मुख्य सामग्रीवर वगळा

एल निनो'च्या पार्श्वभूमीवर पशुसंवर्धन विभाग सज्ज-*डॉ. किरण पाटील

पुणे, दि. २२: राज्यात वाढत्या तापमानाची शक्यता व उष्णलहरींचा धोका लक्षात घेता, पशुसंवर्धन विभागाने राज्यातील पशुपालक, कुक्कुटपालक व्यावसायिकांसाठी मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली आहेत. वाढत्या उष्णतेमुळे पशुधनावर होणारे विपरीत परिणाम टाळण्यासाठी विभागाने सर्व पशुवैद्यकीय संस्थांना सतर्क राहण्याचे आदेश दिले असून, पशुपालकांनी विशेष दक्षता घेण्याचे आवाहन केले आहे.
उष्णलहरींच्या काळात पशुधनाची कशी काळजी घ्यावी व याबाबत क्षेत्रिय स्तरावर काय जनजागृती करण्यात यावी, याबाबत पशुसंवर्धन विभागाने मार्गदर्शक सूचनांच्या माध्यमातून अधिनस्त संस्थाप्रमुखांना अवगत केले  आहे. तसेच पशुपालकांना मार्गदर्शक सूचनांच्या माध्यमातून पशुधनाची काळजी घेण्याबाबत आवाहन केले आहे. यामध्ये, पशुधनाला पुरेसे स्वच्छ आणि थंड पिण्याचे पाणी उपलब्ध करून द्यावे. आहारात क्षार मिश्रणे व जीवनसत्वांचा समावेश करावा. दुभत्या जनावरांना संतुलित आहार द्यावा. 
शेतीच्या किंवा वहनाच्या कामासाठी वापरल्या जाणाऱ्या पशुधनाला सकाळी ११ ते सायंकाळी ४ या तीव्र उन्हाच्या काळात विश्रांती द्यावी. त्यांना सावलीत किंवा खेळती हवा असलेल्या थंड जागी बांधावे. गोठ्याचे छत उष्णता रोधक असावे किंवा छतावर गवत/पालापाचोळा टाकून त्यावर पाणी मारावे. शक्य असल्यास स्प्रिंकलरचा वापर करावा. खिडक्यांना सावलीची व्यवस्था असावी. उष्णलहरी सुरू होण्यापूर्वी घटसर्प, फऱ्या व आंत्रविषार यांसारख्या रोगांचे प्रतिबंधक लसीकरण व जंतनाशक औषधे पाजणे आवश्यक आहे.


