मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

मे, २०२६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

इंदापूर शहरातील प्रत्येक प्रभाग स्वच्छ व सुंदर करण्यासाठी नगरपरिषद कटिबद्ध : नगराध्यक्ष भरतभाऊ शहा

स्वच्छ सर्वेक्षण २०२६' आणि 'माझी वसुंधरा अभियान अंतर्गत इंदापूर शहरातील व्यंकटेशनगर परिसर नगरपरिषदेकडून चकाचक इंदापूर :- शहरातील प्रत्येक प्रभागामध्ये व्यापक स्वच्छता अभियान राबवून शहर स्वच्छ, सुंदर आणि आरोग्यदायी करण्यासाठी नगरपरिषद पूर्णपणे कटिबद्ध असल्याची ग्वाही इंदापूर नगर परिषदेचे नगराध्यक्ष भरत शहा यांनी दिली. केंद्र सरकारच्या 'स्वच्छ सर्वेक्षण २०२६' मिशन लाईफ' आणि राज्य सरकारच्या 'माझी वसुंधरा अभियान अंतर्गत प्रभाग क्रमांक सातमधील व्यंकटेशनगर परिसरात आयोजित विशेष 'स्वच्छता मोहिमेच्या' प्रसंगी ते बोलत होते. या पालिकेने शहराला देशपातळीवर आघाडीवर नेण्यासाठी हे कंबरकसून नियोजन केले आहे. इंदापूर नगर परिषदेच्या वतीने शहरामध्ये, स्वच्छ इंदापूर ! सुंदर इंदापूर !! हरित इंदापूर !!!"या त्रिसूत्री संकल्पनेतून विविध प्रभागांमध्ये अत्यंत गतिमान पद्धतीने स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली आहे. त्याचाच एक भाग म्हणून व्यंकटेश नगर परिसरात मोठ्या प्रमाणावर साफसफाई करण्यात आली. या मोहिमेदरम्यान श्री बालाजी मंदिर परिसर, टाऊन हॉल परिसर, शिकलक...

तालुक्यातील 'सहकार सम्राटाचा' माज मोडूनच काढणार..! मयूरसिंह पाटलांच्या व्हाट्सॲप स्टेटसने इंदापुरात खळबळ

इंदापूर :राजकारणात कधी काय होईल याचा नेम नसतो, पण सध्या इंदापूर तालुक्यात नेत्यांच्या भाषणांपेक्षा त्यांच्या 'व्हाट्सॲप स्टेटस'चीच जास्त चर्चा रंगू लागली आहे. माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे चुलत बंधू मयूरसिंह पाटील यांनी आपल्या व्हाट्सॲपवर ठेवलेल्या एका स्टेटसने सध्या इंदापूरच्या राजकीय गल्लीबोळांमध्ये चांगलाच उन्हाळा वाढवला आहे.मयूरसिंह पाटील यांनी आपल्या स्टेटसवर भगव्या बॅकग्राउंडवर थेट आणि धारदार शब्दांत लिहिलंय"तालुक्यातील सहकार सम्राटाचा माज मोडूनच काढणार..!केवळ एका ओळीच्या या स्टेटसने तालुक्याच्या राजकारणात 'न भूतो न भविष्यती' असा भूकंप आणला आहे. अवघ्या काही मिनिटांतच या स्टेटसचे स्क्रीनशॉट संपूर्ण इंदापूर तालुक्यात वाऱ्यासारखे व्हायरल झाले आहेत.मयूरसिंह पाटील यांनी थेट नाव न घेता 'सहकार सम्राट' असा उल्लेख केल्यामुळे आता हा बाण नक्की कोणाच्या दिशेने सुटलाय, यावर चौकाचौकांत पैजा लागल्या आहेत. तालुक्यात सहकार क्षेत्रावर वर्चस्व असणाऱ्या कोणत्या मोठ्या नेत्याला मयूरसिंह यांनी हा थेट इशारा दिला आहे? आणि हा 'माज' नक्की कसा मोडला जाणा...

*पंतप्रधानांच्या 'हरित वाहतूक' आवाहनाला राजवर्धन पाटील यांचा सकारात्मक प्रतिसाद; पर्यावरण रक्षणासाठी इलेक्ट्रिक वाहनाचा वापर सुरू!

 इंदापूर  देशाचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी केलेल्या पर्यावरणपूरक वाहतुकीच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत इंदापूरचे युवा नेते राजवर्धन हर्षवर्धन पाटील यांनी एक कौतुकास्पद पाऊल उचलले आहे. "हरित वाहतूक"आणि इंधन बचतीच्या दृष्टीने त्यांनी आपल्या सेवेत नवीन इलेक्ट्रिक वाहन  दाखल केले असून, आजपासून त्याचा प्रत्यक्ष वापर करण्यास सुरुवात केली आहे. पर्यावरण संवर्धन, वाढते प्रदूषण आणि पारंपारिक इंधनाचा तुटवडा या पार्श्वभूमीवर राजवर्धन पाटील यांनी घेतलेला हा निर्णय सध्या मतदारसंघात विशेष चर्चेचा आणि कौतुकाचा विषय ठरत आहे.याप्रसंगी बोलताना राजवर्धन पाटील म्हणाले की, "पर्यावरण संरक्षण, इंधन बचत आणि प्रदूषणमुक्त भारताच्या निर्मितीसाठी इलेक्ट्रिक वाहनांचा वापर ही आजच्या काळाची गरज बनली आहे. स्वच्छ आणि हरित भविष्यासाठी आपण सर्वांनीही शक्य तितक्या प्रमाणात इलेक्ट्रिक वाहनांचा स्वीकार करावा. वाढत्या वायुप्रदूषणामुळे आणि इंधनाच्या गगनाला भिडलेल्या किंमतींमुळे जगभरात आता पर्यायी ऊर्जेचा वापर वाढवण्यावर भर दिला जात आहे. अशातच, इंदापूर तालुक्यातील एका अग्रगण्य युवा ...

इंदापुरात ‘स्क्रिप्टेड गुन्हेगारी’चा महाधमाका! "तक्रारी तयार करा, गुन्हे लावा आणि वसुली करा"; कोर्टाच्या आदेशाने ‘खाकी’ आणि ‘झारीतील शुक्राचार्यांचे’ धाबे दणाणले!

*इंदापूर (विशेष प्रतिनिधी): चित्रपटात दिग्दर्शक जशी स्क्रिप्ट लिहितो, तशीच काहीशी 'क्राईम स्क्रिप्ट' इंदापुरात लिहिली जात असल्याचा एक अंगावर काटा आणणारा प्रकार उघडकीस आला आहे! प्रतिष्ठित नागरिकांना खोट्या गुन्ह्यांत अडकवायचे, पुरावे प्लांट करायचे आणि मग दबावाचे राजकारण करायचे... असा हा इंदापूर पॅटर्न! पण म्हणतात ना, "कायद्याचे हात लांब असतात", अखेर इंदापूर न्यायालयाने या ‘स्क्रिप्टेड’ प्रकरणाची गंभीर दखल घेत तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक महेंद्र निंबाळकर यांच्या चौकशीचे थेट आदेश दिले आहेत. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी प्र. चं. बारटक्के यांनी दिलेल्या या दणक्यामुळे इंदापूरच्या पोलीस वर्तुळात आणि तथाकथित सामाजिक कार्यकर्त्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणाची कथा २०१८ पासून सुरू होते. इंदापूर शहरातील नामांकित क्रिटी केअर हॉस्पिटलचे संचालक गोरख भोसले यांना फसवणुकीच्या खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा विडाच जणू तत्कालीन एपीआय महेंद्र निंबाळकर यांनी उचलला होता. यासाठी त्यांनी औंध येथील जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयातील अव्वल कारकून 'झेंडे' यांना व्हॉट्सअॅप...

