मुख्य सामग्रीवर वगळा

इंदापूरच्या राजकारणात 'संगीत खुर्ची'! गडकरींच्या गाडीत बसून नेत्यांची 'जय हरी विठ्ठल' वारी;

इंदापूर:"-राजकारणात 'नेते बदलतात, पण निष्ठा बदलत नाही' असं म्हणतात. पण सध्या इंदापूर तालुक्याच्या राजकारणाने जो नवा 'म्युझिकल चेअर'चा खेळ सुरू केलाय, तो पाहून बिचाऱ्या मतदारांच्या डोक्याचा पार दही झालाय! आज केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी इंदापूरच्या पालखी मार्गाच्या (इंदापूर-अकलूज पट्टा) पाहणी दौऱ्यावर आले होते. गडकरी आले तर रस्ते चकाचक होणार हे उघडच आहे, पण त्यांच्या गाडीत जी 'राजकीय सरमिसळ' बसली होती, ती पाहून इंदापुरातल्या जनतेने थेट कपाळावर हात मारून घेतलाय.
एका बाजूला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (सुनेत्राताई पवार गट - महायुती) चे कृषीमंत्री दत्तूमामा भरणे बसलेले. दुसऱ्या बाजूला काल-परवापर्यंत भाजपमध्ये असलेले आणि आता थेट तुतारी हाती घेतलेले राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) चे हर्षवर्धनभाऊ पाटील. तर खाली स्वागताला भाजपचे प्रदीपदादा गारटकर आणि प्रवीणभैय्या माने!

बाप रे बाप! अशी खिचडी तर हॉटेलमध्येही मिळत नाही. ज्यांच्या कार्यकर्त्यांनी निवडणुकीत एकमेकांचे कपडे फाडायचे बाकी ठेवले होते, ते सगळे नेते आज नितीन गडकरींच्या 'हायवे'वर एकाच गाडीत अगदी 'गुण्यागोविंदाने' फिरत होते.हा अभूतपूर्व सोहळा पाहून इंदापूरच्या चहाच्या टपरीवर आज एकच चर्चा रंगली होती:
अहो भाऊ, कालपर्यंत हे एकमेकांना बघून तोंड फिरवत होते, आज एकाच गाडीत बसून खड्डे मोजत आहेत! उद्या आम्ही कोणाच्या नावाचा जयजयकार करायचा?" — एक वैतागलेला मतदार.

जनतेने यातून काय बोध घ्यावा? बोध हाच घ्यायचा की: कार्यकर्त्यांनो, तुम्ही एकमेकांची डोकी फोडून घ्या, नेते शेवटी एसी गाडीत एकत्रच फिरणार! पक्ष कोणताही असो, 'गडकरी साहेबांचा निधी' सर्वांनाच प्रिय असतो.पाहणी दौऱ्यात गडकरींनी कामाचा वेग वाढवण्याच्या सूचना दिल्या, पण कार्यकर्त्यांच्या मनात वेगळाच 'हायवे' धावत होता. हर्षवर्धनभाऊ मनात म्हणत असतील, "निधी आमचाच, कारण आम्ही 'तुतारी' वाजवून रस्ता आणलाय!" तर दत्तूमामा मनात म्हणत असतील, "घड्याळ तर आमचंच चालतंय, रस्ता कसा काय तुमचा?" आणि बिचारे भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते लांबूनच बघत विचार करत होते, "या दोघांच्या नादात आमचे कमळ नक्की कुठे उमलणार?"
इंदापूरच्या राजकारणाने आज सिद्ध केलं की, इथे विचारधारा, पक्ष, गट-तट सगळं 'खड्ड्यात' गेलंय! जो रस्ता पालखीसाठी बनतोय, त्याच रस्त्यावरून हे चारही नेते आगामी निवडणुकीत आपापली राजकीय 'दिंडी' कशी काढतात, हे पाहणे रंजक ठरणार आहे.आशी सामान्य जनतेत चर्चा आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

