मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

मार्च, २०२६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

निर्भीड आणि निपक्ष पत्रकारितेचा बुलंद आवाज: कैलासभाऊ पवार यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

रेडा (ता. इंदापूर) येथील सुपुत्र आणि पत्रकारितेच्या क्षेत्रातील एक आदरयुक्त नाव, कैलासभाऊ पवार यांचा आज वाढदिवस. अत्यंत सामान्य परिस्थितीतून जिद्दीच्या जोरावर त्यांनी स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या या विशेष दिनानिमित्त त्यांच्या कार्याचा आढावा घेणारा हा एक खास मसुदा: कष्ट आणि जिद्दीचा प्रवास अत्यंत गरीब कुटुंबात जन्मलेल्या कैलासभाऊंचा आजवरचा प्रवास हा संघर्षाचा आणि यशाचा प्रेरणादायी वस्तुपाठ आहे. कोणत्याही मोठ्या वारशाशिवाय, केवळ स्वतःच्या कष्टावर आणि प्रामाणिकपणावर त्यांनी पत्रकारितेत आपले हक्काचे स्थान निर्माण केले. निर्भीड लेखणी आणि सामाजिक बांधिलकी अन्यायाला वाचा: समाजातील शेवटच्या घटकाचे प्रश्न असोत किंवा प्रशासकीय त्रुटी, कैलासभाऊंच्या लेखणीने नेहमीच अन्यायाविरुद्ध आवाज उठवला आहे. निपक्ष पत्रकारिता: कोणतीही तडजोड न करता, सत्याची बाजू मांडणे हे त्यांच्या पत्रकारितेचे मुख्य वैशिष्ट्य आहे. समाजसेवक म्हणून ओळख: ते केवळ बातमीदार नाहीत, तर समाजातील विविध समस्या सोडवण्यासाठी प्रत्यक्ष मैदानात उतरणारे एक संवेदनशील समाजसेवक म्हणूनही ओळखले जातात. प...

आई एकविरा देवी भक्त मंडळ मुलुंड ते कार्ला

मुंबई प्रतिनिधी :(सतिश पाटील ) आई एकविरा भक्त मंडळ मुलुंड -मुंबई पालखी पदयात्रा  अशी शिस्तबद्ध पालखी गेली 26 वर्ष अध्यक्ष :(श्री. कैलास पाटील) यांच्या नेतृत्वात आणि सर्व मुलुंड गव्हाणपाडा, नवघर, नानेपाडा, नाहूरगाव, जुना मुलुंड तसेच 60 पेक्षा अधिक गावातील लोक मोठ्या श्रध्देने व उत्सवाने सहभाग व सहकार्य करतात यंदा साधारण 1200 पदयात्री सहभागी झाले होते. वय वर्ष 8 ते 80 वर्ष असे पदयात्री पालखीत चालत असतात. टिप:महाप्रसाद भंडारा मंगळवार दिनांक :7 एप्रिल 2026रोजी शिवगणेश मंदिर नानेपाडा मुलुंड पुर्व येथे होणार आहे तरी सर्व भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे मंडळाचे निमंत्रण आहे.  आपले नम्र :आई एकविरा भक्त मंडळ मुलुंड -मुंबई  पालखी दरम्यान  मुंबई पत्रकार :(सतिश पाटील )यांना चौलआग्राव, गोवंडी  तसेच मुलुंडच्या पालखीला श्रद्धेने व भक्ती भावाने खांदा देण्याचा मान मिळाला धन्यवाद आई माऊलीचा उदोउदो.

Mumbai Coastal Road: जय हो बंद! कोस्टलवरील प्रयोग फसला, रहिवाशांच्या तक्रारींपुढे पालिकेची माघार

मुंबई प्रतिनिधी :(सतिश पाटील ) मुंबईमधील कोस्टल रोडवरती मुंबई महापालिकेने सुरु केलेला अनोख्या प्रकल्पामुळे स्थानिक रहिवाशांच्या तक्रारी होत्या. रस्त्यावरून गाडी गेल्यानंतर वाजणाऱ्या 'जय हो' या गाण्याच्या धूनमुळे लोकांना होणारा त्रास आता कमी होणार आहे.    मुंबईत नुकताच सुरू झालेला ‘मेलोडी रोड’ हा अनोखा प्रकल्प सुरुवातीपासूनच वादाच्या केंद्रस्थानी सततच्या आवाजामुळे रहिवाशांच्या तक्रारी   मुंबईत नुकताच सुरू झालेला ‘मेलोडी रोड’ हा अनोखा प्रकल्प सुरुवातीपासूनच वादाच्या केंद्रस्थानी आला होता. या प्रकल्पाचं बाकीच्या लोकांकडून कौतुक झालं असलं तरी तिथल्या रहिवाशांना त्रास होत होता. पंरतु आता मुंबई येथील कोस्टल रोडवर तयार करण्यात आलेल्या या म्युझिकल रस्त्यामुळे परिसरातील रहिवाशांना त्रास होऊ लागल्याने महापालिकेला तो तात्पुरता बंद करण्याचा निर्णय घ्यावा लागला. या निर्णयाचं रहिवाशांकडून स्वागत करण्यात आलं आहे.  ‘मेलोडी रोड’मुळे वाढला आवाजाचा त्रास नरिमन पॉइंट ते वरळी या मार्गावर तयार करण्यात आलेल्या या रस्त्यावरून वाहनं ठराविक वेगाने गेली की ‘जय हो’ गाण्याची धून ऐक...