पुणे-सोलापूर हायवेवर 'पाणी वाहून जाण्यासाठी आसणारे,, ; ढाबेवाले अन् हॉटेलचालकांनी साईट गटारेच गिळली

इंदापूर,:- पावसाळा तोंडावर आला की शासकीय पातळीवर नालेसफाई आणि पाणी वाहून जाण्यासाठी 'पावसाळापूर्व कामांची' लगबग सुरू होते. पण पुणे-सोलापूर महामार्गावर सध्या भलताच 'सांस्कृतिक आणि व्यापारी' प्रयोग पाहायला मिळतोय. महामार्गावरून पाणी सुसाट वाहून जावे म्हणून काढलेल्या साईड चाऱ्या (गटारे) महाभागांनी चक्क गायब केल्या आहेत. होय, गायब! रस्ता कडेच्या काही अपवादात्मक ढाबेवाल्यांनी, पेट्रोल पंप मालकांनी आणि हॉटेलचालकांनी आपल्या ग्राहकांच्या गाड्या आरामात लागाव्यात म्हणून या चाऱ्यांवर चक्क माती आणि मुरूम टाकून त्या बुजवून टाकल्या आहेत. आता हॉटेलमध्ये 'स्पेशल मटण थाळी' किंवा 'चिकन हंडी' ओरपायला येणाऱ्या गिऱ्हाइकांना गटारावरून उडी मारत कसं आणणार? हा विचार करून या चालकांनी 'आपला विकास, हायवेचा विनाश' हे धोरण राबवलेलं दिसतंय. पण यामुळे येत्या पावसाळ्यात महामार्गावर 'जलतरण तलाव' तयार होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. प्रशासकीय अधिकारी अ‍ॅक्शन मोडमध्ये! या गंभीर प्रकाराची दखल सरडेवाडी टोलनाक्यावरील प्रशासकीय अधिकाऱ्यांनी घेतली आहे. त्यांनी...

साखर उद्योगासाठी केंद्र सरकारकडून दिलासादायक निर्णय; अमित शहा यांची ग्वाही -हर्षवर्धन पाटील यांची माहिती

मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळ भेटले  -अमित शहां समोर हर्षवर्धन पाटील यांनी मांडल्या मागण्या इंदापूर : प्रतिनिधी दि. 27/5/26                                    केंद्र सरकारकडून इथेनॉल प्रकल्प विस्तारीकरणासाठीची व्याज सवलत योजनेतील देय व्याजाची रक्कम रू. 1400 कोटी तात्काळ अदा केली जाईल तसेच इथेनॉल दरवाढ व साखरेची विक्री किंमत रू. 43 करणे आदी मागण्यांसंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेशी चर्चा करून 10 दिवसात दिलासादायक निर्णय घेऊ, अशी ग्वाही केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भेटलेल्या साखर उद्योगाच्या शिष्टमंडळास नवी दिल्ली येथे बुधवारी (दि. 27) दिली. केंद्र सरकारच्या सकारात्मक भूमिकेमुळे देशातील साखर उद्योग अडचणीतून निश्चितपणे बाहेर पडेल, अशी माहिती राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी बैठकीनंतर दिली.      या शिष्टमंडळ भेटी प्रसंगी गृहमंत्री अमित शहा यांचेसमोर देशातील साखर उ...

उजनी धरणाची सुरक्षा 'रामभरोसे'; गेटवरील पहारेकरी गायब, धरणात मोजणीचा 'राडा',धरणाला धोका, किसनराव तात्यांचा प्रशासनाला कडक डोस

इंदापूर विठ्ठलाच्या पंढरीला पाणी पाजणारं आणि लाखो शेतकऱ्यांची तहान भागवणारं आपलं उजनी धरण सध्या देवाच्याच भरोशावर चाललंय की काय, असा झणझणीत प्रश्न आता उपस्थित झालाय. ज्येष्ठ बागायतदार किसनराव तात्या भांगे यांनी धरणाच्या सुरक्षेवरून प्रशासनाचे पार वाभाडे काढले आहेत. उजनी धरण सध्या देवाच्या म्हणजेच 'रामभरोसे' चाललंय की काय, अशी जोरदार चर्चा सुरू झाली आहे. धरणाच्या या ढिसाळ कारभारावर ज्येष्ठ बागायतदार किसनराव तात्या भांगे यांनी प्रशासनाचे चांगलेच कान उपटले असून एक झणझणीत सवाल उपस्थित केला आहे.नेमकं प्रकरण काय हाय,जमिनी मोजणीचा सस्पेन्स: पूर्वी धरणासाठी शेतकऱ्यांच्या ज्या जमिनी संपादित केल्या होत्या, त्या जमिनी अचानक सरकारने मोजायला सुरुवात केली आहे. पण ही मोजणी नक्की कशासाठी आणि कोणासाठी चालली आहे? याचं गुपित सांगायला सरकार तयार नाही.,परप्रांतीयांची 'एन्ट्री' आणि सुरक्षेचा 'एक्झिट': तात्यांचा थेट संशय आहे की, या जागेवर एखादा मोठा प्रकल्प आणण्याचा डाव आहे. प्रकल्प आला की बाहेरून परप्रांतीय कामगार येणार. मग आपल्या स्थानिक लोकांच्या हक्काचं काय? आणि इतक्या...

निरा भिमा कारखान्याच्या संचालक मंडळाची खंडाळा येथील कॉम्प्रस्ड बायोगॅस प्लांटला भेट -कारखान्याचे कॉम्प्रस्ड बायोगॅस प्लांट उभारणीचे नियोजन-हर्षवर्धन पाटील

इंदापूर : प्रतिनिधी दि.25/5/26                                           देशामध्ये ऊर्जेच्या क्षेत्रामध्ये क्रांतीकारक बदल घडून येत आहे. या बदलाला अनुसरून शहाजीनगर येथील नीरा भीमा सहकारी साखर कारखान्याचे कॉम्प्रस्ड बायोगॅस प्लांट (C.N.G. PLANT) उभारणीचे नियोजन सूरू केले आहे. यास अनुसरून कारखान्याचे संस्थापक व राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ नवी दिल्लीचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील व अध्यक्षा सौ.भाग्यश्री पाटील यांचे समवेत संचालक मंडळाने अहिरे, ता. खंडाळा येथील राज प्रोसेसच्या कॉम्प्रस्ड बायोगॅस प्लांटला रविवारी (दि. 25) भेट देऊन पाहणी केली.         निरा भीमा कारखान्याने स्थापनेपासूनच नेहमीच काळजी गरज ओळखुन सातत्याने एक पाऊल यशस्वीरित्या पुढे टाकलेले आहे, त्यानुसार  कारखान्याचे कॉम्प्रेसर बायोगॅस (CBG) उत्पादनाचे नियोजन आहे, अशी माहिती कारखान्याचे संस्थापक हर्षवर्धन पाटील यांनी कॉम्प्रेसर बायोगॅस प्लॅन्ट पाहणी प्रसगी दिली.   ...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शालेय शिक्षण विभागाच्या नूतनीकृत बालभवन इमारतीचे लोकार्पण व कोनशिला अनावरण.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्यासमवेत आज मुंबई येथे शालेय शिक्षण विभागाच्या नूतनीकृत बालभवन इमारतीचे अनावरण केले. याप्रसंगी त्यांनी इमारतीमधील प्रेक्षागृह, ग्रंथालय, संगीत कक्ष, नाटक कक्ष, बहुउद्देशीय सभागृह व कार्यालयाची पाहणी केली. यावेळी मंत्री मंगलप्रभात लोढा, मंत्री दादाजी भुसे, आमदार दिपक केसरकर व इतर मान्यवर उपस्थित होते.

