इंदापूर क्रांतीसूर्य महात्मा जोतिबा फुले जयंती उत्साहात साजरी
यांच्या १९९ व्या जयंती निमित्त अभिवादन करण्यात आले..
इंडियन युथ आयकॉन 2026 हा अंबुज चित्रपटाचे दिग्दर्शक नरेंद्र गायकवाड यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल इंदापूर शहर नागरी संघर्ष समितीच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आला.
या वेळी बोलताना प्राकृष्णा ताटे म्हणाले की नरेंद्र गायकवाड यांनी इंदापूरच्या सुवर्णमय इतिहासाला उजळा दिला असून इंदापूर शहराने यापुर्वी इतिहासामध्ये अनेक लेखक, चित्रपट निर्माते, चित्रपट दिग्दर्शक, गायक, कवियत्री दिले आहेत यामध्ये ग .प . प्रधान ,शांता शेळके, यु . म . पठाण' प्रतिभाताई गारटकर, अरुण ढवळे यासारखे नामवंत लेखक चित्रपट दिग्दर्शक शृंखलेमध्ये नरेंद्र गायकवाड यांनी सर्वसामान्य गरीब दलित माणसाच्या जीवनाचे चित्रण करून एक उत्तम" अंबुज " नावाचा चित्रपट दिला त्या चित्रपटाला उत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून युथ इंडियन आयकॉन 2026 हा पुरस्कार त्यांना मिळाला . त्याबद्दल इंदापूर शहरवासीयांच्या वतीने त्यांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन
यावेळी संघर्ष समितीचे हमीदभाई आत्तार , कवी महादेव चव्हाण, भीमराव चव्हाण, भाऊसाहेब खबाले , चंद्रकांत देवकर , अशोक अनपट ,गोरख पवार, नंदू खरवडे, वसंत जाधव अविनाश देशमाने इत्यादी सह अनेक मान्यवर उपस्थित होते .
तसेच महात्मा फुले पुतळा परिसरातील झाडांना पाणी देऊन व महात्मा फुलेंच्या पुतळ्यास दररोज पुष्पहार घालून परिसर स्वच्छ ठेवण्याचे काम गेली र६ वर्षापासून करित असलेल्या संघर्ष समितीचे श्री दादा साहेब देवकर यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला .
टिप्पण्या