सावता माळी मंदिर परिसरात पेव्हर ब्लॉक बसवण्याच्या कामाला तांत्रिक मान्यता; १० लाखांचा निधी मंजूर

इंदापूर शहरातील दलित वस्ती परिसरात असलेल्या सावता माळी मंदिरासमोर पेव्हर ब्लॉक बसवण्याच्या कामाला सार्वजनिक बांधकाम विभागाने 'तांत्रिक मान्यता' प्रदान केली आहे. या महत्त्वपूर्ण विकासकामासाठी खासदार स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत (२०२५-२६) १० लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सार्वजनिक बांधकाम उपविभाग इंदापूरचे उपअभियंता यांनी या संदर्भातील अधिकृत पत्र (जा.क्र. ३७/२०२६) प्रसिद्ध केले आहे. या कामांतर्गत परिसराचे नूतनीकरण करून नागरिकांना अधिक सोयी-सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. अशी होणार कामे:या मंजूर विकासकामामध्ये प्रामुख्याने खालील बाबींचा समावेश आहे:,जागेचे सपाटीकरण करणे. ०.३० मी. जाडीचे सोलिंग करणे.एम-१० प्रकारच्या काँक्रीटचा बेस तयार करणे.६०.० मी.मी. जाडीचे दर्जेदार पेव्हर ब्लॉक बसवणे.कामाच्या ठिकाणी नामफलक लावणे. या कामाचे सविस्तर अंदाजपत्रक ९,९९,०९४ रुपयांचे असून त्यास नियमानुसार तांत्रिक मंजुरी देण्यात आली आहे. हे काम पूर्ण करताना दर्जावर विशेष लक्ष देण्यात येणार आहे. कामासाठी वापरल्या जाणाऱ्या साहित्याची चाचणी '...

नितीन गडकरी दि.10 एप्रिलला तुकाराम महाराज पालखी मार्गाची पाहणी करणार- हर्षवर्धन पाटील-

नितीन गडकरी दि.10 एप्रिलला तुकाराम महाराज पालखी मार्गाची पाहणी करणार- हर्षवर्धन पाटील - इंदापूर : प्रतिनिधी दि.28/3/26                                                संत श्री तुकाराम महाराज पालखी मार्गा (राष्ट्रीय महामार्ग 965 जी ) ची आपण स्वतः येऊन पाहणी करून आढावा घ्यावा, अशी विनंती केंद्रीय रस्ते, परिवहन व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांना नागपूर येथे भेटीत आज शनिवारी (दि. 28) केली. त्यास तात्काळ होकार देत ना.नितीन गडकरी हे पुढील महिन्यामध्ये दि. 10 एप्रिल रोजी संत तुकाराम महाराज पालखी मार्गाची पाहणी करणेसाठी येणार आहेत, अशी माहिती माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी दिली.            नागपूर येथे ना.नितीन गडकरी यांची हर्षवर्धन पाटील यांनी भेट घेऊन संत तुकाराम महाराज पालखी मार्गाच्या अपूर्ण व व निकृष्ट कामांबद्दल चर्चा केली. यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी नितीन गडकरी यांचेकडे पालखी मार्गावरील ठिकठिकाणीचे उड्डाणपूल, भुय...

प्रदीप गारटकर यांच्या वाढदिवसानिमित्त इंदापुरात 'वन बूथ - टेन युथ' अभियानाचा श्रीगणेशा; वाढदिवसाला हार-तुऱ्यांऐवजी पुस्तकांचे आवाहन

इंदापूर: लोकनेते प्रदीप दादा गारटकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून यावर्षी इंदापूर तालुक्यात भारतीय जनता पार्टीच्या संघटनात्मक बांधणीसाठी एक अभिनव उपक्रम राबवण्यात येणार आहे. "माझ्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रम राबवतानाच पक्षाची बांधणी अधिक भक्कम करण्यावर भर द्यावा," असे आवाहन स्वतः प्रदीप दादा गारटकर यांनी कार्यकर्त्यांना केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत तालुक्यातील कार्यकर्त्यांनी 'वन बूथ - टेन युथ' हा संकल्प केला आहे. संघटनात्मक बांधणीवर भर: 'वन बूथ - टेन युथ' भारतीय जनता पार्टीच्या बळकटीकरणासाठी तालुक्यातील प्रत्येक गावातील प्रत्येक बूथवर जाऊन कार्यकर्त्यांची फौज उभी केली जात आहे. या अभियानांतर्गत:  * प्रत्येक बूथवर एक बी.एल.ए. (Booth Level Assistant) आणि १० तरुण कार्यकर्त्यांची निवड केली जात आहे.  * हे अभियान २९ मार्च ते ०४ एप्रिल २०२६ या सात दिवसांच्या कालावधीत संपूर्ण तालुक्यात राबवले जाणार आहे. रविवारी बूथ प्रमुखांचा भव्य मेळावा या अभियानाची अधिकृत सुरुवात आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी रविवार, दिनांक २९ मार्च २०२६ रोजी सा...

तरंगवाडीत 'अखंड हरिनाम सप्ताह' व 'ज्ञानेश्वरी पारायण' सोहळ्याचा उत्साह; हनुमान जयंती निमित्त भव्य आयोजन

