मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

जून, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

लक्ष्मी वैभव न्युज, शिवसृष्टी न्युज

आरटीओ चा नियम मोडून,बेशिस्त वाहणे लावणा-या,सी.एन.जी. गॅस पंपाचा परवाना रद्द करा - बाळासाहेब सरवदे इंदापूर, ता. इंदापूर, जि. पुणे गांवचे हद्दीत राष्ट्रीय महामार्ग कं. ६५ पुणे सोलापूर हायवे रोडलगत असलेला श्री. व्यवहारे यांचे सी 'एन.जी. गॅस पंपाची पार्कींग सुविधा नसल्यामुळे गॅस भरणारी वाहने हायवे रोडवर उभी राहिल्याने वाहतुकीस अडथळा होऊन, गंभीर अपघात होत असल्याने त्यांचेवर योग्य कार्यवाही होवुन सी.एन.जी. गॅस पंपाचा परवाना रद्‌द  करण्यात यावा आशी मागणी बाळासाहेब सरवदे  कार्याध्यक्ष बारामती लोकसभा आर.पी.आ. (आठवले) यांनी जिल्हा अधिकारी पुणे यांच्या कडे केली आहे, या वेळी सरवदे म्हणाले की  इंदापूर, ता. इंदापूर, जि. पुणे गांवचे हद्दीत राष्ट्रीय महामार्ग कं. ६५ पुणे सोलापूर हायवे रोडलगत हॉटेल पायल जवळ श्री. व्यवहारे (व्यवहारे पेट्रोलियम) यांचा सी.एन.जी. गॅस पंप सदरचा सी एन.जी. पंप हा डिझेल व पेट्रोल पंपावरच चालु आहे. त्यामळे सौ.एन.जी. गस भरण्यासाठी येणारी वाहनांना पेट्रोलपंपाची पार्कींग उपलब्ध नसल्याने वाहने हायवे रोडवरती उभी राहतात त्यामळे हायवे रोडवरुन वाहतक करणाऱ्या ...

लक्ष्मी वैभव न्युज, शिवसृष्टी न्युज

कृषी विभाग शेतकऱ्यांच्या हितासाठी कि कर्मचारी अधिकाऱ्यांच्या मा.नितीन(दादा)आरडे इंदापूर:-शिवशाही शेतकरी संघटना महाराष्ट्र राज्य* शासनाचा कृषी विभाग नेमके काय करतो ?आपला देश कृषिप्रधान देश असून देशाची अर्थव्यवस्था ही शेतीवर आधारलेली आहे. असे आपल्याला वारंवार सांगितले जाते. मग त्या शेतीच्या विकासासाठी जे कृषी खाते आहे ते नेमके शेतकऱ्यांसाठी काय करते. हा संशोधनाचा विषय झाला आहे.*  *खरीप हंगाम, रब्बी हंगाम येतात आणि जातात परंतु कृषी खात्याच्या कार्यालयात मात्र ठराविक शेतकरी असतात. ठराविक योजना असतात व त्या ठराविक लोकांनाच मिळतात. त्या मिळत असताना संबंधित हे अर्थपूर्ण संबंध ठेवत असतात. ही बाब आता उघड झाली आहे.*  *कृषी विभागातील कृषी अधिकारी, कृषी सहाय्यक हे बहुदा बांधावर कधीच जात नाहीत. कारण ते साहेब झाले असल्यामुळे त्यांना शासन नियमित पगार देते बांधावर गेल्याचा अहवाल तयार करण्याचा पगार मिळतो की काय असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही.*  *म्हणजे कृषी विभागाच्या जोरावर  इथल्या शेतकऱ्यांनी कृषी क्षेत्रात क्रांती करावी ते कृषी विभागातील अधिकारी मात्र दरमहा मिळणारा प...

