वाल्हे प्रतिनिधी -सिकंदर नदाफ परमपूज्य सदगुरूं व महर्षी वाल्मीकी वारकरी सेवा संघाचे संस्थापक ह. भ. प. अशोक महाराज पवार यांनी अनुग्रह दिलेल्या वाल्हे सह पंचक्रोशीतील शिष्यगणांकडून गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी शिष्यगणांकडून वाल्हे (ता. पुरंदर) गावच्या पालखी तळानजीक विठोबा मैदानात उभारलेल्या महर्षी वाल्मीकी वारकरी सेवा संघाच्या भक्तनिवासात गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने भजन कीर्तन आणि प्रवचनासह विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अनेक शिष्यगणांनी आपल्याला ज्या सदगुरूंनी मोक्ष प्राप्तीचा मार्ग दाखविला आणि जीवन कसे जगावे हे शिकवले अशा सदगुरूं व मठाधिपती ह. भ. प. अशोक महाराज पवार यांचे पाद्यपूजन करून त्यांचे शुभ आशीर्वाद घेतले या प्रसंगी सोनबा बनकर मारुती पोटे दत्तात्रेय पवार शुभम दुर्गाडे पांडुरंग पवार गजानन पवार बंडासाहेब दाते मनीषा पवार कमल पवार सुनंदा पवार आदी मान्यवर उपस्थित होते.
इंदापूर:- वीरश्री मालोजीराजे भोसले यांच्या गढीवरील अतिक्रमणे काढण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या, वीरश्री मालोजीराजे भोसले यांच्या समाधीस्थळावर पुन्हा मेघडंबरीसह समाधी उभारण्यात यावी अशी सूचना प्रशासनाला दिल्याचे असल्याची माहिती खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः भ्रमणध्वनीवरून दिली. त्यानंतर आ. गोपीचंद पडळकर, सागर बेग यांच्या नेतृत्वाखाली पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर गलांडवाडी पाटीवर तब्बल अडीच तास केलेले रास्ता रोको आंदोलन सकल हिंदू समाजाने स्थगित केले. वीरश्री मालोजीराजे भोसले यांच्या गढीवरील अतिक्रमण काढण्यात यावीत या मागणीसाठी व महामार्गाचे रुंदीकरण, उड्डाणपूलाच्या बांधकामामुळे वीरश्री मालोजीराजे भोसले यांच्या समाधीस्थळाच्या झालेल्या दुरावस्थेकडे लक्ष वेधून घेण्यासाठी आ.गोपीचंद पडळकर, सागर बेग व इतर कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत महामार्गावरील गलांडवाडी पाटी येथे आज सकाळी साडेअकरा वाजता रास्ता रोको करण्यात आला. पडळकर म्हणाले, विशाळगड, प्रतापगड गडाच्या धर्तीवर वीरश्री मालोजीराजे भोसले यांच्या गढीवरील सर्वच्या सर्व अतिक्रमण काढली ज...