इंदापूर (प्रतिनिधी): इंदापूर तालुक्यातील तरंगवाडी येथे हनुमान जयंतीचे औचित्य साधून २७ व्या 'अखंड हरिनाम सप्ताह व श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे' भव्य आयोजन करण्यात आले आहे. २६ मार्च २०२६ ते २ एप्रिल २०२६ या कालावधीत हा सोहळा स्थानिक हनुमान मंदिरात संपन्न होणार असून, पंचक्रोशीतील भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. विद्वान कीर्तनकारांची मांदियाळी या सप्ताहाचे वैशिष्ट्य म्हणजे दररोज नामवंत कीर्तनकारांची प्रवचने आणि कीर्तने होणार आहेत. ह.भ.प. आकाश महाराज शेटे (आळंदीकर) यांच्या व्यासपीठ चालकत्वाखाली हा सोहळा पार पडत आहे. सप्ताहात खालीलप्रमाणे कीर्तन सेवा होणार आहे:  * २६ मार्च: ह.भ.प. दत्तात्रय महाराज गलांडे (रामजन्माचे कीर्तन) आणि ह.भ.प. प्रमोद महाराज शिंदे.  * २७ मार्च: ह.भ.प. निलेश महाराज कोरडे.  * २८ मार्च: ह.भ.प. श्रीराम महाराज गुलदगड.  * २९ मार्च: ह.भ.प. आकाश महाराज गरगडे.  * ३० मार्च: ह.भ.प. वैष्णवीताई महाराज महानुवर.  * ३१ मार्च: ह.भ.प. राम महाराज अभंग.  * १ एप्रिल: ह.भ.प. विकास महाराज देवडे.  * २ एप्रिल: ह.भ.प. लालासो ...

भक्तांच्या वाटेत खड्डे अन् प्रशासनाच्या खिशात टोल;संत तुकाराम महाराज पालखी मार्गावरील इंदापूर-अकलुज रस्तेकामाचा बोजवारा..!

इंदापूर: संत तुकाराम महाराज पालखी मार्गाचे 'राष्ट्रीय महामार्ग' म्हणून मोठ्या थाटामाटात नामकरण झाले खरे, मात्र जमिनीवरची परिस्थिती अत्यंत विदारक आहे. इंदापूर ते अकलुज दरम्यानच्या रस्त्याचे काम अद्यापही रेंगाळलेले असताना, दुसरीकडे वाहनधारकांकडून मात्र सक्तीने टोल वसुली सुरू असल्याने संताप व्यक्त केला जात आहे. काम अर्ध्यावर, टोल जोमात इंदापूर-अकलुज भागात अनेक ठिकाणी रस्त्याचे डांबरीकरण आणि काँक्रीटीकरण अपूर्ण आहे. रस्ता ठिकठिकाणी उखडलेला असून वाहन चालवताना वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागत आहे. विशेष म्हणजे, रस्ता पूर्ण झालेला नसतानाही टोल नाका मात्र पूर्ण क्षमतेने सुरू करण्यात आला आहे. " रस्ता नाही तर टोल कशाचा? " असा सवाल आता स्थानिक नागरिक आणि प्रवाशांकडून विचारला जात आहे. बावडा बायपास 'बंद'च! या मार्गावरील बावडा येथील बायपासचे काम रखडल्याने हा भाग वाहतुकीसाठी पूर्णपणे खुला झालेला नाही. बायपास बंद असल्याने वाहतुकीचा सर्व ताण मुख्य गावातून किंवा अरुंद रस्त्यांवरून येत आहे. परिणामी, दररोज वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत असून अपघाताचा धोक...

इंदापूर करांसाठी खुशखबर! थकीत मालमत्ता करावरील दंडात १००% सूट; नगरपरिषदेची 'अभय योजना' लागू

इंदापूर: इंदापूर शहरातील मालमत्ता धारकांसाठी नगरपरिषदेने एक अत्यंत महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी आणली आहे. थकीत मालमत्ता कराच्या वसुलीसाठी शासनाच्या धोरणानुसार 'अभय योजना' जाहीर करण्यात आली असून, याअंतर्गत करावरील शास्ती (दंड) आणि व्याजामध्ये १०० टक्के सवलत देण्यात येणार आहे.योजनेची महत्त्वाची वैशिष्ट्ये: नगरपरिषदेने प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार, ही योजना ठराविक कालावधीसाठी असून त्याचे निकष खालीलप्रमाणे आहेत: १००% शास्ती माफी: ३१ मार्च २०२५ अखेरपर्यंतची संपूर्ण थकीत रक्कम आणि चालू वर्षाचा मालमत्ता कर ३१ मार्च २०२६ पर्यंत भरल्यास, थकीत रकमेवरील दंडाची रक्कम पूर्णपणे माफ केली जाईल.अंतिम मुदत: या योजनेचा लाभ घेण्याची शेवटची तारीख ३१ मार्च २०२६ ही आहे. केवळ दंडावर सूट: ही सवलत केवळ करावरील दंडासाठी (शास्ती) आहे. मूळ मालमत्ता कराच्या रकमेत कोणतीही सूट मिळणार नाही.एकरकमी भरणा: सवलतीचा लाभ घेण्यासाठी मालमत्ता धारकांना दंडाची रक्कम वगळून उर्वरित सर्व कर रक्कम एकरकमी भरणे आणि नगरपरिषद कार्यालयात लेखी अर्ज करणे आवश्यक आहे. प्रशासनाचे आवाहन: मुख्याधिकारी श्री. रमेश ढगे, नगर...