पुणे शहरात १४ दिवसांसाठी जमावबंदी.

मुंबई प्रतिनिधी  :(सतिश पाटील ) पुणे शहरात पेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधात राजकीय आणि सामाजिक संघटना आक्रमक झाल्या असतानाच, प्रशासनाने सुरक्षेच्या दृष्टीने मोठे पाऊल उचलले आहे. पुणे शहरात उद्या (मंगळवारी) रात्रीपासून पुढील १४ दिवसांसाठी 'जमावबंदीचे आदेश' लागू करण्यात आले आहेत. या काळात कोणत्याही प्रकारचे मोर्चे, आंदोलने आणि सभा घेण्यास प्रशासनाने पूर्णपणे बंदी घातली आहे. सार्वजनिक शांतता आणि सार्वजनिक सुरक्षितता राखण्यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियम सन-१९५१ च्या कलम ३७ (१) (२) (३) अन्वये प्रतिबंधात्मक आदेश करण्यात आला आहे. जमावबंदी हा सर्वात जास्त वापरले जाणारे उपकलम आहे. मोर्चे, मिरवणुका, सभा बंद करता येतात. सार्वजनिक सुव्यवस्था राखण्यासाठी लोकांच्या जमावावर निर्बंध घातले जातात हा आदेश साधारणत १५ दिवसांपर्यंत लागू राहू शकतो; पुढे वाढवण्यासाठी राज्य सरकारची मंजुरी लागते. कोणत्या गोष्टीवर बंदी? सध्या पेट्रोल डिझेलच्या दरवाढीमुळे पुणे शहरात मोठ्या प्रमाणात राजकीय संघटना आणि सामाजिक संघटनांकडे आंदोलन करण्यात येते त्या पार्श्वभूमीवर आदेश काढलेत का? असा प्रश्न वि...

अपघातातील जखमीचा जीव वाचवून 'दाळज' वाहतूक पोलिसांची माणुसकी; नागरिकांकडून कौतुक

इंदापूर असिफभाई शेख  इंदापूर तालुक्यातील सरडेवाडी टोल नाक्याजवळ, संगम हॉटेलसमोर झालेल्या एका भीषण मोटारसायकल अपघातात, दालज वाहतूक पोलीस विभागाने समयसूचकता आणि तत्परता दाखवत एका जखमी व्यक्तीचा जीव वाचवला आहे. पोलिसांच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.सरडेवाडी टोल नाक्याजवळ मोटारसायकलचा अपघात झाल्याची माहिती मिळताच, दालज वाहतूक पोलीस विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी काही मिनिटांतच घटनास्थळी दाखल झाले. अपघात स्थळी झालेली गर्दी आणि वाहतूक कोंडी लक्षात घेता, पोलिसांनी सर्वप्रथम वाहतूक सुरळीत केली. त्यानंतर, कोणतीही वेळ न घालवता टोल प्रशासनाच्या रुग्णवाहिकेला तातडीने पाचारण केले आणि जखमी व्यक्तीला उपचारासाठी तातडीने उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.अपघातानंतर दाखवलेल्या या तत्परतेबद्दल आणि माणुसकीच्या या कार्याबद्दल खालील पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचे विशेष कौतुक होत आहे. ए.एस.आय. भानुदास बंडगर, ए.एस.आय. ए.एस आय सतिश हिरवे,सचिन वाघ, ए.एस.आय. देविदास ढोले, हेड कॉन्स्टेबल विठ्ठल गायकवाड, हेड कॉन्स्टेबल शशिकांत खाडे  नागरिकांकडून पोलिसांचे अभिनंदन  पोलिसांच्या या तत्परत...

अवकाळी चक्रीवादळ पावसामुळे टाकळी हाजी परिसरात शेतीचे मोठे नुकसान; सरपंच दामू अण्णा घोडे यांची पंचनाम्यासाठी धाव

टाकळी हाजी: टाकळी हाजी, होणेवाडी, साळवेंद, घोडे वस्ती, थोरात वस्ती, भैरवनाथ वाडी आणि भाकरीवाडी या परिसरात आज झालेल्या अचानक अवकाळी चक्रीवादळ पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. या वादळी पावसामुळे डाळिंब, केळी आणि आंब्याच्या बागांचे मोठे नुकसान झाले असून, अनेक घरांचे पत्रे उडून गेले आहेत. तसेच काही ठिकाणी गाईंचे गोठेही उद्ध्वस्त झाले आहेत. ## सरपंचांकडून तातडीने पाहणी आणि सूचना नुकसानीची माहिती मिळताच टाकळी हाजी गावचे आदर्श सरपंच श्री. दामू अण्णा घोडे यांनी तातडीने नुकसानग्रस्त भागाला प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून त्यांनी वरिष्ठ अधिकारी, तहसीलदार साहेब, सर्कल भाऊसाहेब आणि तलाठी दादा यांच्याशी दूरध्वनीवरून त्वरित संपर्क साधला. त्यांनी अधिकाऱ्यांना या भागातील नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या आहेत. ## शेतकऱ्यांना आवाहन सरपंचांनी परिसरातील सर्व प्रभावित शेतकऱ्यांना आवाहन केले आहे की, त्यांनी आपल्या झालेल्या नुकसानीचे फोटो पंचनाम्यासाठी काढून सुरक्षित ठेवावेत, जेणेकरून शासनाकडून योग्य ती मदत मिळण्यास मदत होईल.

इंदापूर तालुक्यात वीज वितरणचा सावळागोंधळ; रात्रीच्या ऐन वेळीच ६ ते १० लाईट गुल, शेतकरी अन् जनता हैराण! 'काय चाललंय राव..!

इंदापूर: "काय चाललंय राव या तालुक्यात?" असा संतप्त सवाल सध्या इंदापूर तालुक्यातील प्रत्येक नागरिक आणि शेतकरी महावितरणला विचारत आहे. दिवसभराच्या कष्टाने दमून-भागून घरी आलेल्या जनतेला आणि पिकांना पाणी देण्याच्या विवंचनेत असलेल्या शेतकऱ्यांना रात्रीच्या वेळीच महावितरणकडून 'अंधाराचा शॉक' दिला जात आहे. रोज रात्री ठीक ६ ते १० या ऐन गर्दीच्या आणि गरजेच्या वेळीच वीज गायब होत असल्याने संपूर्ण इंदापूर तालुक्यात तीव्र संताप व्यक्त होत आहे. एकीकडे डिजिटल इंडिया आणि २४ तास विजेच्या गप्पा मारल्या जातात, तर दुसरीकडे इंदापूर तालुक्याला मात्र जाणीवपूर्वक अंधारात ढकलले जात आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. रात्री ६ ते १० ही वेळ गृहिणींसाठी स्वयंपाकाची, मुलांसाठी अभ्यासाची आणि व्यापाऱ्यांसाठी धंद्याची असते. नेमक्या याच ४ तासांत वीज गुल करून महावितरणने जनतेचे जगणे असह्य केले आहे."रात्रीच्या वेळी साप-विंचवाचा धोका पत्करून शेतकरी शेतात जातो, पण तिथे गेल्यावर लाईट गायब असते. पिके जळून चाललीत आणि अधिकारी एसी केबिनमध्ये बसून फक्त कारणे सांगत आहेत,"** अशी संतप्त...

