कर्मयोगीची 35 वी वार्षिक सर्वसाधारण सभा ऑनलाईन संपन्न,केंद्रशासनाचे इथेनॉल व साखर निर्यात धोरणासंदर्भात विशेष अभिनंदन इंदापूर (21 मार्च) कर्मयोगी शंकररावजी पाटील सह. साखर कारखान्याची 35 वी वार्षिक सर्वसाधारण सभा कोविड-19 या संसर्गजन्य रोगाच्या प्रादुर्भावामुळे व महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार ऑनलाईन कॉन्फरन्सिंगव्दारे कोरोनाचे सर्व नियम पाळून कारखान्याचे आदरणीय चेअरमन मा.श्री. हर्षवर्धनजी पाटीलसो, यांचे अध्यक्षतेखाली व कारखान्याच्या व्हाईस चेअरमन मा.श्रीमती पद्माताई भोसले ,भरतशेठ शहा, तसेच सर्व संचालक मंडळ, निरा-भिमा सह. साखर कारखान्याचे चेअरमन मा.श्री. लालासाहेब पवार, व्हाईस चेअरमन मा.श्री. कांतीलाल झगडे, ऍ़ड. कृष्णाजी यादव यांचे उपस्थितीमध्ये तसेच सभासदांचे ऑनलाईन उपस्थितीव्दारे उत्स्फुर्त प्रतिसादात संपन्न झाली. विषयपञिकेवरील विषयांचे वाचन कारखान्याचे कार्यकारी संचालक श्री. बाजीराव सुतार यांनी केले. व त्यास सभासदांनी हात वर करून मंजुरी दिली. विषयपञिकेवरील सर्व विषयांचे मंजुरीनंतर सभासदांनी कारखान्यासाठी काही व...
SHIVSRUSTHI NEWS