पशुधनामध्ये उष्माघाताची लक्षणे (उदा. धापा टाकणे, तोंडावाटे लाळ गळणे, अस्वस्थता) दिसून आल्यास त्वरित तात्काळ सावलीत किंवा थंड ठिकाणी हलवावे. पशुधनावर थंड पाण्याचा मारा करावा. (अश्ववर्गीय प्राण्यांच्या बाबतीत पायाकडून शरीराच्या वरील भागाकडे पाणी मारावे). जवळच्या पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क साधावा. पशुसंवर्धन विभागाने सर्व क्षेत्रीय संस्थांना हवामान विभागाच्या संपर्कात राहून दैनंदिन तापमानाचा अंदाज घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. सर्व दवाखान्यांमध्ये आवश्यक जीवरक्षक औषधे, व औषधी साठा आवश्यक प्रमाणात उपलब्ध ठेवण्यात आला आहे. फिरती पशुवैद्यकीय पथके तातडीच्या सेवेसाठी तैनात ठेवण्यात आली आहेत.
पशुसंवर्धन विभागाने जिल्हा प्रशासन, अशासकीय संस्था, तसेच सामाजिक-सेवाभावी संस्थांना आवाहन केले आहे की, रस्त्यावरील पशू-पक्ष्यांसाठी घराबाहेर किंवा सार्वजनिक ठिकाणी पिण्याच्या पाण्याची भांडी,हौद ठेवावेत. मृत पशुधनाची विल्हेवाट शास्त्रोक्त पद्धतीने लावण्यासाठी स्थानिक प्रशासनाने योग्य जागा आरक्षित ठेवण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत. 
पशुधनासाठी नेहमी स्वच्छ व थंड पिण्याच्या पाण्याची सोय करावी. पिण्याची भांडी नियमित स्वच्छ ठेवावीत. पिण्याचे पाण्याचे हौद शक्यतो गोठ्याजवळ व सावलीत असावेत. नसल्यास त्यावर शेड उभारून थेट उन्हापासून संरक्षण करावे. चारा, वैरण व पशुखाद्याचा पुरेसा साठा करून ठेवावा. खाद्यात मिनरल मिक्श्चरचा समावेश करावा. उत्पादक व दुभत्या पशुधनास संतुलित आहार द्यावा. गाभण पशुधनाच्या खाद्य व चाऱ्याची काळजी घ्यावी. आधुनिक गोठ्यांमध्ये 'स्प्रिंकलर' वापरावेत. इतर पशुपालकांनी पशुधनाच्या अंगावर पाणी फवारावे. म्हशींना शक्य असल्यास स्वच्छ पाण्याच्या हौदात बसण्याची सोय करावी. सायंकाळच्या दूध दोहनाची वेळ टप्प्याटप्प्याने किमान १ तास उशिरा ठेवावी, जेणेकरून उष्णतेचा ताण कमी होऊन उत्पादन टिकून राहील. 
पशुधनाला सावलीत व भरपूर खेळती हवा असलेल्या जागी बांधावे. निवाऱ्याच्या छतासाठी उष्णता रोधक साहित्याचा वापर करावा. पक्षीगृहाच्या छतावर गवताचे आच्छादन करावे. जाळ्यांना पडदे लावून त्यावर पाणी शिंपडावे व हवा खेळती राहील याची दक्षता घ्यावी. शेती किंवा ओझे वाहणाऱ्या पशुधनाला सकाळी ११ ते दुपारी ४ या तीव्र उन्हाच्या काळात पूर्ण विश्रांती द्यावी. उष्णतेपासून वाचवण्यासाठी अश्वाला त्याच्या  पायाकडून शरीराच्या वरील भागाकडे थंड पाण्याचा हळुवार शिडकावा करावा. वराहांना पुरेसा निवारा, स्वच्छ पाणी व शक्य असल्यास पाण्यात बसण्याची सोय करावी. पाळीव प्राणी/पशूंना उन्हाच्या वेळी शक्यतो घरात किंवा सुरक्षित निवाऱ्यात ठेवावे. मृत पशुधनाची विल्हेवाट लावण्याची जागा सार्वजनिक ठिकाणे व पाणवठ्यांपासून दूर व सुरक्षित असावी. तिथे तसा सूचना फलक लावावा. स्थानिक हवामानाचा अंदाज व दैनंदिन तापमानावर नियमित लक्ष ठेवावे.
पशुधन उन्हाळ्यात उघड्यावर बांधू नये. पाळीव पशुधनास पार्क केलेल्या गाडीत सोडून जावू नये. शेती विषयक व इतर कामासाठी वापरण्यात येणा-या पशुधनास उन्हाच्या वेळी कामास लावू नये. पशुधनास पिण्याच्या पाण्यासाठी उन्हात फार दूर व फार वेळ चालावे लागू नये याची दक्षता घ्यावी. पशुधनाची गर्दी करू नये. दाटीवाटीने बांधु नये. भर उन्हात पशुधनाची हलचाल / वाहतुक करू नये. उन्हे असल्यास दुभत्या पशुधनाचे दोहन करून नये. मृत पशुधन उघड्यावर टाकू नये.

"एल निनोच्या संकटकाळात पशुपालकांनी पशुसंवर्धन विभागामार्फत देण्यात येणाऱ्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे. चारा व्यवस्थापन व पशुधनाच्या आरोग्याबाबत कोणत्याही मदतीसाठी स्थानिक पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क साधावा. तसेच '१९६२ कॉल सेंटर'च्या माध्यमातून पशुसंवर्धनविषयक सेवा व मार्गदर्शन उपलब्ध करुन देण्यात आले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