इंदापूर नगर परिषद द्वारा शहर स्वच्छता और जन-जागरूकता अभियान का भव्य शुभारंभ

 इंदापूर नगर परिषद की अनूठी और महत्वाकांक्षी पहल के तहत शहर में व्यापक स्वच्छता और जन-जागरूकता अभियान की अत्यंत उत्साहपूर्ण माहौल में शुरुआत की गई है। इस विशेष अभियान का औपचारिक प्रारंभ प्रभाग क्रमांक 5 के अंतर्गत आने वाले अंबिका नगर परिसर स्थित ऐतिहासिक महादेव मंदिर से किया गया। इस बहुआयामी अभियान का मुख्य उद्देश्य न केवल शहर को कचरा-मुक्त बनाना है, बल्कि आम नागरिकों की मानसिकता में सकारात्मक बदलाव लाकर उन्हें 'स्वच्छ भारत अभियान' की मुख्यधारा से जोड़ना भी है !इस स्वच्छता और जन-जागरूकता अभियान के तहतविभिन्न गतिविधियों और रणनीतियों को धरातल पर उतारा गया, जो इस प्रकार हैं: १. सघन कचरा संग्रहण एवं परिसर स्वच्छताअभियान के पहले ही दिन अंबिका नगर और उसके आसपास के रिहायशी व व्यावसायिक क्षेत्रों में व्यापक सफाई अभियान चलाया गया। परिसर के खुले भूखंडों (ओपन प्लॉट्स) और सड़कों के किनारे लंबे समय से जमा हुए कचरे, प्लास्टिक और मलबे को पूरी तरह से हटाकर डंपिंग ग्राउंड तक पहुंचाया गया। नगर परिषद की स्वच्छता टीमों ने आधुनिक उपकरणों और वाहनों की मदद से पूरे परिसर को पूरी तरह स्वच्छ...

इंदापूर नगरपरिषदेच्या वतीने शहर स्वच्छता आणि जनजागृती अभियानाचा शुभारंभ

इंदापूर नगरपरिषदेच्या पुढाकाराने शहरात स्वच्छता आणि जनजागृती मोहिमेची उत्साहात सुरुवात करण्यात आली आहे. प्रभाग क्रमांक ५ मधील अंबिका नगर परिसरातील महादेव मंदिर येथून या अभियानाचा प्रारंभ झाला. या मोहिमेचे प्रमुख मुद्दे खालीलप्रमाणे आहेत कचरा संकलन व स्वच्छता: अभियानांतर्गत अंबिका नगर परिसरातील मोकळ्या जागेत साचलेला कचरा गोळा करून संपूर्ण परिसर स्वच्छ करण्यात आला.आयोजक व मार्गदर्शक: या मोहिमेचे आयोजन नगराध्यक्ष भरतभाऊ शेठ शहा, प्रभाग क्रमांक ५ चे नगरसेवक अक्षय सूर्यवंशी आणि नगरसेविका दिप्ती राऊत यांच्या पुढाकारातून करण्यात आले. प्रमुख उपस्थिती: मोहिमेत उपनगराध्यक्ष शैलेश पवार, नगरसेवक उमेश मखरे, सामाजिक कार्यकर्ते स्वप्नील राऊत, भारत नाना शिंदे, अमर नलावडे, अजिंक्य भैय्या जावीर, माजी नगरसेवक जावेद भाई शेख आणि नगरपरिषदेचे कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.* पथनाट्याद्वारे जनजागृती: नागरिकांमध्ये स्वच्छतेचा संदेश पोहोचवण्यासाठी आर्यमान गानबोटे आणि बालकलाकार ओम कारंडे यांच्या 'संकल्प' पथनाट्य टीमने 'स्वच्छ परिसर, सुंदर इंदापूर' या विषयावर प्रभावी कलावि...

कालुखेड़ा में भामाशाह श्री रसिकलालजी माणिकचंदजी धारीवाल जैन भवन का लोकार्पण: डॉ. गौतम मुनीजी महाराज की प्रमुख उपस्थिति और पुणे आनंद दरबार के अध्यक्ष बाळासाहेब धोका के हाथों उद्घाटन संपन्न।

पुणे डाॅ.संदेश शाह जैन दिवाकर श्री चौथमलजी महाराज साहेब के दिव्य आशीर्वाद और महासती डॉ. मधुबालाजी महाराज साहेब की प्रेरणा से कालुखेड़ा (जिला रतलाम, मध्य प्रदेश) में निर्मित 'भामाशाह श्री रसिकलालजी माणिकचंदजी धारीवाल जैन भवन' का लोकार्पण बहुश्रुत कवि प्रवर्तक श्री विजय मुनीजी, उपाध्याय डॉ. गौतम मुनी, उपप्रवर्तक श्री चंद्रेश मुनी और एकांत तप आराधक वैभव मुनीजी महाराज साहेब की प्रमुख उपस्थिति में संपन्न हुआ। भवन का उद्घाटन पुणे आनंद दरबार के अध्यक्ष बाळासाहेब धोका के करकमलों द्वारा किया गया। इस अवसर पर **डॉ. गौतम मुनी महाराज साहेब** ने कहा कि धर्मस्थल संस्कृति के प्रतीक होते हैं और वे आत्मचिंतन व मनन के महत्वपूर्ण केंद्र हैं। धर्मस्थलों का उपयोग केवल धार्मिक कार्यों के लिए ही होना चाहिए। धर्म प्रभावना के उद्देश्य से बनाए गए इस स्थानक के निर्माण में धारीवाल परिवार का योगदान अमूल्य है और उनका कार्य प्रशंसनीय है। आधुनिक सुविधाओं से युक्त धर्मस्थलों के निर्माण में समाज का सहयोग अत्यंत महत्वपूर्ण है। कालुखेड़ा के समाज बंधुओं और धारीवाल परिवार ने यथाशक्ति जो योगदा...