आगरी कोळी सांस्कृतिक क्रीडा मंडळ मुंबई ठाणे, पालघर विभाग

मुंबई प्रतिनीधी: (सतिश पाटील ) आगरी कोळी सांस्कृतिक क्रीडा मंडळ (मुंबई ठाणे पालघर विभाग) नियोजित २१ संघामध्ये  आई गावदेवी ४०+ मास्टर (भांडुप गाव ) आयोजित चाळीस वर्षावरील खेळाडूंसाठी आगरी कोळी चषक 2026 स्पर्धेचे आयोजन भांडुप गाव येथील भांडुपेश्वर कुंडा जवळील आदर्श क्रीडांगण येथे संपन्न झाले. सदर स्पर्धा एकूण मुंबई ठाणे पालघर विभागातील २१ गावातील संघांमध्ये भरवण्यात आली होती. सदर स्पर्धेचे भरवण्याचे मुख्य हेतू हा चाळीस वर्षे वरील खेळाडूंमधील जिद्द, चिकाटी दाखवण्याची तसेच आगरी कोळी समाजाला एकत्र बांधून ठेवण्या चा एका अतुल्य उपक्रम आहे.  सदर स्पर्धेत प्रथम पारितोषिक आई गावदेवी ४०+ भांडुप मास्टर द्वितीय पारितोषिक चिखलादेवी मास्टर कोपरी ठाणे  तृतीय पारितोषिक श्री पोषमात्रा भाईंदरपाडा मास्टर तृतीय पारितोषिक शेंडोबा कासारवडवली बी  चतुर्थ पारितोषिक श्रीराम बिलालपाडा मास्टर  चतुर्थ पारितोषिक श्री दत्तगुरु नवघर मास्टर ए या संघाने मिळाले आहे. या प्रसंगी अनेक सर्व पक्षीय नेते, मंडळास मदत करणारे दानशूर व पत्रकार यांचा सत्कार करण्यात आला.

उजनी धरणग्रस्तांच्या प्रलंबित प्रश्नांसाठी, हक्कासाठी आरपारची लढाई; निलेश देवकर यांचा सुर्लीत एल्गार

इंदापूर:-  "उजनी धरणामुळे सोलापूर जिल्हा सुजलाम सुफलाम झाला असला, तरी ज्यांच्या जमिनी या धरणात गेल्या, तो धरणग्रस्त शेतकरी आज ५० वर्षांनंतरही न्याय आणि हक्कासाठी वणवण फिरत आहे. त्यातच भर म्हणून जलसंपदा विभाग महाराष्ट्र शासन यांनी 17 जून 2019 व 8 ऑक्टोबर 2025 रोजी केलेल्या शासन निर्णयामुळे धरणग्रस्त भागातील शेतकरी व मच्छीमार यांच्यावर फार मोठा अन्याय होऊन यांना उपासमारीचे वेळ येणार आहे  आता केवळ निवेदने देऊन थांबणार नाही, तर धरणग्रस्तांच्या प्रलंबित प्रश्नांसाठी आरपारची लढाई लढली जाईल," असा इशारा रयत क्रांती संघटनेचे पुणे जिल्हाध्यक्ष तथा उजनी धरणग्रस्त बचाव संघर्ष समितीचे अध्यक्ष निलेश देवकर यांनी दिला. माढा तालुक्यातील सुर्ली येथे आयोजित 'उजनी धरणग्रस्त शेतकरी मेळाव्यात' ते मार्गदर्शक म्हणून बोलत होते. यावेळी परिसरातील शेकडो धरणग्रस्त शेतकरी उपस्थित होते..

इंदापूर तालुक्यात चिकनचे दर गगनाला भिडले; खवय्यांच्या खिशाला बसतेय कात्री

​ इंदापूर : गेल्या काही दिवसांपासून इंदापूर शहर आणि परिसरात चिकनच्या दरात मोठी वाढ झाल्याने सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले आहे. 'चिकन' हा खवय्यांच्या पसंतीचा आहार असला तरी, सध्याच्या वाढत्या किमतींमुळे मांसाहारी प्रेमींना आता विचार करावा लागत आहे. ​ दरांमध्ये मोठी वाढ ​काही दिवसांपूर्वी १५० ते १८० रुपये किलो असणारे चिकन आता चक्क  २६०  ते २८० रुपये प्रति किलोपर्यंत पोहोचले आहे. अवघ्या काही दिवसांत दरांमध्ये झालेली ही वाढ लक्षणीय मानली जात आहे. वाढत्या उन्हाचा तडाखा आणि पोल्ट्री व्यवसायातील उत्पादनात झालेली घट हे या दरवाढीचे मुख्य कारण असल्याचे व्यापाऱ्यांकडून सांगितले जात आहे. ​ उत्पादनात घट आणि उन्हाचा परिणाम ​वाढत्या तापमानामुळे कोंबड्यांच्या मरतुकीचे प्रमाण वाढले आहे, ज्याचा थेट परिणाम पुरवठ्यावर झाला आहे. तसेच, पक्षी तयार होण्यासाठी लागणारा खर्च आणि खाद्याच्या किमतीत झालेली वाढ यामुळेही दरात वाढ झाली आहे. लग्नसराई आणि इतर कार्यक्रमांमुळे चिकनची मागणी वाढलेली असतानाच पुरवठा कमी झाल्याने दर कडाडले आहेत. ​ खवय्यांची प्रतिक्रिया ​"आठवड्यातून एकदा तर...

पाणी वाचवा, जीवन वाचवा, जागतिक जल दिनानिमित्त विशेष जनजागृती

इंदापूर: "करू जल संवर्धन, सुंदर बनवू जीवन" हा संदेश देत आज जगभरात 'जागतिक जल दिन' साजरा करण्यात येत आहे. वाढते तापमान आणि घटती भूजल पातळी पाहता, पाण्याचे महत्त्व ओळखून त्याचे संवर्धन करणे ही काळाची गरज बनली आहे. ​पृथ्वीवरील पाण्याचा साठा मर्यादित असून, वाढत्या लोकसंख्येमुळे आणि हवामान बदलामुळे पाणीटंचाईची समस्या गंभीर होत चालली आहे. पाण्याचा प्रत्येक थेंब मौल्यवान असून त्याचा अपव्यय टाळणे हे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे. ​दैनंदिन जीवनात पाण्याचे नियोजन कसे कराल?  गळणारे नळ त्वरित दुरुस्त करा, जेणेकरून हजारो लिटर पाणी वाया जाणार नाही. ​ पावसाचे पाणी साठवून त्याचा पुनर्वापर करण्यावर भर द्या. ​शेतीसाठी आधुनिक तंत्रज्ञान: ठिबक आणि तुषार सिंचनाचा वापर करून पाण्याची बचत करा. ​ दात घासताना किंवा भांडी घासताना नळ विनाकारण चालू ठेवू नका. ​निसर्गाचा समतोल राखण्यासाठी आणि येणाऱ्या पिढीला पाण्याचे संकट टाळण्यासाठी आजच जलशपथ घेण्याची वेळ आली आहे. झाडे लावा आणि पाण्याचे स्त्रोत प्रदूषणमुक्त ठेवा. ​"पाणी हेच जीवन आहे, ते वाया घालवू नका. जल सं...

