मुख्य सामग्रीवर वगळा

भोंदू महाराज चक्क 'वाळू माफियांचे' गॉडफादर,होते,वाळू चोर भोंदूबाबांची अवैध प्रकरणे मिटविण्यासाठी तत्पर, वेळ प्रसंगी जिव द्यायला तयार

इंदापूर/पुणे: पुणे आणि सोलापूर जिल्ह्याला वरदान ठरलेल्या उजनी धरणाच्या पट्ट्यात सध्या एक अजब आणि धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. गोरगरीब जनतेला देवादिकांच्या नावाखाली गंडा घालणारे आणि स्वतःला 'महात्मा' म्हणवून घेणारे भोंदू महाराज आता चक्क 'वाळू माफियांचे' संरक्षक (गॉडफादर) बनले आहेत. अंधश्रद्धेच्या दुकानातून लाखो रुपये कमवणारे हे भामटे आता थेट उजनीच्या वाळू चोरांना अभय देत असल्याचे समोर आल्याने, सामान्य जनतेच्या डोळ्यातून संतापाच्या ज्वाला बाहेर पडत आहेत.
एकीकडे गोरगरीब भाविकांना "तुमचे ग्रह फिरले आहेत", "घरात दोष आहे" असे सांगून सोन्या-चांदीचे दागिने आणि रोकड लाटणाऱ्या या भोंदू बाबांचा दरारा मोठा आहे. मात्र, या भोंदू महाराजांची खरी माया उजनीच्या काळ्या सोन्यात म्हणजेच वाळूमध्ये दडलेली आहे. आम्ही वीरकर महाराज यांचे शिष्य आहोत, महाराजांना काही झाले तर पहीला वार आमच्यावर घेऊ म्हणणारे वाळू व्यवसायिक एवढे आंधळे झाले कसे,काही दिवसा पुर्वी इंदापूर तालुक्यातील काही पत्रकारांनी वीरकर महाराज अडचणीत येणार आशा बातम्या टाकल्या होत्या ,विरकर महाराजांचा पर्दाफाश करणारे धाडसी इंदापूर चे पत्रकार, यांच्या कार्याला सलाम...! पण भोंदूबाबांच्या विरोधात बातमी टाकू नका म्हणुन पत्रकारांचे पाय धरणारे वाळू चोर कुठे बसले आहेत, वाळु चोरांनी या भोंदूबाबांचे आनेक प्रकरणे मिटवली आहेत,पैशांचा माज आसणारे भामट्या वाळु चोरावर पोसिसांनी कठोर कारवाई  यावी,
कसा चालतोय खेळ? रात्रीच्या वेळी उजनीच्या पात्रातून बेकायदेशीरपणे वाळू उपसणारे गुन्हेगार या महाराजांच्या आश्रयाला जातात. विरकर महाराज त्यांना सुरक्षा कवच,देत होते, बाबांच्या दरबारात येणाऱ्या राजकीय मंडळींना आणि पोलिसांना हे बाबा "ते आमचेच भक्त आहेत" असे सांगून 'क्लीन चिट' देतात.
नफा-तोटा समीकरण: या बदल्यात वाळू माफियांकडून बाबांना दरमहा 'श्रद्धा' म्हणून मोठी रक्कम पोहोचवली जातहोती,, असा धक्कादायक आरोप परिसरातील नागरिकांकडून होत आहे.
या महाभागांनी आता आपल्या व्यवसायाचा विस्तार केला आहे. पूर्वी फक्त लिंबू-मिरची आणि धागे-दोऱ्यांवर चालणारा त्यांचा धंदा आता थेट 'रेती'वर (वाळूवर) येऊन पोहोचला आहे. गोरगरीब नागरिक जेव्हा देवाच्या दर्शनासाठी किंवा समस्या सोडवण्यासाठी जातात, तेव्हा त्यांना उलट वाळू उपशाचे 'पुण्य' असल्याचे सांगून चक्क वाळू माफियांच्या गाड्यांना वाट मोकळी करून दिली जाते. 
आम्ही देवाला घाबरून जगणारे लोक आहोत, पण हे महाराज स्वतःलाच देव समजून वाळू चोरांना पाठीशी घालत आहेत. अशा भोंदूबाबांवर आणि वाळू माफियांच्या या युतीवर प्रशासनाने कठोर कारवाई केली पाहिजे -स्थानिक नागरिकांचे मत आहे, राजकीय क्षेत्रातील आदर्श व्यक्तिमत्व समाजकारणात राजकारणात सक्रिय आंधळे भक्त यांचे शिष्य बनले होते,यांचा जनतेने काय आदर्श घ्यावा,उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यारखा माणूस जादू ठोणा करून संपवला,आशी जनतेत चर्चा आहे,महसूल विभागातील अधिकारी तहसीलदार नदीपात्रात कधीच येऊ नये म्हणून हे भामटे महाराज करणीबाधी,लिंबु मिरची,कासव,इतर साहित्य वाळु चोरांना देय होते,आशी जनतेत चर्चा आहे,
एका बाजूला महसूल आणि पोलीस विभाग वाळू माफियांवर कारवाई करण्याचे नाटक करत आहे, तर दुसऱ्या बाजूला या भोंदू महाराजांच्या वरदहस्तामुळे वाळू तस्कर बिनधास्त आहेत. त्यामुळे आता जनतेचा प्रश्न एकच आहे या भोंदू बाबांची वाळू माफियांसोबतची 'भक्ती' कधी संपणार आणि प्रशासन कारवाई कधी करणार?...! 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