रोजगार सेवकांच्या संपाबाबत सरकारने तोडगा न काढल्यास २५ मे रोजी तहसील कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण; 'आपली नाती, आपली माणसं, आपला परिवार' संघटनेचा इशारा

इंदापूर तालुक्यातील रोजगार सेवकांनी आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी पुकारलेल्या काम बंद संपाला दीड महिन्यापेक्षा अधिक काळ उलटून गेला आहे. मात्र, राज्य सरकारने या संपाबाबत अद्यापही कोणतीही सकारात्मक भूमिका न घेता कमालीचे दुर्लक्ष केले आहे. परिणामी, तालुक्यातील रोजगार हमी योजना (रोहयो) विभागांतर्गत चालणाऱ्या विविध योजनांची कामे पूर्णपणे ठप्प झाली असून, हातावर पोट असणाऱ्या गरीब मजुरांवर मजुरीअभावी उपासमारीची वेळ आली आहे. या गंभीर परिस्थितीची दखल घेत, आपली नाती, आपली माणसं. आपला परिवार ग्रुप, इंदापूर तालुका'या सामाजिक संघटनेच्या वतीने येत्या **सोमवारी, दिनांक २५ मे २०२६ रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ५ या कार्यालयीन वेळेत इंदापूर तहसील कार्यालयासमोर एकदिवसीय लाक्षणिक उपोषण** करण्याचा इशारा देण्यात आला आहे. या संदर्भात संघटनेच्या वतीने मंगळवारी (दि. १९ मे) इंदापूरचे तहसीलदार मा. श्री. जीवन बनसोडे साहेब आणि इंदापूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मा. श्री. सचिन खुडे साहेब यांच्यामार्फत पुणे जिल्हाधिकारी व पुणे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आले. तसेच या...

महिला सक्षमीकरणासाठी पुणे जिल्हा परिषद सज्ज; मंत्री अदिती तटकरे व सभापती अंकिता पाटील ठाकरे यांची महत्त्वपूर्ण चर्चा.

महिला व बालकल्याण योजनांना मिळणार गती; मंत्री अदिती तटकरे व सभापती अंकिता पाटील ठाकरे यांची भेट. इंदापूर  प्रतिनिधी : राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांची पुणे जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण समितीच्या सभापती अंकिता पाटील ठाकरे यांनी मंत्रालय येथे भेट घेतली. यावेळी पुणे जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध लोकाभिमुख उपक्रमांबाबत तसेच आगामी काळात राबविण्यात येणाऱ्या नावीन्यपूर्ण योजनांच्या अनुषंगाने सविस्तर चर्चा करण्यात आली.         बैठकीदरम्यान महिला सक्षमीकरण, बालकांचे आरोग्य, पोषण, शिक्षण व सर्वांगीण विकास यासाठी अधिक प्रभावीपणे काम करण्याबाबत विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. विशेषतः ग्रामीण भागातील महिलांपर्यंत शासनाच्या योजना अधिक सक्षमपणे व प्रभावीपणे पोहोचाव्यात यासाठी नव्या उपक्रमांचे नियोजन करण्यात येत असल्याची माहिती सभापती अंकिता पाटील ठाकरे यांनी यावेळी दिली. महिला व बालकल्याण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांविषयी मा.आदितीताई तटकरे यांनी सकारात्मक भूमिका घेत आवश्य...

चलो हिंगणगाव!" उजनी धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या जमिनी बळकावण्याचा प्रयत्न? उद्या प्रशासनाविरुद्ध एल्गार!

इंदापूर/हिंगणगाव उजनी धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या हक्काच्या जमिनींवर प्रशासनाकडून बळजबरीने ताबा मिळवण्याचा घाट घातला जात असल्याचा गंभीर आरोप करत, उद्या हिंगणगाव येथे शेतकरी एकत्र येऊन प्रशासकीय हुकूमशाहीविरुद्ध तीव्र संघर्ष पुकारणार आहेत. " शेतकऱ्यांच्या हक्कासाठी, एकजुटीची ताकद!" या घोषणेसह उद्या, गुरुवार दिनांक २१ मे २०२६ रोजी सकाळी ठीक ९:०० वाजता हिंगणगाव येथील 'मच्छबीज केंद्र' येथे मोठ्या प्रमाणावर जनआंदोलन छेडले जाणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हिंगणगाव येथील मूळ उजनी धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या जमिनी कायदेशीर प्रक्रियेला बगल देऊन, हुकूमशाही पद्धतीने आणि प्रशासनाचा वापर करून बळजबरीने मोजणी करून ताब्यात घेण्याचा प्रयत्न सरकार आणि संबंधित यंत्रणांकडून केला जात आहे. प्रशासनाच्या या मनमानी कारभारामुळे स्थानिक धरणग्रस्त शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. "पिढ्यानपिढ्या ज्या जमिनींवर शेतकऱ्यांचा हक्क आहे, त्या जमिनी प्रशासन सालगड्यासारखा वापर करून हिरावून घेऊ पाहत आहे," असा संताप आंदोलक शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे. या अन्यायाविरुद्ध हिं...

भोंदू महाराज चक्क 'वाळू माफियांचे' गॉडफादर,होते,वाळू चोर भोंदूबाबांची अवैध प्रकरणे मिटविण्यासाठी तत्पर, वेळ प्रसंगी जिव द्यायला तयार

इंदापूर/पुणे: पुणे आणि सोलापूर जिल्ह्याला वरदान ठरलेल्या उजनी धरणाच्या पट्ट्यात सध्या एक अजब आणि धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. गोरगरीब जनतेला देवादिकांच्या नावाखाली गंडा घालणारे आणि स्वतःला 'महात्मा' म्हणवून घेणारे भोंदू महाराज आता चक्क 'वाळू माफियांचे' संरक्षक (गॉडफादर) बनले आहेत. अंधश्रद्धेच्या दुकानातून लाखो रुपये कमवणारे हे भामटे आता थेट उजनीच्या वाळू चोरांना अभय देत असल्याचे समोर आल्याने, सामान्य जनतेच्या डोळ्यातून संतापाच्या ज्वाला बाहेर पडत आहेत. एकीकडे गोरगरीब भाविकांना "तुमचे ग्रह फिरले आहेत", "घरात दोष आहे" असे सांगून सोन्या-चांदीचे दागिने आणि रोकड लाटणाऱ्या या भोंदू बाबांचा दरारा मोठा आहे. मात्र, या भोंदू महाराजांची खरी माया उजनीच्या काळ्या सोन्यात म्हणजेच वाळूमध्ये दडलेली आहे. आम्ही वीरकर महाराज यांचे शिष्य आहोत, महाराजांना काही झाले तर पहीला वार आमच्यावर घेऊ म्हणणारे वाळू व्यवसायिक एवढे आंधळे झाले कसे,काही दिवसा पुर्वी इंदापूर तालुक्यातील काही पत्रकारांनी वीरकर महाराज अडचणीत येणार आशा बातम्या टाकल्या होत्या ,विरकर महाराज...

