इंदापूर (प्रतिनिधी):
एकेकाळी ज्ञानाचे माहेरघर मानल्या जाणाऱ्या इंदापूर तालुक्यात आता शिक्षणाचे पूर्णपणे व्यापारीकरण' झाले असल्याचे चित्र दिसत आहे. तालुक्यातील नामांकित शिक्षण संस्थांमध्ये सध्या प्रायव्हेटायझेशनचे (खाजगीकरण)पेव फुटले असून, सर्वसामान्य आणि गोरगरीब पालकांची लूट करण्याचे जणू सत्रच सुरू झाले आहे. "शाळा राहिली बाजूला, आता सगळीकडे अकॅडमीच गाजतेय," अशी संतापजनक प्रतिक्रिया तालुक्यातील पालकांमधून उमटत आहे.
इंदापूरमधील बहुतांश शिक्षण संस्थांनी आता स्वत:च्याच परिसरात खाजगी 'अकॅडमी' थाटल्या आहेत. साध्या शिक्षणापेक्षा या अकॅडमीचे शुल्क अव्वाच्या सव्वा असून, हे पैसे भरताना सामान्य शेतकऱ्याचे कंबरडे मोडत आहे. केवळ नफा कमवणे हाच एकमेव उद्देश ठेवून या संस्था कार्यरत असल्याचे दिसत आहे.
ज्याप्रमाणे बारामतीमध्ये शिक्षणाचे मोठे हब झाले, मात्र तिथे सर्वसामान्यांच्या मुलांपेक्षा श्रीमंतांच्या पोरांचेच चोचले जास्त पुरवले जातात, तशीच अवस्था आता इंदापूरची होताना दिसत आहे. मोठ्या इमारती आणि जाहिरातींच्या झगमगाटात गुणवत्ते'पेक्षा 'बिलाला' जास्त महत्त्व दिले जात आहे. वेळेत आवर घातला नाही, तर काही दिवसांत इंदापूरचे शिक्षण क्षेत्र सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेलेले असेल.जनतेला वेठीस धरून लुटू नका, कुठं फेडणार हे पाप...! आशी जनतेत चर्चा..
****************************************
टिप्पण्या