स्वरसम्राज्ञी आशा भोसले यांचे निधन; इंदापूरचे नगराध्यक्ष मा.भरतभाऊ शहा यांच्याकडून भावपूर्ण श्रद्धांजली
इंदापूर:भारतीय संगीत क्षेत्रातील एक अढळ तारा आणि कोट्यवधी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचे दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने संगीत क्षेत्राची कधीही न भरून निघणारी हानी झाली असून, संपूर्ण देशात शोककळा पसरली आहे.
इंदापूर नगरपरिषदेचे नगराध्यक्ष मा. भरतभाऊ शहा यांनी आशा भोसले यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त करत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.
श्रद्धांजली वाहताना भरतभाऊ शहा म्हणाले की आशाताईंचे जाणे हे केवळ संगीत क्षेत्राचेच नव्हे, तर प्रत्येक भारतीयाचे वैयक्तिक नुकसान आहे. त्यांनी आपल्या मंत्रमुग्ध करणाऱ्या आवाजाने अनेक पिढ्यांना आनंद दिला. त्यांच्या गायकीतील वैविध्य आणि ऊर्जा नेहमीच प्रेरणादायी राहील. परमेश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो आणि त्यांच्या परिवाराला या दुःखातून सावरण्याची शक्ती देवो.
आशा भोसले यांनी केवळ मराठी आणि हिंदीच नव्हे, तर विविध भाषांमध्ये हजारो गाणी गायली आहेत. त्यांच्या निधनामुळे भारतीय संगीतातील 'आशा' नावाचा एक सुवर्णकाळ संपल्याची भावना सर्वत्र व्यक्त होत आहे.
टिप्पण्या