लक्ष्मी वैभव न्युज, शिवसृष्टी न्युज

काळूस ला 100पेशंटची त्वचा व केस गळती मोफत तपासणी - डाॅ.सौ.धनश्री कळमकर पाटील काळूस:- दिनांक २७/६/२१ रोजी काळूस ता.खेड जि.पुणे या ठिकाणी काळूस च्या  सरपंच सौ.धनश्री पवळे पाटील आणि मा. सौ पल्लवी रोहिदास पवळे यांच्या प्रयत्नातून आणि सहकार्यातून काळुस येथे  Absulute skin clinic  यांच्या मार्फत त्वचा व केसांच्या समस्या बाबत मोफत तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते,१००पेशंट ची मोफत त्वचा व केसांची मोफत तपासणी करण्यात आली आसल्याची माहिती डाॅ.सौ.धनश्री कळमकर पाटील यांनी दिली, या वेळी त्या म्हणाल्या की ग्रामीण भागातील तळागाळातील गोरगरिबांसाठी आम्ही आशा शिबिराचे आयोजन करत आसतो, या मध्ये महिला मध्ये मोठ्या प्रमाणावर  त्वचेच्या व केस गळती या समश्या आढळतात, त्यांना वैद्यकीय सल्ला मिळत नसल्याने अनेकांना त्वाचारोग सारख्या आजाराचे विनाकारण बळी पडावे लागते, आसेही डाॅ.कळमकर म्हणाल्या,  या कार्यक्रमात पुढे बोलताना,सरपंच सौ.धनश्री पवळे पाटील म्हणाले की सध्या ग्रामीण भागातील जनतेसाठी आसे विवीध उपक्रम राबविण्यात साठी आम्ही सर्व प्रकारचे सहकार्य करणार आहोत ,जास्तीत जास्त ...

लक्ष्मी वैभव न्युज, शिवसृष्टी न्युज,

शिवशाही शेतकरी संघटनेच्या लढ्यात सामिल व्हा,-संस्थापक नितीन दादा आरडे   इंदापूर:- कृषी पंतप्रधान अर्थव्यवस्था असलेल्या देशातील  शेती आणि शेतकरी खूप मोठ्या अडचणीत आहे आहे शेतकऱ्यांच्या नावावर मते मागून प्रत्येकच राजकीय पक्षाने सत्ता मिळवली शेतकऱ्यांना आश्वासने देऊन त्यांच्या मात्र तोंडाला पाने पुसली शेतकऱ्यांच्या अनेक संघटना आहेत परंतु त्या संघटनांमध्ये मतभेद आहेत, खरेतर शेतकऱ्यांच्या समस्यांची सोडवणूक करण्याच्या कामामध्ये मतभेदांना स्थान नसायला हवे होते असो आजचा शेतकरी पूर्णपणे अडचणीत आहे,शेती व जोड धंदे तोट्याची झाले आहेत एका बाजूला शेतीमध्ये उत्पादन घेतले तर हमी भाव नाही शेतीमध्ये हमीभाव नाही म्हणून दैनंदिन गरजा भागवण्यासाठी दुग्ध व्यवसाय शेळीपालन कुकुट पालन हे व्यवसाय बेभरवशाचे आहेत, दुधाला भाव नाही दूध शेतकऱ्यांचे मलई मात्र डेरी चालक खातात, आसे मत शिवशाही शेतकरी संघटना महाराष्ट्र राज्य,संस्थापक अध्यक्ष,मा.नितीनदादा आरडे -पाटील याांनी व्यक्त केले,यावेेळी ते म्हणाले की, शेळी पालन कुकुटपालन ची तीच अवस्था कोंबड्या पाळाव्यात तर थेट शेतकऱ्याकडून कोणीही घेत ...

लक्ष्मी वैभव न्युज, शिवसृष्टी न्युज

निमसाखर रस्ता बनला मृत्यू चा सापळा,रस्त्याचे काम निकृष्ठ दर्जाचे-शेखर पानसरे ग्रामपंचायत सदस्य  इंदापूर:- पुणे जिल्हा परिषद, सदस्य यांनी जनतेच्या हितासाठी या रस्त्याचे काम मंजूर केले,पण सबंधीत ठेकेदाराने रस्त्याचे काम निकृष्ठ दर्जाचे केले आहे, या रस्त्याचे काम होऊन एक वर्ष सुध्दा उलटले नाही,रस्ता खड्यात की खड्डा रस्तात हेच कळत नाही, आशी माहिती शेखर पानसरे ग्रामपंचायत सदस्य निमसाखर यांनी दिली, या वेळी ते म्हणाले की, हा रस्ता पुर्ण पणे उखडला आहे, त्या मुळे रात्री अपरात्री कोणी आजारी पडला तर दवाखान्यात जाण्या आगोदरच त्याला मरण यातना सहन कराव्या लागतात, या रस्तावर अनेक अपघात ही घडले आहेत, त्या मध्ये अनेकजन अपंग झाले आहेत, याला जबाबदार कोण?,  बांधकाम विभाग यांच्या अंतर्गत येणारा,निमसाखर ते पागळेवस्ती रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली असुन रस्त्यांचे झालेले काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे त्या रत्त्यावरून निमसाखर येथून इंदापुर व बारामती येथे जाणा-या लोकांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत आहे, या रस्त्यावर कारंडेवस्ती, पानसरेवस्ती शेखवस्ती, शिरसटवाडी, ...

