*पंतप्रधानांच्या 'हरित वाहतूक' आवाहनाला राजवर्धन पाटील यांचा सकारात्मक प्रतिसाद; पर्यावरण रक्षणासाठी इलेक्ट्रिक वाहनाचा वापर सुरू!
देशाचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी केलेल्या पर्यावरणपूरक वाहतुकीच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत इंदापूरचे युवा नेते राजवर्धन हर्षवर्धन पाटील यांनी एक कौतुकास्पद पाऊल उचलले आहे. "हरित वाहतूक"आणि इंधन बचतीच्या दृष्टीने त्यांनी आपल्या सेवेत नवीन इलेक्ट्रिक वाहन दाखल केले असून, आजपासून त्याचा प्रत्यक्ष वापर करण्यास सुरुवात केली आहे.
पर्यावरण संवर्धन, वाढते प्रदूषण आणि पारंपारिक इंधनाचा तुटवडा या पार्श्वभूमीवर राजवर्धन पाटील यांनी घेतलेला हा निर्णय सध्या मतदारसंघात विशेष चर्चेचा आणि कौतुकाचा विषय ठरत आहे.याप्रसंगी बोलताना राजवर्धन पाटील म्हणाले की, "पर्यावरण संरक्षण, इंधन बचत आणि प्रदूषणमुक्त भारताच्या निर्मितीसाठी इलेक्ट्रिक वाहनांचा वापर ही आजच्या काळाची गरज बनली आहे. स्वच्छ आणि हरित भविष्यासाठी आपण सर्वांनीही शक्य तितक्या प्रमाणात इलेक्ट्रिक वाहनांचा स्वीकार करावा.
वाढत्या वायुप्रदूषणामुळे आणि इंधनाच्या गगनाला भिडलेल्या किंमतींमुळे जगभरात आता पर्यायी ऊर्जेचा वापर वाढवण्यावर भर दिला जात आहे. अशातच, इंदापूर तालुक्यातील एका अग्रगण्य युवा नेतृत्वाने स्वतः इलेक्ट्रिक वाहनाचा वापर सुरू करून समाजासमोर, विशेषतः तरुण पिढीसमोर एक नवा आदर्श ठेवला आहे. 'झाडे लावा, पर्यावरण वाचवा' यासोबतच आता 'प्रदूषणमुक्त वाहने वापरा' असा एक उत्तम संदेश या माध्यमातून संपूर्ण इंदापूर तालुक्यात गेला आहे.
टिप्पण्या