सौ.अंकिताताई मुकुंदशेठ शहा माजी नगराध्यक्षांच्या या 'ग्रीन' कार्याला इंदापूरकरांचा कडक सॅल्यूट

इंदापूर कडक उन्हाळा असो वा वाढते प्रदूषण, इंदापूरकरांना आता त्याची फिकीर उरलेली नाही. "अतिक्रमण हटाव" पेक्षा "अतिक्रमण करूच नका" हा मंत्र जपत माजी नगराध्यक्षा सौ. अंकिताताई मुकुंदशेठ शहा, यांनी इंदापूरच्या मोकळ्या पण मोक्याच्या जागांचे थेट 'मिनी फॉरेस्ट'मध्ये रूपांतर केले आहे. त्यांना त्यांचे पती मा.मुकुंदशेठ शहा [ इंदापूरचे सयाजी शिंदे,]   यांनी,मोलाची साथ दिली,घरचीच नर्सरी आसल्याने यांनी कोट्यावधी हून अधिक झाडांची,लागवड केली,अटल वन,ऑक्सिजन पार्क,इतर ठीकाणी मोठ्या प्रमाणावर झाडे लावून वनराई बहरली जनतेला आगळा वेगळा संदेश दिला.एखाद्या नेत्याचा वाढदिवस असेल तर झाडं मात्र शहा नर्सरीतीलच लावली जातात ,अकलूज रोड आणि टेंभुर्णी रोडवर फेरफटका मारला, तर तुम्हाला इंदापूर शहरात आहोत की महाबळेश्वरमध्ये, असा प्रश्न पडल्याशिवाय भविष्यात राहणार नाही, नेहमीच सिमेंटची जंगले वाढवण्याकडे कल असतो, पण अंकिताताईंनी मात्र 'घनदाट जंगल स्टाईल'वृक्षारोपण करून इंदापूरला एक नवी ओळख दिली आहे. ज्या मोकळ्या जागांवर उद्या टपऱ्या किंवा अनधिकृत बांधकामं होण्याच...

गोरगरीब आणि सर्वसामान्यांसाठी हक्काचे व्यासपीठ: ‘केतकेश्वर सांस्कृतिक भवन’चा १३ वा वर्धापनदिन,

 इंदापूर निमगाव केतकी (प्रतिनिधी):गोरगरीब आणि सर्वसामान्य जनतेच्या सुख-दुःखात नेहमीच वरदान ठरणारे, निमगाव परिसरातील सर्व सोयींयुक्त व भव्य मंगल कार्यालय म्हणजेच केतकेश्वर सांस्कृतिक भवन’ या नामांकित कार्यालयाने आपल्या यशस्वी सेवेची १२ वर्षे पूर्ण करून १३ व्या वर्षात पदार्पण केले आहे. त्यानिमित्त परिसरातून आणि विविध स्तरातून या कार्यालयावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. कोणतीही मोठी गोष्ट ही एका छोट्याशा विचारातून आणि प्रामाणिक प्रयत्नातून जन्माला येते, याचाच प्रत्यय केतकेश्वर सांस्कृतिक भवनच्या प्रवासाकडे पाहताना येतो. तात्यासाहेब कोरटकर, मुख्तार मुलाणी आणि हरीशकुमार वाघमोडे या तिघांनी एकत्र येऊन सर्वसामान्यांच्या सुविधेसाठी एका छोट्या रोपट्याच्या रूपाने या कार्यालयाची सुरुवात केली होती. आज त्यांच्या अथांग परिश्रमातून, सचोटीतून आणि उत्कृष्ट व्यवस्थापनामुळे या रोपट्याचा एक डेरेदार वटवृक्ष झाला आहे. आजच्या महागाईच्या काळात सर्वसामान्य आणि गोरगरीब जनतेला परवडेल अशा दरात, परंतु कोणतीही तडजोड न करता अत्याधुनिक आणि दर्जेदार सोयी-सुविधा पुरवण्याचे काम केतकेश्वर सांस...

इंदापूर तालुक्यात 'आम सभाच घेतली नाही,; जनजीवन चा काळा बाजार उजेडात येऊ नये म्हणून लोकशाहीचा सोहळा की 'गुपचूप' कारभार..?

इंदापूर: आम सभा' म्हटलं की जनतेचे प्रश्न, अधिकाऱ्यांची पळापळ आणि लोकप्रतिनिधींचा कडकडाट... हे सगळं ऐकून-पाहून इंदापूर तालुक्यातील जनतेचे कान आणि डोळे आता पार थकलेत. कारण, तालुक्यात गेल्या अनेक वर्षांपासून 'आम सभा' झालीच नसल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. त्यामुळे आता इंदापूरकर विचारतायत "काय चाललंय राव..? तालुक्याच्या विकासाचा आणि जनतेच्या अडीअडचणींचा पाढा वाचण्यासाठी 'आम सभा' हे हक्काचं व्यासपीठ मानलं जातं. पण इंदापूर तालुक्यात मात्र या सभेला जणू 'अज्ञातवासा'त धाडण्यात आलं आहे. वर्ष सरली, ऋतू बदलले, अगदी नेते आणि अधिकारीही बदलले, पण बदलली नाही, तालुक्यात सध्या अशी चर्चा रंगली आहे की, आम सभा न घेण्यामागे नक्की काय गुपित आहे? लोकप्रतिनिधींना जनतेच्या प्रश्नांची भीती वाटतेय, की प्रशासनाला उत्तरं देण्याची सोय वाटत नाहीये? रस्ते, पाणी आणि वीज,गावखेड्यातील पाण्याचे प्रश्न, रखडलेले रस्ते आणि विजेचा लपंडाव यावर बोलायचं कुणाकडे?आम सभाच होत नसल्याने प्रशासकीय अधिकाऱ्यांचे चांगलेच फावले आहे. विचारणारं कोणी नसल्याने 'आओ जावो घर तुम...

महाराष्ट्र राज्य एकनाथ स्वाभिमानी शिक्षक सेना पुणे जिल्हा यांच्या वतीने विद्यार्थ्यांचा गुणगौरव......

 इंदापूर महाराष्ट्र राज्य एकनाथ स्वाभिमानी शिक्षक सेना पुणे जिल्हा यांच्यावतीने काल इंदापूर येथे गुरुकृपा सांस्कृतिक भवन येथे भव्य दिव्य असा इयत्ता दहावी व बारावी परीक्षेमध्ये प्रथम तीन आलेले क्रमांक यांचा ट्राफि, पुस्तक,प्रमाणपत्र, देऊन त्यांचा उपस्थिती मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.  या कार्यक्रमाची सुरुवात अध्यक्षांची निवड करून अध्यक्ष व मान्यवरांच्या हस्ते दीप प्रजनन करून तसेच क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले ज्योतिबा फुले आनंद दिघे बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली.     यावेळी या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून एकनाथ स्वाभिमानी शिक्षक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष बापूसाहेब अडसूळ सर तसेच प्रमुख पाहुणे म्हणून मंगेश चिवटे यांचे बंधू महेश चिवटे उपस्थित होते तसेच यावेळी प्रमुख उपस्थित पाहुणे म्हणून पुणे विभागीय मुख्याध्यापक संघ अध्यक्ष महाराष्ट्र राज्य रामभाऊ पाडोळे सर तसेच इंदापूर तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष जगन्नाथ पाटील सर पश्चिम महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे विभागीय अध्यक्ष रमेश राऊत राष्ट्रवादी पार्टी मा.विरोधी पक्षनेत...