लक्ष्मी वैभव न्युज, शिवसृष्टी न्युज

सामाजिक परिवर्तनात राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे मोठे योगदान - हर्षवर्धन पाटील  इंदापूर: थोर समाज सुधारक, प्राथमिक शिक्षण, जातिभेद निवारण, अस्पृश्यता निवारण इत्यादी सुधारणाचे पुरस्कर्ते छत्रपती शाहू महाराज यांना  147 व्या जयंतीनिमित्त माजी मंत्री व भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून इंदापूर येथे शनिवारी (दि. 26) अभिवादन केले.             सामाजिक परिवर्तनात राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे मोठे योगदान आहे, असे गौरवोद्गार हर्षवर्धन पाटील यांनी काढले.          यावेळी नगरसेवक कैलास कदम, शकीलभाई सय्यद, संजय सानप, ललेंद्र शिंदे, संतोष देवकर, शिवाजी शिंदे , धनंजय पाटील, शेखर पाटील ,बापू जामदार, नाना जौंजाळ, सचिन जामदार, संदीप चव्हाण, प्रदीप जामदार  व कार्यकर्ते उपस्थित होते. ____________________________

लक्ष्मी वैभव न्युज, शिवसृष्टी न्युज

सामजिक क्षेत्रातील आयडॉल- प्रा. जयश्री गटकुळ वैचारिक,  अभ्यासू , दिलखुलास व्यक्तिमत्व,   प्रामाणिक आणि सुसंस्कृत महिला नेतृत्व म्हणून समाजात ओळखल्या जाणाऱ्या प्रा. जयश्री गटकुळ या  विश्व प्रतिष्ठान इंदापूर या शैक्षणिक संस्थेच्या संस्थापक- अध्यक्षा , जिजाऊ ब्रिगेड पुणे जिल्हा अध्यक्षा आणि इंदापूर महाविद्यालयांमध्ये  प्रोफेसर म्हणून कार्यरत आहेत.  दूरदृष्टी आणि अष्टपैलू  व्यक्तिमत्व असलेल्या प्रा.डॉ जयश्री गटकुळ उर्फ माई महिलांसाठी नव्हे तर सर्व  समाजासाठी एक प्रेरणास्थान आहे ,  विचारवंत आणि सामाजिक बांधिलकीची जाण ठेवणाऱ्या असून  गरजूंना मदत करणे, अन्याय झाला तर आवाज उठविणे, अशावेळी आक्रमक भूमिका घेऊन न्याय मिळवून देणे, पारदर्शकता ठेवणे, गरीब विद्यार्थ्यांना सर्वोतोपरी मदत करून खूप मोठ्या पदापर्यंत जाण्यासाठी मार्गदर्शन करणे, कठीण काळात मदतीसाठी धावून जाणे हा त्यांचा स्थायीभाव आहे. सतत विधायक कामात राहून लहान-थोरांचा आदर करणे ही त्यांची गुणवैशिष्ट्ये आहेत. त्यांचा अनेक विषयाचा दांडगा व्यासंग इतिहास, विज्ञान, सामाजिक...

लक्ष्मी वैभव न्युज, शिवसृष्टी न्युज

निरा भिमा कारखान्याच्या कर्मचाऱ्यांकडून सापडलेली रक्कम संबंधितांकडे सुपूर्त    इंदापूर :शहाजीनगर येथील नीरा भीमा सहकारी साखर कारखान्याच्या कर्मचाऱ्यांना सापडलेली रोख रक्कम रु.3000 व कागदपत्रे ही संबंधित व्यक्तीकडे सुपूर्त करण्यात केली. या प्रामाणिकपणाबद्दल कारखान्याचे कार्यकारी संचालक डी.एन.मरकड यांनी संतोष शिंदे व सदाशिव बरकडे या कर्मचाऱ्यांचा गुरुवारी (दि.24) सत्कार करून कौतुक केले.            कारखान्याचे कर्मचारी संतोष शिंदे व सदाशिव बरकडे हे दि.21 जून रोजी कामानिमित्त इंदापुर अर्बन बँकेत गेले होते. तेथून बाहेर आलेवर त्यांना बँकेसमोर प्लॅस्टिकच्या कॅरी बॅगमध्ये रू. 3 हजार व काही कागदपत्रे सापडली. त्यानंतर संतोष शिंदे व सदाशिव बरकडे यांनी कागदपत्रातील नावावरून  दूरध्वनीवरून संपर्क साधून मोहन नारायण पवार (रा. कौठळी ता. इंदापूर ) यांना कारखान्यावरती बोलावून सदरची रक्कम व कागदपत्रे प्रामाणिकपणे परत केली. या प्रामाणिकपणाबद्दल संतोष शिंदे व सदाशिव बरकडे यांचे कारखान्याचे संस्थापक व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, अध्यक्ष लालासाहेब पवार,...

