राष्ट्रवादी माथाडी व जनरल कामगार युनियनच्या पिंपरी चिंचवड शहराध्यक्षपदी उषा श्रीकांत कोपुलवार यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.यावेळी संघटनेचे अध्यक्ष उमेश पाटील यांनी पत्राद्वारे सदरची निवड जाहीर केली असून या निवडीमुळे कामगार चळवळीला नव्याने बळ मिळणार असल्याची भावना सर्वसामान्य वर्गामधून व्यक्त केली जात आहे.
पिंपरी चिंचवड शहरात गेल्या अनेक वर्षांपासून उषा कोपुलवार यांनी सामाजिक तसेच राजकीय क्षेत्रात देखील आपल्या नावाचा आगळा वेगळा ठसा उमटविला होता. त्यांच्या कार्याची दखल घेऊनच राष्ट्रवादी माथाडी व जनरल कामगार युनियनच्या पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष पदाची जवाबदारी त्यांना देण्यात आली असल्याची माहिती संघटनेचे महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष उमेश पाटील तसेच कार्याध्यक्ष महेश पाटील व सरचिटणीस प्रसाद तनपुरे यांनी दिली.
तर या निवडीबद्दल सामाजिक कार्यकर्ते मनोज साळवे राकेश वाघमारे अतुल चव्हाण रवी शिंगे गणेश गायकवाड विजय राठोड राजन नायर स्वाती शिंगे आरपीआयचे अध्यक्ष शैलेंद्र भोसले यांसह विविध सामाजिक संघटनेच्या वतीने उषा कोपुलवार यांचा विशेष सत्कार देखील करण्यात आला.
या दरम्यान सत्काराला प्रतिउत्तर देताना उषा कोपुलवार म्हणाल्या संघटनेकडून दिलेल्या जवाबदारीतून कामगारांचे प्रतिनिधित्व करण्याबरोबरच त्यांच्या न्याय हक्कासाठी वेळप्रसंगी लढा देखील उभारणार आहे.
टिप्पण्या