जय भवानीगड विकास प्रतिष्ठान मधील बालचिमुकल्यानी घेतला आठवडा बाजाराचा आनंद

  इंदापूर जय भवानी गड विकास प्रतिष्ठान संचलित, विद्या निकेतन स्कूल अ‍ॅण्ड जुनियर कॉलेज व प्रेसिडेंसी इंटरनॅशनल स्कूल, विद्या निकेतन कॉलेज ऑफ फार्मसी व विद्यानिकेतन इन्स्टिटय़ूट ऑफ इंजिनिअरिंग अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 05/12/2025 रोजी आठवडा बाजाराचे नियोजन करण्यात आले होते.  विद्यार्थ्यांंना बाजारातल्या व्यवहाराची माहिती देण्यासाठी आणि त्यांना प्रत्यक्ष अनुभव देण्यासाठी प्रशाले मध्ये आठवडा बाजार भरवला होता. बाजारातील खरेदी विक्रीची माहिती मिळावी, पैश्याचा वापर कसा करावा याची जाणीव असावी, या उद्देशाने या आठवडे बाजाराचे नियोजन करण्यात आले होते.विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढावा पैश्याचे महत्त्व समजावे . भाजीपाला विक्री सोबत फळभाज्या विविध फळे, विविध खाद्यपदार्थ यांच्या खवय्यांनी विद्यार्थ्यांनी मनसोक्त आनंद लुटला.  फळे , भाजीपाला विक्री करताना विद्यार्थ्यांच्या चेहर्‍यावरचा आनंद ओसंडून वहात होता.  बाजारातील उत्साह आणि लगबग पाहून संस्थेच्या उपाध्यक्षा चित्रलेखा ढोले यांनी विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक केले. सदर कार्यक्रमा...

*जय भवानीगड विकास प्रतिष्ठान लाखेवाडीमध्ये वार्षिक क्रिडा सप्ताहाचे आयोजन*

 इंदापूर जय भवानीगड विकास प्रतिष्ठान संचलित, विद्यानिकेतन स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज व प्रेसिडेन्सी इंटरनॅशनल स्कूल लाखेवाडी यांच्या संयुक्त विद्यमानाने दिनांक 17 /11/ 2025 ते 22/11/2025 रोजी क्रिडा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.   खेळ ही शारीरिक व मानसिक कला आहे. खेळामुळे शारीरिक  चपळता वाढते.खेळाचे प्रामुख्याने मैदानी खेळ व बैठे खेळ असे दोन प्रकार मानले जातात. प्रशालेमध्ये क्रिकेट, कबड्डी, खो-खो,लंगडी, रस्सीखेच,रिले 100 मी ,रिले 400 मी, थालीफेक इ खेळाचे आयोजन करण्यात आले.  विद्यार्थ्यांचा सर्वागीण विकास व्हावा या उद्देशानेच प्रशालेमध्ये क्रिडा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.  क्रिडा सप्ताहाच्या निमित्ताने प्रशालेतील मैदानावर विविध खेळाची जयंत तयारी करण्यात आली.  क्रिडा सप्ताहाच्या उद्घाटनप्रसंगी मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे तसेच मैदान पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.  मशाल फेरी काढून विविध खेळांच्या सामन्यांची सुरवात करण्यात आली.   कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्या निकेतन स्कूल जुनियर कॉलेजचे प्राचार्य गणेश पवार...

कै.विष्णुपंत बाब्रस यांना आजी-माजी नेत्यांनी वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली, तर अजित पवार यांची संतवन पर भेट

इंदापूर :तालुक्यातील माजी नायब तहसीलदार कै.विष्णुपंत (भाऊसाहेब) बाब्रस यांचे नुकतेच दुःखद निधन झाले ते मा.नगरसेवक विनायक बाब्रस यांचे ते वडील होते,राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार ,मा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या कन्या खा.सुप्रियाताई सुळे,आमदार.दत्तात्रय भरणे भाजपची ज्येष्ठ नेते हर्षवर्धनजी पाटील  पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीपदादा गारटकर यांनी बाब्रस कुटुंबीयांचे सांत्वन केले   त्यांच्या  आत्म्यास चिरशांती लाभो असे मत यावेळी अजित दादा पवार यांनी व्यक्त केले याप्रसंगी   मा.उपनगराध्यक्ष धनंजय बाब्रस  मा.नगरसेवक श्रीधर बाब्रस  अॅड विलास बाब्रस निखिल बाब्रस, अथर्व बाब्रस व शिवाजी इजगुडे सह इंदापूर तालुक्यातील सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते बाब्रस भाऊसाहेब यांनी त्यांच्या शासकीय सेवेतील३५वर्षातील कळात,यशस्वी कामगिरी केली, गोरगरीब जनतेचे प्रमाणीक पणे काम केले, अडलेल्या जनसामान्य जनतेला सहकार्य केले, सलाम त्यांच्या कार्याला आशा शब्दात, बाब्रस...