मयुर हाईट्स मुलाण पट्टा परिसरात रंगणार 'शिरखुर्मा पार्टी'चा गोडवा; आझम फाउंडेशनचा पुढाकार - अहेमदरजा सय्यद

इंदापूर:- रमजान ईदचा सण सर्वत्र उत्साहात साजरा होत असताना, सामाजिक सलोखा आणि आनंदाची देवाणघेवाण करण्यासाठी आझम फाउंडेशनच्या वतीने उद्या, शनिवार दिनांक २१ मार्च २०२६ रोजी भव्य शिरखुर्मा पार्टी'चे आयोजन करण्यात आले आहे. ​दरवर्षीप्रमाणे यावर्षीही फाउंडेशनने परंपरेनुसार या स्नेहसंमेलनाचे आयोजन केले आहे. हा कार्यक्रम मुलाणपट्टा येथील जुम्मा मशिदी शेजारी, मयूर हाईट्स अपार्टमेंट येथे पार पडणार आहे. शनिवार सकाळी ११:०० वाजल्यापासून शिरखुर्मा पार्टीला सुरुवात होईल.​या कार्यक्रमाचे मुख्य आयोजक आझम फाउंडेशनचे अध्यक्ष अहेमदरज (तशुभाई) इक्बाल सय्यद आणि उपाध्यक्ष इमरानभाई अब्दुलहक शेख आहेत. फाउंडेशनच्या वतीने परिसरातील सर्व नागरिकांना या कार्यक्रमास उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवण्याचे आणि ईदचा आनंद द्विगुणित करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ​"रमजान ईदनिमित्त आयोजित ही शिरखुर्मा पार्टी केवळ गोड मेजवानी नसून, ती आपापसातील प्रेम आणि बंधुभाव वाढवण्याचे एक माध्यम आहे," असे मत अहेमदरजा सय्यद  आयोजकांनी व्यक्त केले आहे..

कर्मयोगी सह.साखर साखर कारखान्याची ऊसाची बिले ओंकार शुगर युनिट ने थकवली; इंदापूरच्या बाजारपेठेत शुकशुकाट, बळीराजा मेटाकुटीला,

इंदापूर: कर्मयोगी सहकारी साखर कारखाना संचलित आणि बाबूराव बोत्रे यांच्या व्यवस्थापनाखाली सुरू असलेल्या ओंकार शुगर युनिटने शेतकऱ्यांच्या ऊसाची बीले वेळेवर न दिल्याने इंदापूर तालुक्यात संतापाची लाट उसळली. . साखर कारखाना हा ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असतो. उसाचे पैसे वेळेवर आले की बाजारपेठेत मोठी उलाढाल होते. मात्र, कर्मयोगी कारखान्याने बिले थकवल्यामुळे शेतकऱ्यांचे नियोजन कोलमडले ,  ऐन गुडीपाडव्याच्या सनाच्या काळात हातात पैसा नसल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडले, असून, याचा थेट परिणाम इंदापूरच्या बाजारपेठेवर झाला आहे. ग्राहकांअभावी बाजारपेठेत सध्या पूर्णपणे 'शुकशुकाट' पाहायला मिळत आहे. लोक म्हणतात खोकला गेला आणि दुखणं आलं , शेतकऱ्यांची अवस्था बिकट,झाली, उन्हाळ्याची चाहूल लागत असताना आणि पुढील पिकांच्या नियोजनासाठी पैशांची गरज असताना, हक्काचे ऊसाचे पैसे न मिळाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. मुलांचे शिक्षण, मुलींच्या डिलिव्हरी साठी दवाखान्यात भरायला पैसेच नाहीत, असुन अडचण नसून खोळंबा हक्काचा पैसा मिळत नसल्याने बापाला सावकारांच्या घराचा दरवाजा ठोठावण्याची व...

इंदापुरात 'जागतिक चिमणी दिन' उत्साहात साजरा; कृत्रिम घरटी आणि दाणा-पाणी पात्रांचे वाटप

इंदापूर: वाढते शहरीकरण आणि वृक्षतोडीमुळे नामशेष होत चाललेल्या चिमण्यांच्या संवर्धनासाठी इंदापूर नगरपरिषदेने पुढाकार घेतला आहे. २० मार्च 'जागतिक चिमणी दिनाचे औचित्य साधून श्री.भरतशेठ शहा , नगराध्यक्ष नगरपरिषद इंदापूर सर्व पदाधिकारी आणि विविध वृक्षप्रेमी सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने विद्या प्रतिष्ठान इंग्लिश मीडियम स्कूलच्या सहकार्याने विविध पर्यावरणपूरक उपक्रम उत्साहात राबविण्यात आले. ​या कार्यक्रमांतर्गत चिमण्यांना सुरक्षित निवारा मिळावा यासाठी शाळेच्या परिसरात आणि शहराच्या विविध भागात कृत्रिम घरटी बसविण्यात आली. वाढत्या उन्हाची तीव्रता लक्षात घेता, पक्ष्यांची तहान भागवण्यासाठी दाणा-पाणी पात्रांची व्यवस्था करण्यात आली. तसेच, पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी उपस्थित नागरिकांना व विद्यार्थ्यांना वृक्ष रोपांचे वाटप करण्यात आले. ​" चिमणी हा आपल्या निसर्गचक्राचा महत्त्वाचा दुवा आहे. चिमण्यांचे संरक्षण करणे ही केवळ प्रशासनाचीच नव्हे, तर आपल्या सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. पर्यावरणाच्या संवर्धनासाठी आपण सर्वांनी एकत्र येणे काळाची गरज आहे." ​सामूहिक सहभागा...