जय भवानीगड विकास प्रतिष्ठान मधील बालचिमुकल्यानी घेतला आठवडा बाजाराचा आनंद

  इंदापूर जय भवानी गड विकास प्रतिष्ठान संचलित, विद्या निकेतन स्कूल अ‍ॅण्ड जुनियर कॉलेज व प्रेसिडेंसी इंटरनॅशनल स्कूल, विद्या निकेतन कॉलेज ऑफ फार्मसी व विद्यानिकेतन इन्स्टिटय़ूट ऑफ इंजिनिअरिंग अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 05/12/2025 रोजी आठवडा बाजाराचे नियोजन करण्यात आले होते.  विद्यार्थ्यांंना बाजारातल्या व्यवहाराची माहिती देण्यासाठी आणि त्यांना प्रत्यक्ष अनुभव देण्यासाठी प्रशाले मध्ये आठवडा बाजार भरवला होता. बाजारातील खरेदी विक्रीची माहिती मिळावी, पैश्याचा वापर कसा करावा याची जाणीव असावी, या उद्देशाने या आठवडे बाजाराचे नियोजन करण्यात आले होते.विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढावा पैश्याचे महत्त्व समजावे . भाजीपाला विक्री सोबत फळभाज्या विविध फळे, विविध खाद्यपदार्थ यांच्या खवय्यांनी विद्यार्थ्यांनी मनसोक्त आनंद लुटला.  फळे , भाजीपाला विक्री करताना विद्यार्थ्यांच्या चेहर्‍यावरचा आनंद ओसंडून वहात होता.  बाजारातील उत्साह आणि लगबग पाहून संस्थेच्या उपाध्यक्षा चित्रलेखा ढोले यांनी विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक केले. सदर कार्यक्रमा...

कै.विष्णुपंत बाब्रस यांना आजी-माजी नेत्यांनी वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली, तर अजित पवार यांची संतवन पर भेट

इंदापूर :तालुक्यातील माजी नायब तहसीलदार कै.विष्णुपंत (भाऊसाहेब) बाब्रस यांचे नुकतेच दुःखद निधन झाले ते मा.नगरसेवक विनायक बाब्रस यांचे ते वडील होते,राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार ,मा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या कन्या खा.सुप्रियाताई सुळे,आमदार.दत्तात्रय भरणे भाजपची ज्येष्ठ नेते हर्षवर्धनजी पाटील  पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीपदादा गारटकर यांनी बाब्रस कुटुंबीयांचे सांत्वन केले   त्यांच्या  आत्म्यास चिरशांती लाभो असे मत यावेळी अजित दादा पवार यांनी व्यक्त केले याप्रसंगी   मा.उपनगराध्यक्ष धनंजय बाब्रस  मा.नगरसेवक श्रीधर बाब्रस  अॅड विलास बाब्रस निखिल बाब्रस, अथर्व बाब्रस व शिवाजी इजगुडे सह इंदापूर तालुक्यातील सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते बाब्रस भाऊसाहेब यांनी त्यांच्या शासकीय सेवेतील३५वर्षातील कळात,यशस्वी कामगिरी केली, गोरगरीब जनतेचे प्रमाणीक पणे काम केले, अडलेल्या जनसामान्य जनतेला सहकार्य केले, सलाम त्यांच्या कार्याला आशा शब्दात, बाब्रस...

*जय भवानीगड विकास प्रतिष्ठान लाखेवाडीमध्ये वार्षिक क्रिडा सप्ताहाचे आयोजन*

 इंदापूर जय भवानीगड विकास प्रतिष्ठान संचलित, विद्यानिकेतन स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज व प्रेसिडेन्सी इंटरनॅशनल स्कूल लाखेवाडी यांच्या संयुक्त विद्यमानाने दिनांक 17 /11/ 2025 ते 22/11/2025 रोजी क्रिडा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.   खेळ ही शारीरिक व मानसिक कला आहे. खेळामुळे शारीरिक  चपळता वाढते.खेळाचे प्रामुख्याने मैदानी खेळ व बैठे खेळ असे दोन प्रकार मानले जातात. प्रशालेमध्ये क्रिकेट, कबड्डी, खो-खो,लंगडी, रस्सीखेच,रिले 100 मी ,रिले 400 मी, थालीफेक इ खेळाचे आयोजन करण्यात आले.  विद्यार्थ्यांचा सर्वागीण विकास व्हावा या उद्देशानेच प्रशालेमध्ये क्रिडा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.  क्रिडा सप्ताहाच्या निमित्ताने प्रशालेतील मैदानावर विविध खेळाची जयंत तयारी करण्यात आली.  क्रिडा सप्ताहाच्या उद्घाटनप्रसंगी मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे तसेच मैदान पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.  मशाल फेरी काढून विविध खेळांच्या सामन्यांची सुरवात करण्यात आली.   कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्या निकेतन स्कूल जुनियर कॉलेजचे प्राचार्य गणेश पवार...