इंदापूर निमगाव केतकी (प्रतिनिधी):गोरगरीब आणि सर्वसामान्य जनतेच्या सुख-दुःखात नेहमीच वरदान ठरणारे, निमगाव परिसरातील सर्व सोयींयुक्त व भव्य मंगल कार्यालय म्हणजेच केतकेश्वर सांस्कृतिक भवन’ या नामांकित कार्यालयाने आपल्या यशस्वी सेवेची १२ वर्षे पूर्ण करून १३ व्या वर्षात पदार्पण केले आहे. त्यानिमित्त परिसरातून आणि विविध स्तरातून या कार्यालयावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
कोणतीही मोठी गोष्ट ही एका छोट्याशा विचारातून आणि प्रामाणिक प्रयत्नातून जन्माला येते, याचाच प्रत्यय केतकेश्वर सांस्कृतिक भवनच्या प्रवासाकडे पाहताना येतो. तात्यासाहेब कोरटकर, मुख्तार मुलाणी आणि हरीशकुमार वाघमोडे या तिघांनी एकत्र येऊन सर्वसामान्यांच्या सुविधेसाठी एका छोट्या रोपट्याच्या रूपाने या कार्यालयाची सुरुवात केली होती. आज त्यांच्या अथांग परिश्रमातून, सचोटीतून आणि उत्कृष्ट व्यवस्थापनामुळे या रोपट्याचा एक डेरेदार वटवृक्ष झाला आहे.
आजच्या महागाईच्या काळात सर्वसामान्य आणि गोरगरीब जनतेला परवडेल अशा दरात, परंतु कोणतीही तडजोड न करता अत्याधुनिक आणि दर्जेदार सोयी-सुविधा पुरवण्याचे काम केतकेश्वर सांस्कृतिक भवनने सातत्याने केले आहे. लग्नकार्य, मुंज, वाढदिवस असो वा इतर सामाजिक-सांस्कृतिक कार्यक्रम, निमगाव आणि इंदापूर परिसरातील नागरिकांची पहिली पसंती नेहमीच या कार्यालयाला राहिली आहे. आपल्या विश्वासामुळेच आमचा हा प्रवास यशस्वी झाला!"अशी कृतज्ञता भावना व्यवस्थापनाकडून व्यक्त करण्यात आली आहे. हे कार्यालय 'अलिशन अँड केतकेश्वर बिझनेस ग्रुप' अंतर्गत चालवले जाते. बापूसाहेबनगर, इंदापूर-बारामती रोड, निमगाव केतकी (ता. इंदापूर, जि. पुणे) येथे निसर्गरम्य आणि भव्य जागेत हे भवन दिमाखात उभे आहे.कार्यालयाचे उत्तम व्यवस्थापन पाहणारे मॅनेजर आयाज मुलाणी (मो. ९५०३१७४५९१) यांच्या मार्गदर्शनाखाली येथील कर्मचारी अत्यंत तत्परतेने सेवा देत आहेत.१३ व्या वर्धापनदिनानिमित्त केतकेश्वर सांस्कृतिक भवनच्या सर्व संचालकांना, व्यवस्थापकांना आणि कर्मचाऱ्यांना पुढील यशस्वी वाटचालीस व भावी प्रगतीस हार्दिक शुभेच्छा!.-.शिवसृष्टी न्यूज
टिप्पण्या