उजनी धरणाची सुरक्षा 'रामभरोसे'; गेटवरील पहारेकरी गायब, धरणात मोजणीचा 'राडा',धरणाला धोका, किसनराव तात्यांचा प्रशासनाला कडक डोस
इंदापूर विठ्ठलाच्या पंढरीला पाणी पाजणारं आणि लाखो शेतकऱ्यांची तहान भागवणारं आपलं उजनी धरण सध्या देवाच्याच भरोशावर चाललंय की काय, असा झणझणीत प्रश्न आता उपस्थित झालाय. ज्येष्ठ बागायतदार किसनराव तात्या भांगे यांनी धरणाच्या सुरक्षेवरून प्रशासनाचे पार वाभाडे काढले आहेत. उजनी धरण सध्या देवाच्या म्हणजेच 'रामभरोसे' चाललंय की काय, अशी जोरदार चर्चा सुरू झाली आहे. धरणाच्या या ढिसाळ कारभारावर ज्येष्ठ बागायतदार किसनराव तात्या भांगे यांनी प्रशासनाचे चांगलेच कान उपटले असून एक झणझणीत सवाल उपस्थित केला आहे.नेमकं प्रकरण काय हाय,जमिनी मोजणीचा सस्पेन्स: पूर्वी धरणासाठी शेतकऱ्यांच्या ज्या जमिनी संपादित केल्या होत्या, त्या जमिनी अचानक सरकारने मोजायला सुरुवात केली आहे. पण ही मोजणी नक्की कशासाठी आणि कोणासाठी चालली आहे? याचं गुपित सांगायला सरकार तयार नाही.,परप्रांतीयांची 'एन्ट्री' आणि सुरक्षेचा 'एक्झिट': तात्यांचा थेट संशय आहे की, या जागेवर एखादा मोठा प्रकल्प आणण्याचा डाव आहे. प्रकल्प आला की बाहेरून परप्रांतीय कामगार येणार. मग आपल्या स्थानिक लोकांच्या हक्काचं काय? आणि इतक्या संवेदनशील ठिकाणी गर्दी वाढली, तर धरणाच्या सुरक्षेची वाट लागणार नाही का?तीन गेट, पण माणूस एकही नाही: धरणाकडे जायला तीन मुख्य गेट आहेत. पण कमाल म्हणजे, या तिन्ही गेटवर आजघडीला हजेरी लावायला एकही सुरक्षारक्षक नाही! गेट उघडे बोडके पडलेत, कुणीही यावं आणि कुणीही जावं, अशी अवस्था आहे.
"तिन्ही गेटवर एकही सुरक्षारक्षक नाही, मग उजनीची सुरक्षा नक्की कोणाच्या हातात आहे? उद्या तिथे काही अघटित घडलं तर जबाबदार कोण? सरकारला फक्त जमिनी मोजण्यात रस आहे की धरणाची काळजी घ्यायलाही वेळ आहे?" अशा शब्दांत तात्यांनी प्रशासनाला धारेवर धरलं आहे.
उजनी धरणात पाण्याचा साठा भरपूर आहे, पण सुरक्षेच्या बाबतीत मात्र प्रशासनाचा पार 'सुकाकाळ' आहे. सरकारने आतातरी डोळे उघडावेत, नाहीतर उजनीची सुरक्षा कायमची 'रामभरोसे' व्हायला वेळ लागणार नाही!
टिप्पण्या