्ष शैलेंद्र भोसले माथाडी कामगार संघटनेचे तालुकाध्यक्ष निलेश पवार शिवसेनेचे रोहित भोसले तसेच संभाजी पवार सुनील पवार दीपक कुमठेकर सत्यवान सूर्यवंशी सतीश पवार निलेश भोसले आदी मान्यवर उपस्थित होते.
टिप्पण्या