इंदापूर
असिफभाई शेख इंदापूर तालुक्यातील सरडेवाडी टोल नाक्याजवळ, संगम हॉटेलसमोर झालेल्या एका भीषण मोटारसायकल अपघातात, दालज वाहतूक पोलीस विभागाने समयसूचकता आणि तत्परता दाखवत एका जखमी व्यक्तीचा जीव वाचवला आहे. पोलिसांच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.सरडेवाडी टोल नाक्याजवळ मोटारसायकलचा अपघात झाल्याची माहिती मिळताच, दालज वाहतूक पोलीस विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी काही मिनिटांतच घटनास्थळी दाखल झाले. अपघात स्थळी झालेली गर्दी आणि वाहतूक कोंडी लक्षात घेता, पोलिसांनी सर्वप्रथम वाहतूक सुरळीत केली. त्यानंतर, कोणतीही वेळ न घालवता टोल प्रशासनाच्या रुग्णवाहिकेला तातडीने पाचारण केले आणि जखमी व्यक्तीला उपचारासाठी तातडीने उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.अपघातानंतर दाखवलेल्या या तत्परतेबद्दल आणि माणुसकीच्या या कार्याबद्दल खालील पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचे विशेष कौतुक होत आहे.ए.एस.आय. भानुदास बंडगर,ए.एस.आय. ए.एस आय सतिश हिरवे,सचिन वाघ,ए.एस.आय. देविदास ढोले,हेड कॉन्स्टेबल विठ्ठल गायकवाड,हेड कॉन्स्टेबल शशिकांत खाडे नागरिकांकडून पोलिसांचे अभिनंदन पोलिसांच्या या तत्परतेमुळे जखमी व्यक्तीला वेळेत उपचार मिळाले. या कार्याबद्दल सरडेवाडी ग्रामस्थ, वाहन चालक आणि टोल प्रशासनाने संबंधित पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचे आभार मानले आहेत. "जर पोलीस अशी तत्परता दाखवत असतील, तर सामान्य नागरिकही त्यांना मदतीसाठी खांद्याला खांदा लावून नक्कीच साथ देतील," अशी भावना या वेळी स्थानिक नागरिकांमध्ये व्यक्त होत होती.
इंदापूर जय भवानी गड विकास प्रतिष्ठान संचलित, विद्या निकेतन स्कूल अॅण्ड जुनियर कॉलेज व प्रेसिडेंसी इंटरनॅशनल स्कूल, विद्या निकेतन कॉलेज ऑफ फार्मसी व विद्यानिकेतन इन्स्टिटय़ूट ऑफ इंजिनिअरिंग अॅण्ड टेक्नॉलॉजी यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 05/12/2025 रोजी आठवडा बाजाराचे नियोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांंना बाजारातल्या व्यवहाराची माहिती देण्यासाठी आणि त्यांना प्रत्यक्ष अनुभव देण्यासाठी प्रशाले मध्ये आठवडा बाजार भरवला होता. बाजारातील खरेदी विक्रीची माहिती मिळावी, पैश्याचा वापर कसा करावा याची जाणीव असावी, या उद्देशाने या आठवडे बाजाराचे नियोजन करण्यात आले होते.विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढावा पैश्याचे महत्त्व समजावे . भाजीपाला विक्री सोबत फळभाज्या विविध फळे, विविध खाद्यपदार्थ यांच्या खवय्यांनी विद्यार्थ्यांनी मनसोक्त आनंद लुटला. फळे , भाजीपाला विक्री करताना विद्यार्थ्यांच्या चेहर्यावरचा आनंद ओसंडून वहात होता. बाजारातील उत्साह आणि लगबग पाहून संस्थेच्या उपाध्यक्षा चित्रलेखा ढोले यांनी विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक केले. सदर कार्यक्रमा...
टिप्पण्या