राष्ट्रीय साखर कारखाना महासंघाकडून ऊस (नियंत्रण) आदेशासंदर्भात विविध सूचना-हर्षवर्धन पाटील -पुणे येथे देशातील साखर कारखानदारांची बैठक

 इंदापूर  फोटो:-पुणे येथे राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाच्या वतीने देशातील साखर कारखानदारांची बैठक हर्षवर्धन पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. राष्ट्रीय सहकारी साखर महासंघाच्या वतीने ऊस (नियंत्रण) आदेश- 2026 संदर्भात केंद्र सरकारला देशातील साखर कारखान्यांकडून आलेल्या सूचना दि. 20 मे पूर्वी सादर केल्या जाणार आहेत. या सूचनांमुळे कायदा अधिक व्यापक व सर्व समावेशक होण्यास मदत होणार आहे, अशी माहिती राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ नवीदिल्लीचे अध्यक्ष, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी शनिवारी (दि.16) दिली.     पुणे येथे देशातील सहकारी साखर कारखान्यांचे अध्यक्ष, कार्यकारी संचालक यांची केंद्र सरकारच्या प्रस्तावित ऊस (नियंत्रण) आदेश- 2026 संदर्भात बैठक पार पडली. या बैठकीमध्ये सविस्तर विचार मंथन करण्यात आले, असे हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले.        ते पुढे म्हणाले, सध्या केंद्र शासनाच्या ऊस (नियंत्रण) आदेश 1966 लागू आहे. गेल्या 40 वर्षात साखर व ऊर्जा क्षेत्रात झालेले संशोधन आणि सुधारणा यांचा अंतर्भाव करण्याच्...

इंदापूरमध्ये धर्मवीर संभाजी महाराज जयंतीनिमित्त इतिहास जागवणारा सांस्कृतिक सोहळा

महिलांसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था; शिस्तबद्ध आणि आदर्श आयोजनाने इंदापूरकर भारावले  इंदापूर शहराने शुक्रवारी एक ऐतिहासिक आणि अविस्मरणीय सांस्कृतिक सोहळा अनुभवला. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त प्रथमच इंदापूरमध्ये सांस्कृतिक गीतांचा भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. “शिवशंभो गर्जना” या नावाने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाने उपस्थितांच्या अंगावर अक्षरशः शहारे आणले. इतिहास, संस्कृती, पराक्रम आणि शिवभक्ती यांचा अनोखा संगम असलेल्या या कार्यक्रमाने संपूर्ण इंदापूर शहर शिवमय झाले होते. प्रशांतमामा उंबरे युवा मंच, इंदापूर यांच्या वतीने इंदापूर नगरपालिकेसमोरील विस्तीर्ण परिसरात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्रभर गाजलेला “ABHI - AAMU LIVE FOLK MUSICAL” हा सांस्कृतिक कार्यक्रम पहिल्यांदाच इंदापूरकरांच्या भेटीला आला होता. त्यामुळे कार्यक्रमाबाबत नागरिकांमध्ये मोठी उत्सुकता होती. सायंकाळपासूनच कार्यक्रमस्थळी नागरिकांची गर्दी उसळू लागली होती. या कार्यक्रमाला इंदापूर नगर परिषदेचे नगराध्यक्ष भरतभाऊ शहा, शहा स्कूलचे विश्वस्त मुकुंदभाऊ शहा, माजी ...

जुन्या आठणींना उजाळा, ११ वर्षीय देवेंद्र फडणवीसांनी एकाच वेळी ३५ पुरणपोळ्या खाऊन रचला होता विश्वविक्रम

इंदापूर;- (विशेष प्रतिनिधी) : राजकीय पटलावर आपल्या चाणाक्ष आणि आक्रमक भूमिकेसाठी ओळखले जाणारे महाराष्ट्राचे लोकप्रिय नेते देवेंद्र फडणवीस यांचा लहानपणीचा एक अनोखा आणि रंजक इतिहास सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चेत आला आहे. तब्बल ४४ वर्षांपूर्वी, म्हणजेच १५ जून १९८२ रोजी प्रसिद्ध दैनिक 'तरूण भारत'मध्ये प्रसिद्ध झालेल्या एका बातमीने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. वयाच्या अवघ्या ११ व्या वर्षी देवेंद्र फडणवीस यांनी एका खाण्याच्या स्पर्धेत तब्बल ३५ पुरणपोळ्या आणि १ किलो तूप फस्त करून चक्क 'विश्वविक्रम' प्रस्थापित केला होता. नागपूरमधील रेशीमबाग भागात या भव्य पुरणपोळी खाण्याच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत नागपूरसह संपूर्ण विदर्भातील तब्बल ९२ दिग्गज स्पर्धकांनी उत्स्फूर्तपणे भाग घेतला होता. स्पर्धा अत्यंत चुरशीची झाली. मात्र, अवघ्या ११ वर्षांच्या चिमुकल्या देवेंद्र यांनी आपल्या अफाट खाण्याच्या क्षमतेच्या जोरावर सर्वांना मागे टाकत या स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला.प्रथम क्रमांक:देवेंद्र फडणवीस (३५ पुरणपोळ्या आणि १ किलो तूप) द्वितीय क्रमांक शैलेंद्...

“सोनाई परिवाराचे कार्य म्हणजे ग्रामीण अर्थकारणाचा आदर्श मॉडेल” – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

 इंदापूर:- ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी शेतीसोबत पूरक उद्योग उभारणे ही काळाची गरज असून, ‘सोनाई परिवाराने’ दुग्ध व्यवसायाच्या माध्यमातून उभा केलेला विकासाचा आदर्श संपूर्ण राज्यासाठी प्रेरणादायी असल्याचे गौरवोद्गार केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी काढले. इंदापूर ते बारामती पालखी महामार्गाच्या पाहणी दौऱ्यानिमित्त नितीन गडकरी यांनी इंदापूर तालुक्यातील गोखळी येथील ‘सोनाई डेअरी’च्या मुख्य प्रकल्पाला सदिच्छा भेट दिली.  यावेळी सोनाई परिवाराचे अध्यक्ष दशरथ दादा माने व प्रविणभैय्या माने यांनी त्यांचे स्वागत करून प्रकल्पाची माहिती दिली. प्रकल्प परिसराची पाहणी करताना गडकरी यांनी दुग्ध व्यवसायातील आधुनिक तंत्रज्ञान, शेतकरी सहभाग, दूध प्रक्रिया व्यवस्था आणि ग्रामीण रोजगारनिर्मिती याबाबत विशेष समाधान व्यक्त केले. दशरथ माने यांच्या नेतृत्वाखाली सोनाई परिवाराने परिसरातील हजारो शेतकरी कुटुंबांना दुग्ध व्यवसायाशी जोडून त्यांना आर्थिक स्थैर्य मिळवून दिले आहे. शेतकऱ्यांच्या दैनंदिन उत्पन्नात वाढ, महिलांना रोजगाराच्या संधी आणि ग्...

इंदापूरच्या राजकारणात 'संगीत खुर्ची'! गडकरींच्या गाडीत बसून नेत्यांची 'जय हरी विठ्ठल' वारी;

इंदापूर:"- राजकारणात 'नेते बदलतात, पण निष्ठा बदलत नाही' असं म्हणतात. पण सध्या इंदापूर तालुक्याच्या राजकारणाने जो नवा 'म्युझिकल चेअर'चा खेळ सुरू केलाय, तो पाहून बिचाऱ्या मतदारांच्या डोक्याचा पार दही झालाय! आज केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी इंदापूरच्या पालखी मार्गाच्या (इंदापूर-अकलूज पट्टा) पाहणी दौऱ्यावर आले होते. गडकरी आले तर रस्ते चकाचक होणार हे उघडच आहे, पण त्यांच्या गाडीत जी 'राजकीय सरमिसळ' बसली होती, ती पाहून इंदापुरातल्या जनतेने थेट कपाळावर हात मारून घेतलाय. एका बाजूला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (सुनेत्राताई पवार गट - महायुती) चे कृषीमंत्री दत्तूमामा भरणे बसलेले. दुसऱ्या बाजूला काल-परवापर्यंत भाजपमध्ये असलेले आणि आता थेट तुतारी हाती घेतलेले राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) चे हर्षवर्धनभाऊ पाटील. तर खाली स्वागताला भाजपचे प्रदीपदादा गारटकर आणि प्रवीणभैय्या माने! बाप रे बाप! अशी खिचडी तर हॉटेलमध्येही मिळत नाही. ज्यांच्या कार्यकर्त्यांनी निवडणुकीत एकमेकांचे कपडे फाडायचे बाकी ठेवले होते, ते सगळे नेते आज नितीन गडकरींच्या 'हायव...