मुख्यमंत्र्यांसमवेत साखर उद्योगातील विविध घटकांच्या अडचणीसंदर्भात सोमवारी मुंबईत बैठक -हर्षवर्धन पाटील

इंदापूर : प्रतिनिधी दि. 18/3/26                                                  राज्यातील साखर उद्योगातील ऊस उत्पादक शेतकरी, साखर कामगार, ऊस तोडणी मजूर व वाहतूकदार आदी विविध घटकांच्या संदर्भात निर्माण झालेल्या अडचणीसंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अध्यक्षतेखाली बैठकीचे मुंबईत सोमवारी (दि. 23 ) आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अडचणी जाणून घेऊन सकारात्मक निर्णय घेतील, अशी अपेक्षा राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी मंगळवारी व्यक्त केली.     या बैठकी संदर्भात माहिती देताना हर्षवर्धन पाटील पुढे म्हणाले, महाराष्ट्रातील साखर उद्योग हा ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असून, “सामाजिक-आर्थिक उद्योग” म्हणून विकसित झाला आहे. साखर कारखाने हे फक्त उत्पादन केंद्र नसून ग्रामीण विकासाची केंद्रे आहेत. मात्र बदलत्या काळात साखर कारखानदारी समोरील अडचणी वाढत असून त्यामुळे सुम...

वाल्हेत काँग्रेस कमिटीकडून निषेध आंदोलन

वाल्हे प्रतिनिधी - सिकंदर नदाफ  राजकीय चळवळीचे केंद्रबिंदू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुरंदर तालुक्यातील वाल्हे गावात काँग्रेस कमिटीकडून गॅसच्या किमतीत झालेली प्रचंड दरवाढ तसेच गॅस वितरण व्यवस्थेतील ढिसाळ नियोजन व राज्य शासनाने जाहीर केलेल्या शेतकऱ्यांच्या फसव्या कर्जमाफीच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आले. यावेळी काँग्रेस कमिटीच्या पदाधिकाऱ्यांकडून आठवडे बाजाराचे औचित्य साधून येथील शहीद शंकर शिंदे चौकात शांततापूर्ण व संविधानात्मक मार्गाने आंदोलनास सुरवात करण्यात आली .या दरम्यान युवा नेते सुनील असवलीकर प्रा. सचिन दुर्गाडे यांसह काँग्रेस ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र बरकडे काँग्रेस कमिटीचे तालुकाध्यक्ष साहेबराव फडतरे सेवा दलाचे बापूसाहेब मोकाशी सामाजिक कार्यकर्ते ऍड. फत्तेसिंग पवार अतिश जगताप तसेच ऍड. किरण कुमठेकर माऊली बोराडे सूरज जगदाळे यांसह आदी कार्यकर्त्यांनी गॅस व शेती खतांची झालेली दरवाढ तसेच राज्य शासनाने अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेली कर्जमाफी ही अक्षरशः फसवी असल्याचा आरोप करत केंद्र तसेच राज्य सरकारचा निषेध व्यक्त केला तसेच सरकार विरोधात जोरदार घोषणाब...

लोकनेते प्रदीप (दादा) गारटकर मित्र परिवारातर्फे इफ्तार पार्टीचे उत्साहात आयोजन सलग ३६ वर्षांची सामाजिक सलोख्याची परंपरा कायम

इंदापूर:- जनसामान्यांचे नेते श्री. प्रदीप (दादा) गारटकर यांच्या मार्गदर्शनाखाली, 'प्रदीप (दादा) गारटकर मित्र परिवारा'च्या वतीने यावर्षीही पवित्र रमजान महिन्यानिमित्त भव्य 'रोजा इफ्तार' पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. गेल्या ३६ वर्षांपासून सालाबादप्रमाणे ही परंपरा अविरतपणे सुरू असून, या कार्यक्रमातून सर्वधर्मसमभावाचा आणि सामाजिक सलोख्याचा संदेश पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे.मुस्लिम समाजाला रोजा इफ्तार पार्टीचे आयोजन 13/3/2026. शुक्रवार रोजी करण्यात आले इफ्तार पार्टी आयोजनाचे यावर्षी 36 वे वर्ष होते यावेळी मोठ्या प्रमाणावर इंदापूर शहर तथा तालुक्यातील मुस्लिम समाज उपस्थित होता इंदापूर शहरातील सर्व 14 मशिदीचे 18 मौलाना सहाब यांचा मा. प्रदीप (दादा) गारटकर यांच्या हस्ते येतोचित असा सन्मान (गुलपोशी) करण्यात आला   राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात सक्रिय असतानाही, गारटकर मित्र परिवाराने गेल्या साडेतीन दशकांपासून ही धार्मिक एकात्मतेची परंपरा जोपासली स्थानिक भागातील मुस्लिम समाजातील ज्येष्ठ नागरिक, तरुण आणि रोजेदार मोठ्या संख्येने या इफ्तार पार्टीला उपस्थित ह...