जय भवानीगड विकास प्रतिष्ठान मधील बालचिमुकल्यानी घेतला आठवडा बाजाराचा आनंद

  इंदापूर जय भवानी गड विकास प्रतिष्ठान संचलित, विद्या निकेतन स्कूल अ‍ॅण्ड जुनियर कॉलेज व प्रेसिडेंसी इंटरनॅशनल स्कूल, विद्या निकेतन कॉलेज ऑफ फार्मसी व विद्यानिकेतन इन्स्टिटय़ूट ऑफ इंजिनिअरिंग अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 05/12/2025 रोजी आठवडा बाजाराचे नियोजन करण्यात आले होते.  विद्यार्थ्यांंना बाजारातल्या व्यवहाराची माहिती देण्यासाठी आणि त्यांना प्रत्यक्ष अनुभव देण्यासाठी प्रशाले मध्ये आठवडा बाजार भरवला होता. बाजारातील खरेदी विक्रीची माहिती मिळावी, पैश्याचा वापर कसा करावा याची जाणीव असावी, या उद्देशाने या आठवडे बाजाराचे नियोजन करण्यात आले होते.विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढावा पैश्याचे महत्त्व समजावे . भाजीपाला विक्री सोबत फळभाज्या विविध फळे, विविध खाद्यपदार्थ यांच्या खवय्यांनी विद्यार्थ्यांनी मनसोक्त आनंद लुटला.  फळे , भाजीपाला विक्री करताना विद्यार्थ्यांच्या चेहर्‍यावरचा आनंद ओसंडून वहात होता.  बाजारातील उत्साह आणि लगबग पाहून संस्थेच्या उपाध्यक्षा चित्रलेखा ढोले यांनी विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक केले. सदर कार्यक्रमा...

कै.विष्णुपंत बाब्रस यांना आजी-माजी नेत्यांनी वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली, तर अजित पवार यांची संतवन पर भेट

इंदापूर :तालुक्यातील माजी नायब तहसीलदार कै.विष्णुपंत (भाऊसाहेब) बाब्रस यांचे नुकतेच दुःखद निधन झाले ते मा.नगरसेवक विनायक बाब्रस यांचे ते वडील होते,राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार ,मा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या कन्या खा.सुप्रियाताई सुळे,आमदार.दत्तात्रय भरणे भाजपची ज्येष्ठ नेते हर्षवर्धनजी पाटील  पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीपदादा गारटकर यांनी बाब्रस कुटुंबीयांचे सांत्वन केले   त्यांच्या  आत्म्यास चिरशांती लाभो असे मत यावेळी अजित दादा पवार यांनी व्यक्त केले याप्रसंगी   मा.उपनगराध्यक्ष धनंजय बाब्रस  मा.नगरसेवक श्रीधर बाब्रस  अॅड विलास बाब्रस निखिल बाब्रस, अथर्व बाब्रस व शिवाजी इजगुडे सह इंदापूर तालुक्यातील सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते बाब्रस भाऊसाहेब यांनी त्यांच्या शासकीय सेवेतील३५वर्षातील कळात,यशस्वी कामगिरी केली, गोरगरीब जनतेचे प्रमाणीक पणे काम केले, अडलेल्या जनसामान्य जनतेला सहकार्य केले, सलाम त्यांच्या कार्याला आशा शब्दात, बाब्रस...

*जय भवानीगड विकास प्रतिष्ठान लाखेवाडीमध्ये वार्षिक क्रिडा सप्ताहाचे आयोजन*

 इंदापूर जय भवानीगड विकास प्रतिष्ठान संचलित, विद्यानिकेतन स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज व प्रेसिडेन्सी इंटरनॅशनल स्कूल लाखेवाडी यांच्या संयुक्त विद्यमानाने दिनांक 17 /11/ 2025 ते 22/11/2025 रोजी क्रिडा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.   खेळ ही शारीरिक व मानसिक कला आहे. खेळामुळे शारीरिक  चपळता वाढते.खेळाचे प्रामुख्याने मैदानी खेळ व बैठे खेळ असे दोन प्रकार मानले जातात. प्रशालेमध्ये क्रिकेट, कबड्डी, खो-खो,लंगडी, रस्सीखेच,रिले 100 मी ,रिले 400 मी, थालीफेक इ खेळाचे आयोजन करण्यात आले.  विद्यार्थ्यांचा सर्वागीण विकास व्हावा या उद्देशानेच प्रशालेमध्ये क्रिडा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.  क्रिडा सप्ताहाच्या निमित्ताने प्रशालेतील मैदानावर विविध खेळाची जयंत तयारी करण्यात आली.  क्रिडा सप्ताहाच्या उद्घाटनप्रसंगी मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे तसेच मैदान पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.  मशाल फेरी काढून विविध खेळांच्या सामन्यांची सुरवात करण्यात आली.   कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्या निकेतन स्कूल जुनियर कॉलेजचे प्राचार्य गणेश पवार...