*पालखी महामार्गाचे काम तातडीने पूर्ण करा*

इंदापूर  तालुक्यातील काटेवाडी ते इंदापूर तालुक्यातील सराटी गावादरम्यान अनेक वर्षांपासून रखडलेल्या श्री संत तुकाराम महाराज पालखी महामार्गाच्या अपूर्ण कामाबाबत केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांना निवेदन देऊन तातडीने कार्यवाही करण्याची मागणी प्रदीप गारटकर व युवा नेते प्रविण माने यांच्यावतीने करण्यात आली आहे. निवेदनामध्ये नमूद करण्यात आले आहे की, राज्यातील इतर अनेक भागांमध्ये श्री संत तुकाराम महाराज पालखी महामार्गाचे काम पूर्ण झालेले असताना, इंदापूर तालुक्यातील काटेवाडी ते सराटी हा महत्त्वाचा टप्पा अद्यापही अर्धवट अवस्थेत आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांसह प्रवासी, शेतकरी, व्यापारी, विद्यार्थी आणि वारकरी यांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत आहे. विशेषतः दरवर्षी होणाऱ्या पालखी सोहळ्यादरम्यान या मार्गावर प्रचंड गर्दी होत असते. अशा परिस्थितीत रस्त्याचे अपूर्ण काम हे नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने गंभीर समस्या बनले आहे. खराब आणि अपूर्ण रस्त्यामुळे वाहतूक कोंडी, धुळीचे प्रमाण, तसेच अपघातांच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याची बाबही निवेदनात अधोरेखित करण्यात आली आहे...

इंदापूर नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष पांडुरंग तात्या शिंदे यांच्या मातोश्री सुंदराबाई शिंदे यांचे वयाच्या १०२ व्या वर्षी निधन

इंदापूर  नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष पांडुरंग तात्या शिंदे आणि बळीराम शिंदे यांच्या मातोश्री **कै. सुंदराबाई हरिभाऊ शिंदे** यांचे आज, शुक्रवार दिनांक १५ मे २०२६ रोजी वयाच्या १०२ व्या वर्षी वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने शिंदे परिवारावर शोककळा पसरली असून इंदापूर शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे. शतायुषी आयुष्य लाभलेल्या सुंदराबाई शिंदे या अत्यंत प्रेमळ आणि सुसंस्कारी व्यक्तिमत्व म्हणून परिचित होत्या. त्यांच्या पश्चात मुलगा, सुना, नातवंडे आणि मोठा आप्तपरिवार असा परिवार आहे. एक आदर्श माता आणि मार्गदर्शक गमावल्याची भावना परिसरात व्यक्त होत आहे. त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार आज शुक्रवार, दि. १५/०५/२०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता करण्यात येणार आहेत. अंत्यविधीचा कार्यक्रम त्यांच्या राहत्या घरी (जुना शहा रोड, यशवंत नगर, इंदापूर) येथून मार्गस्थ होईल. शिंदे परिवाराच्या या दुःखात शिवसृष्टी न्यूज आणि इंदापूर शहर सहभागी असून, ईश्वर मृताच्या आत्म्यास चिरशांती देवो, हीच प्रार्थना. ---

इंदापुरात धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती निमित्त विनम्र अभिवादन,'शंभूराजांचा इतिहास प्रेरणादायी' - नगराध्यक्ष भरतभाऊ शहा

इंदापूर: स्वराज्यरक्षक, अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त इंदापूर नगरपरिषदेच्या वतीने भव्य अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी इंदापूरचे नगराध्यक्ष मा. भरतभाऊ शहा यांच्या हस्ते छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी नगराध्यक्ष भरतभाऊ शहा यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना महाराजांच्या पराक्रमाचा गौरव केला. ते म्हणाले की, "छत्रपती संभाजी महाराजांचे बलिदान आणि शौर्य हे युगानुयुगे पिढ्यांना प्रेरणा देणारे आहे. त्यांचा स्वाभिमान आणि स्वराज्याप्रती असलेली निष्ठा आजच्या तरुणाईने अंगीकारणे काळाची गरज आहे." या कार्यक्रमाला नगराध्यक्षांसोबत उपनगराध्यक्ष मा.बाळासाहेब ढवळे, गटनेते,शकीलभाई सय्यद,नगरसेवक प्रतिनिधी, भारत शिंदे, मा.प्रशांत उंबरे,गणेश महाजन, पोपट शिंदे,स्वप्नील राऊत, नगरसेवक शुभम पोपटराव पवार, भैय्या हरणावळ, अमोल माने यांच्यासह नगरपरिषदेचे इतर पदाधिकारी, कर्मचारी आणि शहरातील अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी 'जय शंभूराय...

.इंदापूरमधील बहुतांश शिक्षण संस्थांनी आता स्वत:च्याच परिसरात खाजगी 'अकॅडमी' थाटल्या,

इंदापूर (प्रतिनिधी): एकेकाळी ज्ञानाचे माहेरघर मानल्या जाणाऱ्या इंदापूर तालुक्यात आता शिक्षणाचे पूर्णपणे व्यापारीकरण' झाले असल्याचे चित्र दिसत आहे. तालुक्यातील नामांकित शिक्षण संस्थांमध्ये सध्या प्रायव्हेटायझेशनचे (खाजगीकरण)पेव फुटले असून, सर्वसामान्य आणि गोरगरीब पालकांची लूट करण्याचे जणू सत्रच सुरू झाले आहे. "शाळा राहिली बाजूला, आता सगळीकडे अकॅडमीच गाजतेय," अशी संतापजनक प्रतिक्रिया तालुक्यातील पालकांमधून उमटत आहे. इंदापूरमधील बहुतांश शिक्षण संस्थांनी आता स्वत:च्याच परिसरात खाजगी 'अकॅडमी' थाटल्या आहेत. साध्या शिक्षणापेक्षा या अकॅडमीचे शुल्क अव्वाच्या सव्वा असून, हे पैसे भरताना सामान्य शेतकऱ्याचे कंबरडे मोडत आहे. केवळ नफा कमवणे हाच एकमेव उद्देश ठेवून या संस्था कार्यरत असल्याचे दिसत आहे. ज्याप्रमाणे बारामतीमध्ये शिक्षणाचे मोठे हब झाले, मात्र तिथे सर्वसामान्यांच्या मुलांपेक्षा श्रीमंतांच्या पोरांचेच चोचले जास्त पुरवले जातात, तशीच अवस्था आता इंदापूरची होताना दिसत आहे. मोठ्या इमारती आणि जाहिरातींच्या झगमगाटात गुणवत्ते'पेक्षा 'बिलाला' जास्त महत्त्...