इंदापूर तालुक्यातील हिंदू-मुस्लीम ऐक्य राज्यात आदर्श- हर्षवर्धन पाटील-बावडा येथे इफ्तार पार्टी

इंदापूर : प्रतिनिधी दि.16/3/26                                       इंदापूर तालुक्यामध्ये पिढ्यान पिढ्यांपासून हिंदू-मुस्लीम समाज हा बंधुभावाने राहत असून, एकमेकांच्या सुख दुखात नेहमीच सहभागी राहिलेला आहे. इंदापूर तालुक्यातील हिंदू-मुस्लीम एकोपा राज्यामध्ये आदर्श असल्याचे प्रतिपादन राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ नवी दिल्लीचे अध्यक्ष व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी रविवारी (दि.15) केले.           बावडा येथे जामा मस्जिदमध्ये हर्षवर्धन पाटील यांचे उपस्थितीमध्ये ईफ्तार पार्टीचे  आयोजन करण्यात आले होते. यावेळी हर्षवर्धन पाटील बोलत होते.        ते पुढे म्हणाले, स्वतःच्या गावातील इफ्तार पार्टीला उपस्थित राहण्यास वेगळाच आनंद असतो. आपण कायमच सर्वधर्मसमभावाच्या मूल्यांची जोपासना करीत राजकारण, समाजकारण केले आहे, करीत आहोत. जगातील कोणताही धर्म असो तो माणुसकीची शिकवण देतो, असे हर्षवर्धन पाटील यांनी नमूद केले.  बावडा ग...

युद्धाच्या पार्श्वभूमीवर केंद्राने साखर कारखान्यांचा इथेनॉल कोटा वाढवावा- हर्षवर्धन पाटील-साखर निर्यातीसाठीही मदतीची गरज

                                                 इंदापूर:- सध्या आखाती देशात चालु असलेल्या युद्धामुळे क्रूड ऑइलच्या दरात वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर पेट्रोलियम नैसर्गिक वायू मंत्रालयाने जाहीर केलेल्या दि. 1 एप्रिलपासूनच्या नवीन धोरणानुसार पेट्रोलमध्ये 20 टक्के इथेनॉल मिश्रणासाठी साखर कारखान्यांना इथेनॉलचा कोटा तातडीने वाढवून द्यावा, परिणामी, इथेनॉल मिश्रणामुळे पेट्रोल दरवाढीसंदर्भात जनतेला काही प्रमाणात दिलासा मिळु शकेल. तसेच साखरेच्या निर्याती संदर्भातही केंद्र सरकारकडून मदतीची गरज असल्याचे प्रतिपादन राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ नवी दिल्लीचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी बुधवारी केले.        राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाने पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांचेकडे देशातील साखर कारखान्यासंदर्भात विविध मागण्या करून तातडीने निर्णय घ्यावेत, अशी विनंती केली आहे, असे हर्षवर्धन पाटील य...

वाल्हेत संजय जगताप मित्र परिवारातर्फे इप्तार पार्टी

वाल्हे प्रतिनिधी : सिकंदर नदाफ रमजान महिन्याचे औचित्य साधून माजी आमदार संजय चंदुकाका जगताप मित्र परिवारातर्फे वाल्हे ( ता.पुरंदर ) येथील शाही सुन्नी मशिदीत सालाबादप्रमाणे रोजा इप्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी मुस्लीम बांधवांसह महिला वर्गाने देखील रोजा इप्तार पार्टीत उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दर्शविल्याने मस्जिद परिसर अक्षरशः गजबजून गेला होता.  यावेळी संजय जगताप मित्र परिवारातर्फे मुस्लीम समाजातील उपवास धारकांना रोजा इप्तारीसाठी सरबत मिठाईसह फळांचे वाटप करण्यात आले.त्यानंतर मगरीबची नमाज अदा झाल्यावर रोजा इप्तार पार्टी उत्साही वातावरणात साजरी करण्यात आल्याने मुस्लीम समाजातआनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. अशातच जातीय सलोखा अबाधित रहावा तसेच मित्रत्वाची भावना देखील वाढली पाहिजे या उद्देशाने माजी आमदार संजय जगताप मित्र परिवाराकडून पुरंदर हवेलीतील जवळपास सर्व मशिदीत इप्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती अल्पसंख्यांक विभागाचे तालुकाध्यक्ष मोबीन बागवान यांनी दिली. या प्रसंगी मुस्लिम समाजाचे चांदभाई इनामदार आरिफ आतार आयुब इनामदार अरबाज नदाफ शौकत शेख आयान ...

भारतीय क्रिकेट संघाचा विजय प्रत्येक भारतीयासाठी अभिमानास्पद नगराध्यक्ष मा.भरतशेठ शहा,

 इंदापूर :- टी-२० क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत न्यूझीलंड संघाचा  पराभव करून विश्वविजेतेपद पटकावणाऱ्या भारतीय क्रिकेट संघाचे नगराध्यक्ष मा.भरतशेठ शहा, यांनी मनःपूर्वक अभिनंदन केले आहे. इंदापूर तालुक्यातील सर्वच गावातील जनतेत आनंदोत्सव साजरा करण्यात आला,विविध भागात अबालवृध्द चौकाचौकात मोठ्या स्क्रिनवर मॅच पाहण्याचा आनंद घेत होते, हि मॅच पाहतानाचा आनंद गगनात मावत नव्हता,आपण जिंकणारच आसे सगळेच बोलत होते,खेळाडूंनी त्यांची इच्छा पुर्ण केली,सलाम त्यांच्या कार्याला,आसे नगराध्यक्ष मा.भरतशेठ शहा ,म्हणाले की, आपल्या संदेशात म्हणाले की, भारतीय संघाने संपूर्ण टी-२० विश्वचषक स्पर्धेत सातत्यपूर्ण आणि उत्कृष्ट कामगिरी करत अंतिम सामन्यात न्यूझीलंडवर दणदणीत विजय मिळवला. खेळाडूंनी दाखवलेली जिद्द, संघभावना आणि समर्पित खेळभावना ही संपूर्ण देशातील क्रीडाप्रेमींसाठी अभिमानाची बाब आहे.या ऐतिहासिक विजयामुळे देशभर आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून भारतीय संघाने तिसऱ्यांदा टी-२० विश्वचषकावर आपले नाव कोरले असून भारताचा तिरंगा जगभर अभिमानाने फडकावला आहे.शिवसृष्टी न्यूज शी बोलताना नगराध्यक्ष मा.भर...

