महाराष्ट्र राज्य एकनाथ स्वाभिमानी शिक्षक सेना पुणे जिल्हा यांच्या वतीने विद्यार्थ्यांचा गुणगौरव......
इंदापूर महाराष्ट्र राज्य एकनाथ स्वाभिमानी शिक्षक सेना पुणे जिल्हा यांच्यावतीने काल इंदापूर येथे गुरुकृपा सांस्कृतिक भवन येथे भव्य दिव्य असा इयत्ता दहावी व बारावी परीक्षेमध्ये प्रथम तीन आलेले क्रमांक यांचा ट्राफि, पुस्तक,प्रमाणपत्र, देऊन त्यांचा उपस्थिती मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमाची सुरुवात अध्यक्षांची निवड करून अध्यक्ष व मान्यवरांच्या हस्ते दीप प्रजनन करून तसेच क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले ज्योतिबा फुले आनंद दिघे बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली.
यावेळी या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून एकनाथ स्वाभिमानी शिक्षक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष बापूसाहेब अडसूळ सर तसेच प्रमुख पाहुणे म्हणून मंगेश चिवटे यांचे बंधू महेश चिवटे उपस्थित होते तसेच यावेळी प्रमुख उपस्थित पाहुणे म्हणून पुणे विभागीय मुख्याध्यापक संघ अध्यक्ष महाराष्ट्र राज्य रामभाऊ पाडोळे सर तसेच इंदापूर तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष जगन्नाथ पाटील सर पश्चिम महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे विभागीय अध्यक्ष रमेश राऊत राष्ट्रवादी पार्टी मा.विरोधी पक्षनेता पोपट शिंदे एकनाथ शिंदे गट इंदापूर शहराध्यक्ष एडवोकेट आनंद केकान, भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा इंदापूर शहर अध्यक्ष लखन भैय्या जगताप, भारत हरणावळ सर प्रा. नेताजी कॉलेज मोहोळ काशीद सर, मुख्याध्यापक प्रवीण लोंढे, शिक्षक सोसायटी चेअरमन अवसरी नाना घळके, महिला पोलीस मित्र संघटना अध्यक्ष रेश्मा शेख तसेच महादेवी सोननिस, अनिता मखरे, एकनाथ स्वाभिमानी शिक्षक संघटनेचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष वैभव शेटे, इंदापूर हिंदी अध्यापक संघाचे मा. अध्यक्ष राज रणमोडे सर,अरुणा कवडे मॅडम तसेच इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाची प्रस्तावना वैभव शेटे सर यांनी केली तर प्रमुख पाहुणे यांनी उपस्थित विद्यार्थी विद्यार्थिनी व पालक यांचे कौतुक करून त्यांना प्रेरणा दिली तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष यांनी विद्यार्थ्यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी पुणे जिल्हा एकनाथ स्वाभिमान शिक्षक संघटनेची कार्यकारणी निवड करण्यात आली.
यावेळी इंदापूर तालुक्यातील साठ शाळेतील दोनशे विद्यार्थ्यांना ट्रॉफी शैक्षणिक पुस्तक व प्रमाणपत्र व गुलाब पुष्प देऊन विद्यार्थी पालक मुख्याध्यापक यांना गौरवण्यात आले. या कार्यक्रमासाठी विद्यार्थी पालक व शिक्षक मुख्याध्यापक हजारोच्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित सर्वांना नाष्ट्याची सोय करण्यात आली होती. हा कार्यक्रम जवळजवळ चार तास सुरू होता यावेळी उपस्थित सर्व विद्यार्थी पालक यांच्या मध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते उपस्थित पालक व मान्यवरांनी या कार्यक्रमाचे कौतुक करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एकनाथ स्वाभिमानी शिक्षक सेना पुणे जिल्हा अध्यक्ष दत्तात्रय गवळी सर यांनी केले तर आभार प्रदर्शन दीपक वडापुरी सर यांनी केले या कार्यक्रमासाठीसागर घरत, मोहन शिंदे गणेश गवळी विठ्ठल शिंदे सचिन लोंढे दीपक वडापुरे उपस्थित होते एकनाथ स्वाभिमानी शिक्षक संघटनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
टिप्पण्या