कोरोनाची लाट काहीशी अल्प प्रमाणात ओसरत चालली असली, तरी मात्र धोका टळलेला नाही-दत्तात्रय भरणे इंदापूरः कोरोना होऊन गेलेल्या व्यक्तींना म्युकरमायकोसिस हा आजार होत असून यासाठी तालुक्यात सहा दिवसांचे शिबीर लावून त्यांची आरोग्य तपासणी करुन घ्यावी तसेच कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांना लागण होऊ नये म्हणून त्यांच्या पालकांना याबाबतची काळजी घेण्यासाठी माहिती पुस्तिका व पत्रके काढण्याचे आदेश राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले. ते शनिवारी दि.29 रोजी जिल्हा बँकेच्या सभागृहात झालेल्या कोरोना आढावा बैठकीत बोलत होते. यावेळी पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर,तहसीलदार अनिल ठोंबरे, गटविकास अधिकारी विजयकुमार परीट, पंचायत समिती सभापती स्वाती शेंडे,उपसभापती संजय देहाडे,नगराध्यक्षा अंकिता शहा,इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव मुकुंद शहा,माजी जि.प.सदस्य प्रतापराव पाटील, वसंत आरडे सरचिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस पुणे जिल्हा, श्रीधर बाब्रस मा.नगरसेवक इंदापूर, पुणे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सचिन सपकळ,पुणे जिल्हा कुस्तीगिर संघाचे सदस्य महेंद्...
SHIVSRUSTHI NEWS