वाल्हेत उदयगिरी फाउंडेशनतर्फे कर्तृत्ववान महिलांचा सन्मान

वाल्हे प्रतिनिधी: सिकंदर नदाफ  सामाजिक चळवळीचे केंद्रबिंदू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुरंदर तालुक्यातील वाल्हे गावात उदयगिरी सोशल फाउंडेशन व नाना दाते मित्र परिवारातर्फे जागतिक महिला दिनानिमित्त कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्यात आला . यावेळी वाल्हे ग्रामपंचायत नजीक शाहू फुले आंबेडकर अभ्यासिकेच्या सभागृहासमोर वृक्षारोपण करूनच या सन्मान सोहळ्याला सुरवात करण्यात आली.या कार्यक्रमात जेजुरी पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षक दिपाली पवार यांसह लेखिका राधिका घोरपडे जिल्हा परिषदेच्या नवनिर्वाचित सदस्या डॉ. प्राजक्ता दुर्गाडे विधितज्ञ प्रिया दरेकर माय मराठी संघाच्या कल्पना शेरे माजी उपसरपंच सम्राज्ञी लंबाते तसेच दिपाली नलावडे धनश्री कसेकर गीता नांगरे आदी महिलांना विविध मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र तसेच पुस्तक देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. याप्रसंगी वाल्हे गावचे सरपंच अतुल गायकवाड उपसरपंच सागर भुजबळ सामाजिक कार्यकर्ते नाना दाते उदयगिरी फाउंडेशनचे शिवशंकर मोरे सचिन म्हसे तसेच सतीश पवार असलम नदाफ दिगंबर दाते आदी मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्र...

इंदापूर येथील हर्ष शिंदे सनदी लेखपाल परीक्षा उत्तीर्ण

इंदापूर : प्रतिनिधी दि.3/3/26                              इंदापूर येथील हर्ष प्रतीक शिंदे हे सनदी लेखपाल (सी. ए.) परीक्षा उत्तीर्ण झाले आहे. हर्ष शिंदे यांनी राष्ट्रीय स्तरावरील इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (ICAI) ची सी. ए. फायनल परीक्षा उत्तीर्ण होऊन हे प्रतिष्ठेचे यश संपादन केले आहे.     हर्ष शिंदे यांचे पूर्व प्राथमिकचे शिक्षण इंदापूर येथील गारटकर इंग्लिश मिडीयम स्कूल येथे तर प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विद्या प्रतिष्ठानचे इंग्लिश मिडीयम स्कूल इंदापूर येथे झाले. तर उच्च माध्यमिक व वाणिज्य पदवीचे शिक्षण पुणे येथील मराठवाडा मित्र मंडळाच्या महाविद्यालय व कॉलेजमध्ये झाले. हर्ष शिंदे हे एल.आय.सी.चे इंदापूर येथील सेवानिवृत्त विकास अधिकारी प्रतिक सुधाकर शिंदे यांचे चिरंजीव आहेत. दरम्यान, इंदापूरचे सुपुत्र हर्ष शिंदे हे सीए झालेबद्दल त्यांचे अभिनंदन केले जात आहे.

उपबाजार भिगवणमध्ये नविन ज्वारी प्रति क्विंटल रु. 6,101/- उच्चांकी दराने विक्री- सभापती श्री. तुषार जाधव

इंदापूर तालुक्यातील उपबाजार भिगवण भुसार, मासे(मासळी) व शेळी-मेंढी बाजाराकरीता प्रसिद्ध बाजारपेठ आहे. इंदापूर बाजार समितीच्या मुख्य व उपबाजाराच्या ठिकाणी शेतमाल उघड लिलावाने विक्री, चोख वजनमाप व विक्रीनंतर शेतकऱ्यांना हिशोबपट्टी, त्वरीत रक्कम अदा केली जाते. बाजार समितीने उपबाजार भिगवण 60 मे. टन व राशीन रोडलगत बाजार आवारात 100 मे. टन क्षमतेचे भुईकाटा (वे-ब्रिज) असुन त्यांची 24 तास सेवा उपलब्ध आहे. *सद्या मका शेतमालाचे दर कमी झाल्याने इंदापूर बाजार समितीने मका हमीभाव दरात खरेदी केंद्र सुरु केल्याने शेतकरी समाधान व्यक्त करीत आहेत. असे मत बाजार समितीचे मार्गदर्शक पुणे जिल्हा बँकेचे संचालक तथा माजी सभापती श्री. आप्पासाहेब जगदाळे यांनी व्यक्त केले आहे.*        *उपबाजार भिगवण येथील भुसार मार्केटमध्ये रविवार दि. 01 मार्च-2026 रोजी नविन ज्वारीची, गहू व हरभरा शेतमाल आवक सुरु झालेली आहे. श्री. दिपक मचाले यांच्या आडतीवर ज्वारीला प्रति क्विंटल रु. 6,101/- अश्या उच्चांकी दराने श्री. महावीर वडुजकर यांनी खरेदी केली.* भुसार शेतमाल खरेदीकरीता श्री. बाळासाहेब फराटे, श्री. ...