निरा भिमा कारखान्याच्या संचालक मंडळाची खंडाळा येथील कॉम्प्रस्ड बायोगॅस प्लांटला भेट -कारखान्याचे कॉम्प्रस्ड बायोगॅस प्लांट उभारणीचे नियोजन-हर्षवर्धन पाटील
इंदापूर : प्रतिनिधी दि.25/5/26
देशामध्ये ऊर्जेच्या क्षेत्रामध्ये क्रांतीकारक बदल घडून येत आहे. या बदलाला अनुसरून शहाजीनगर येथील नीरा भीमा सहकारी साखर कारखान्याचे कॉम्प्रस्ड बायोगॅस प्लांट (C.N.G. PLANT) उभारणीचे नियोजन सूरू केले आहे. यास अनुसरून कारखान्याचे संस्थापक व राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ नवी दिल्लीचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील व अध्यक्षा सौ.भाग्यश्री पाटील यांचे समवेत संचालक मंडळाने अहिरे, ता. खंडाळा येथील राज प्रोसेसच्या कॉम्प्रस्ड बायोगॅस प्लांटला रविवारी (दि. 25) भेट देऊन पाहणी केली.
निरा भीमा कारखान्याने स्थापनेपासूनच नेहमीच काळजी गरज ओळखुन सातत्याने एक पाऊल यशस्वीरित्या पुढे टाकलेले आहे, त्यानुसार कारखान्याचे कॉम्प्रेसर बायोगॅस (CBG) उत्पादनाचे नियोजन आहे, अशी माहिती कारखान्याचे संस्थापक हर्षवर्धन पाटील यांनी कॉम्प्रेसर बायोगॅस प्लॅन्ट पाहणी प्रसगी दिली.
हर्षवर्धन पाटील पुढे म्हणाले, कॉम्प्रस्ड बायोगॅस हे शाश्वत आणि पर्यावरणपूरक पर्यायी इंधन आहे. या प्लांटसाठी लागणारे प्रेस मड, डिस्टिलरीतील टाकाऊ पदार्थ ( स्पेंट वॉश), शेतीतील अवशेष (ऊस पाचट), बहुवर्षीय नेपियर गवत आदी आपल्या भागामध्ये उपलब्ध आहेत, त्यामुळे हा प्रकल्प बाराही महिने सुरू राहणार आहे. यापासून उच्च-शुद्धतेचे हरित इंधन सीबीजी उत्पादित केले जाणार आहे. या उत्पादित कॉम्प्रेस्ड बायोगॅसला सर्वत्र प्रचंड मागणी आहे.
यावेळी राज प्रोसेसचे मालक अनिलराज पिसे यांनी हर्षवर्धन पाटील व अध्यक्षा सौ. भाग्यश्री पाटील स्वागत केले तसेच पाहणी प्रसंगी प्लांटची माहिती दिली. याप्रसंगी लालासाहेब पवार, उदयसिंह पाटील, विलासराव वाघमोडे, अँड. कृष्णाजी यादव, दत्तू सवासे, प्रतापराव पाटील, प्रकाश मोहिते, राजकुमार जाधव, विजय घोगरे, सुभाष गायकवाड, राजेंद्र देवकर, महेशकुमार शिर्के, आनंदराव बोंद्रे, रामचंद्र नाईक, राहुल कांबळे, दत्तात्रय पोळ, निवृत्ती शिंदे, कार्यकारी संचालक नवनाथ सपकाळ, अधिकारी उपस्थित होते.
---------------------------------
साखर उद्योग हा साखर निर्मिती करणारा उद्योग राहिलेला नसून सध्या या उद्योगाची ऊर्जा (Enarji ) क्षेत्राकडे मजबुतीने वाटचाल सुरू आहे. शाश्वत ऊर्जेमध्ये झालेल्या बदलामुळे कॉम्प्रेस्ड बायोगॅस (CBG ) हे देशातील आश्वासक क्षेत्रांपैकी एक बनले आहे, असे यावेळी नीरा भीमा कारखान्याच्या अध्यक्षा सौ. भाग्यश्री पाटील यांनी सांगितले.
टिप्पण्या