इंदापुरात धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती निमित्त विनम्र अभिवादन,'शंभूराजांचा इतिहास प्रेरणादायी' - नगराध्यक्ष भरतभाऊ शहा
इंदापूर: स्वराज्यरक्षक, अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त इंदापूर नगरपरिषदेच्या वतीने भव्य अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी इंदापूरचे नगराध्यक्ष मा. भरतभाऊ शहा यांच्या हस्ते छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी नगराध्यक्ष भरतभाऊ शहा यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना महाराजांच्या पराक्रमाचा गौरव केला. ते म्हणाले की, "छत्रपती संभाजी महाराजांचे बलिदान आणि शौर्य हे युगानुयुगे पिढ्यांना प्रेरणा देणारे आहे. त्यांचा स्वाभिमान आणि स्वराज्याप्रती असलेली निष्ठा आजच्या तरुणाईने अंगीकारणे काळाची गरज आहे."
या कार्यक्रमाला नगराध्यक्षांसोबत उपनगराध्यक्ष मा.बाळासाहेब ढवळे, गटनेते,शकीलभाई सय्यद,नगरसेवक प्रतिनिधी, भारत शिंदे, मा.प्रशांत उंबरे,गणेश महाजन, पोपट शिंदे,स्वप्नील राऊत, नगरसेवक शुभम पोपटराव पवार, भैय्या हरणावळ, अमोल माने यांच्यासह नगरपरिषदेचे इतर पदाधिकारी, कर्मचारी आणि शहरातील अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी 'जय शंभूराय'च्या घोषणा देत परिसर दणाणून सोडला होता.
टिप्पण्या