इंदापूर कडक उन्हाळा असो वा वाढते प्रदूषण, इंदापूरकरांना आता त्याची फिकीर उरलेली नाही. "अतिक्रमण हटाव" पेक्षा "अतिक्रमण करूच नका" हा मंत्र जपत माजी नगराध्यक्षा सौ. अंकिताताई मुकुंदशेठ शहा,यांनी इंदापूरच्या मोकळ्या पण मोक्याच्या जागांचे थेट 'मिनी फॉरेस्ट'मध्ये रूपांतर केले आहे. त्यांना त्यांचे पती मा.मुकुंदशेठ शहा [ इंदापूरचे सयाजी शिंदे,]
यांनी,मोलाची साथ दिली,घरचीच नर्सरी आसल्याने यांनी कोट्यावधी हून अधिक झाडांची,लागवड केली,अटल वन,ऑक्सिजन पार्क,इतर ठीकाणी मोठ्या प्रमाणावर झाडे लावून वनराई बहरली जनतेला आगळा वेगळा संदेश दिला.एखाद्या नेत्याचा वाढदिवस असेल तर झाडं मात्र शहा नर्सरीतीलच लावली जातात ,अकलूज रोड आणि टेंभुर्णी रोडवर फेरफटका मारला, तर तुम्हाला इंदापूर शहरात आहोत की महाबळेश्वरमध्ये, असा प्रश्न पडल्याशिवाय भविष्यात राहणार नाही, नेहमीच सिमेंटची जंगले वाढवण्याकडे कल असतो, पण अंकिताताईंनी मात्र 'घनदाट जंगल स्टाईल'वृक्षारोपण करून इंदापूरला एक नवी ओळख दिली आहे. ज्या मोकळ्या जागांवर उद्या टपऱ्या किंवा अनधिकृत बांधकामं होण्याची शक्यता होती, तिथे अंकिताताईंनी निसर्गाचा पहारा बसवला आहे. या मोहिमेची काही खास वैशिष्ट्ये अकलूज आणि टेंभुर्णी रोडवरील मोकळ्या भूखंडांवर देशी वृक्षांची लागवड करून तिथे 'अर्बन फॉरेस्ट' (शहरी जंगल) विकसित करण्यात आले आहे.झाडे मोठी झाल्यामुळे तिथे आता अनधिकृत बांधकामांना जागाच उरलेली नाही. निसर्गानेच या जागांना संरक्षण कवच दिले आहे.स्वच्छ व हरित इंदापूर: "झाडे लावा, पर्यावरण वाचवा" हा केवळ कागदावरचा संदेश न राहता, तो प्रत्यक्षात रस्त्यावर उतरला आहे.आज परिस्थिती अशी आहे की, हीच झाडे इंदापूरकरांसाठी 'मायेची सावली' ठरत आहेत. उन्हाच्या कडाक्यात हैराण झालेले नागरिक आणि प्रवासी,अथवा राजकीय विरोधक आता याच झाडांखाली विसावा घेत आहेत."पूर्वी या मोकळ्या जागेत धूळ आणि कचरा असायचा. आता इथे घनदाट झाडी आहे. आमची वाहनं सुरक्षित सावलीत उभी राहतात आणि दोन मिनिटं थांबलं तरी मनाला शांती मिळते," अशी भावना स्थानिक वाहनचालक व्यक्त करत आहेत.
टेंभुर्णी रोडला आता महागड्या शेडची गरज उरलेली नाही. अंकिताताईंनी लावलेली झाडे इतकी दाट झाली आहेत की, खाली शेकडो गाड्या अगदी आरामात "कुलिंग" मोडवर पार्क असतात.दुपारची डुलकी आता झाडाखाली भर दुपारी विश्रांती घेण्यासाठी इंदापूरकर आता घरी नाही, तर या झाडांच्या मायेच्या सावलीत जाताना दिसतात. 'ऑक्सिजन युक्त इंदापूर' केवळ कागदावर नाही, तर नागरिकांच्या फुफ्फुसात उतरले आहे.मोकळ्या जागेवर कुणी खोका टाकायचा विचार करण्यापूर्वीच तिथे एखादं वडाचं किंवा पिंपळाचं झाड हसत उभं असतं. "अतिक्रमण करायला जागाच शिल्लक ठेवायची नाही," ही अंकिताताईंची अनोखी रणनीती सुपरहिट ठरली आहे."आज आपण लावलेली ही झाडं उद्याची मायेची सावली आहेत. पर्यावरण वाचलं, तरच आपण वाचू!"असा संदेश देत अंकिताताईंनी केवळ झाडे लावली नाहीत, तर ती जगवून दाखवली आहेत. आज हीच झाडं प्रवाशांना विसावा देतात, पशू-पक्ष्यांना घर देतात आणि इंदापूरकरांना शुद्ध हवा देतात.
अकलूज रोडवर आता फक्त गाड्या धावत नाहीत, तर निसर्गही बहरतोय. माजी नगराध्यक्षांच्या या 'ग्रीन' कार्याला इंदापूरकरांचा कडक सॅल्यूट! आता पाहायचं एवढंच की, या झाडांच्या गर्दीत गारवा शोधायला येणारे लोक स्वतःच्या गाडीसोबत एखादी पाण्याची बादली झाडांसाठी नेतात का? झाडे लावा, पर्यावरण वाचवा...
टिप्पण्या