मुख्य सामग्रीवर वगळा

हिंगणगाव येथे महामार्गावरील गोकुळ वाईन्स च्याच बोर्डमुळे वाहनधारकांचा जीव जाणार..! जबरदस्त अपघात होणार..!

इंदापूर 
पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर इंदापूर तालुक्यातील हिंगणगाव हद्दीत वळण रस्ता असतानाही, रस्त्यालगत लावण्यात आलेल्या एका मोठ्या जाहिरात बोर्डमुळे वाहनधारकांना समोरील वाहने दिसण्यात अडथळा निर्माण होत आहे. यामुळे या ठिकाणी अपघातांचे प्रमाण वाढले असून, टोलनाका प्रशासनाच्या दुर्लक्षाबद्दल संताप व्यक्त होत आहे.
हिंगणगाव परिसरात महामार्गाला मोठे वळण आहे. याच वळणावर 'गोकुळ वाईन्स बार अँड लॉजिंग' नावाचा एक मोठा फलक (बोर्ड) अगदी रोडलगत लावण्यात आला आहे. 
 वळण घेताना समोरून येणारी वाहने या बोर्डमुळे वेळेवर दिसत नाहीत.
 वाहनचालकांना अंदाज येत नसल्याने या ठिकाणी छोटे-मोठे अपघात नित्याचेच झाले आहेत. महामार्गाच्या नियमांनुसार वळणावर किंवा 'व्हिजिबिलिटी' बाधित होईल अशा ठिकाणी जाहिरात फलक लावणे धोकादायक आहे, मात्र तरीही हा बोर्ड हटवण्यात आलेला नाही.
महामार्गावरील प्रवाशांची सुरक्षितता आणि अडथळे दूर करण्याची जबाबदारी संबंधित टोलनाका व्यवस्थापनाची आहे. मात्र, इतका मोठा धोका समोर दिसत असतानाही टोलनाका प्रशासनाने याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केल्याचे दिसून येते. 
वळणावरचा हा बोर्ड एखाद्या मोठ्या अपघाताला कारणीभूत ठरू शकतो. टोल प्रशासनाने तातडीने हा अडथळा दूर करावा, अन्यथा एखाद्या निष्पाप प्रवाशाचा बळी गेल्यास त्याला जबाबदार कोण?" असा सवाल स्थानिक नागरिक आणि वाहनचालक विचारत आहेत.आता या गंभीर बाबीवर टोलनाका प्रशासन तातडीने कारवाई करून तो धोकादायक बोर्ड हटवणार का,किती अपघात होतात याची वाट पाहात आहेत, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

जय भवानीगड विकास प्रतिष्ठान मधील बालचिमुकल्यानी घेतला आठवडा बाजाराचा आनंद

  इंदापूर जय भवानी गड विकास प्रतिष्ठान संचलित, विद्या निकेतन स्कूल अ‍ॅण्ड जुनियर कॉलेज व प्रेसिडेंसी इंटरनॅशनल स्कूल, विद्या निकेतन कॉलेज ऑफ फार्मसी व विद्यानिकेतन इन्स्टिटय़ूट ऑफ इंजिनिअरिंग अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 05/12/2025 रोजी आठवडा बाजाराचे नियोजन करण्यात आले होते.  विद्यार्थ्यांंना बाजारातल्या व्यवहाराची माहिती देण्यासाठी आणि त्यांना प्रत्यक्ष अनुभव देण्यासाठी प्रशाले मध्ये आठवडा बाजार भरवला होता. बाजारातील खरेदी विक्रीची माहिती मिळावी, पैश्याचा वापर कसा करावा याची जाणीव असावी, या उद्देशाने या आठवडे बाजाराचे नियोजन करण्यात आले होते.विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढावा पैश्याचे महत्त्व समजावे . भाजीपाला विक्री सोबत फळभाज्या विविध फळे, विविध खाद्यपदार्थ यांच्या खवय्यांनी विद्यार्थ्यांनी मनसोक्त आनंद लुटला.  फळे , भाजीपाला विक्री करताना विद्यार्थ्यांच्या चेहर्‍यावरचा आनंद ओसंडून वहात होता.  बाजारातील उत्साह आणि लगबग पाहून संस्थेच्या उपाध्यक्षा चित्रलेखा ढोले यांनी विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक केले. सदर कार्यक्रमा...

*जय भवानीगड विकास प्रतिष्ठान लाखेवाडीमध्ये वार्षिक क्रिडा सप्ताहाचे आयोजन*

 इंदापूर जय भवानीगड विकास प्रतिष्ठान संचलित, विद्यानिकेतन स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज व प्रेसिडेन्सी इंटरनॅशनल स्कूल लाखेवाडी यांच्या संयुक्त विद्यमानाने दिनांक 17 /11/ 2025 ते 22/11/2025 रोजी क्रिडा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.   खेळ ही शारीरिक व मानसिक कला आहे. खेळामुळे शारीरिक  चपळता वाढते.खेळाचे प्रामुख्याने मैदानी खेळ व बैठे खेळ असे दोन प्रकार मानले जातात. प्रशालेमध्ये क्रिकेट, कबड्डी, खो-खो,लंगडी, रस्सीखेच,रिले 100 मी ,रिले 400 मी, थालीफेक इ खेळाचे आयोजन करण्यात आले.  विद्यार्थ्यांचा सर्वागीण विकास व्हावा या उद्देशानेच प्रशालेमध्ये क्रिडा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.  क्रिडा सप्ताहाच्या निमित्ताने प्रशालेतील मैदानावर विविध खेळाची जयंत तयारी करण्यात आली.  क्रिडा सप्ताहाच्या उद्घाटनप्रसंगी मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे तसेच मैदान पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.  मशाल फेरी काढून विविध खेळांच्या सामन्यांची सुरवात करण्यात आली.   कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्या निकेतन स्कूल जुनियर कॉलेजचे प्राचार्य गणेश पवार...

जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेस बाजी मारणार - फडतरे

वाल्हे प्रतिनिधी- सिकंदर नदाफ आगामी जिल्हा परिषदेसह पंचायत समितीच्या निवडणुकीत जनशक्तीच्या जोरावर काँग्रेसच बाजी मारणार असल्याचा आशावाद काँग्रेस कमिटीचे नवनिर्वाचित तालुकाध्यक्ष साहेबराव फडतरे यांनी व्यक्त केला. वाल्हे ( ता. पुरंदर ) येथील महर्षी वाल्मीकी ऋषींच्या मंदिरात काँग्रेससह उध्दव बाळासाहेब ठाकरे तसेच आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांकडून साहेबराव फडतरे यांच्या निवडीबद्दल सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सत्काराला प्रतिउत्तर देताना फडतरे हे बोलत होते. ते पुढे म्हणाले आज मिळालेला सन्मान माझ्यासाठी खूप मोलाचा आहे. या सन्मानामुळे मला माझ्या कामाची जबाबदारी अधिक जाणवते. यापुढेही मी माझ्या कार्यातून समाजाची सेवा करण्याचा प्रयत्न करणार आहे. तसेच जिल्हा परिषदेसह पुरंदर पंचायत समितीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीतील इच्छुक उमेदवारांच्या प्रचारार्थ पूर्ण ताकतीने रिंगणात उतरणार आहे. याप्रसंगी काँग्रेस ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र बरकडे शिक्षक काँग्रेसचे विभागीय अध्यक्ष सचिन दुर्गाडे तसेच किरण कुमठेकर माजी सभापती गिरीश पवार सामाजिक कार्यकर्ते अतिश...