लक्ष्मी वैभव न्युज, शिवसृष्टी न्युज

  तेजप्रुथ्वी ग्रुप च्या वतीने,सुर नवा ध्यास नवा,ची उपविजेती राधा खुडे चा सन्मान   इंदापुरः येथे तेजप्रुथ्वी ग्रुप च्या वतीने इदांपुर तालुक्याची शान ,सुर नवा ध्यास नवा ,या कार्यक्रमाची उपविजेती कु.राधा दत्तु खुडे यांचा सत्कार तेजप्रुथ्वी ग्रुपच्या अनिताताई नानासाहेब खरात यांच्या हस्ते फेटा बाधुंन व शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन केला,  तसेच त्यांच्या पालकांनी हालाकिच्या परिस्थितीत ही राधाला पुढे नेले तिच्या अपेक्षा प्रमाणे तीला शिकण्याची संधी उपलब्ध करून दिली, या गोष्टी चा आदर्शवत पालकांनी घ्यावा असे सागुंन राधास  भावी वाटचालीस अनिताताई खरात यांनी शुभेच्छा दिल्या, त्या वेळेस येथून पुढे राधा ला स्पर्धेला बाहेर कोठे ही जायचे असेल तरी त्याचा सर्व खर्च तेजप्रुथ्वी ग्रुप करेल असे नानासाहेब खरात  यांनी जाहीर केले तसेच या वेळी तेजप्रुथ्वी ग्रुप तर्फे सन्मान पत्र देऊन खुडे यांचा सन्मान करण्यात आला या वेळी तेजप्रुथ्वी ग्रुप चे उपाध्यक्ष गणेश भाऊ शिंगाडे, महेश शिंदे,मनिषा हरणावळ, अनिता ताटे ,संपत पुणेकर, पुणे जिल्हा सोशल मिडीया अध्यक्ष रूपेश वाघमोडे, तसेच राध...

लक्ष्मी वैभव न्युज, शिवसृष्टी न्युज

कलर्स मराठी वरील सुर नवा ध्यास नवा कार्यक्रमाचे उपविजेती राधा खुडे हीचा सत्कार करून देशपांडे व्हेज च्या वतीने १११११रू धनादेश अपर्णा देशपांडे यांचे हस्ते देण्यात आला  इंदापूर:- संगीत शिक्षिका राधा खुडे हिने कलर्स मराठी वरील सुर नवा ध्यास नवा आशा उद्याची या कार्यक्रमाच्या महिला विशेष पर्वात तृतीय  क्रमांकाने विजेती होण्याचा बहुमान पटकावल्या बदल तीचा सत्कार करण्यात आला, देशपांडे व्हेज चे उदय देशपांडे व किरण गानबोटे म्हणाले की .राधा खुडे हिने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत संगीताचे  शिक्षण घेतले  व लाखेवाडी येथील विद्यानिकेतन स्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये संगीत शिक्षिका म्हणून ती रुजू झाली व प्रशालेतील मुला-मुलींना त्यांनी खूप चांगल्या प्रकारे संगीताचे गायनाचे शिक्षण दिले संगीताचे शिक्षण देत असताना स्वतः देखील संगीताची व गायनाची आवड जोपासून कलर्स मराठी वरील सुर नवा ध्यास नवा अशा उद्याची या कार्यक्रमात पाच हजार स्पर्धकातू न  प्रथम तीन स्पर्धकात येण्याचा बहुमान मिळवला याच तिच्या कार्याचा गौरव करण्यासाठी  देशपांडे व्हेज इंदापुर च्या वतीने कु रा...

लक्ष्मी वैभव न्युज, शिवसृष्टी न्युज

विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणाची गरज ही तालुक्यातच पुर्ण होणार -हर्षवर्धन पाटील              इंदापूर:- तालुक्यात चालू शैक्षणिक वर्षापासून 3 महाविद्यालयांमध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे विविध अभ्यासक्रम सुरु करण्यास माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या प्रयत्नामुळे शासनाने मान्यता दिली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणाची गरज ही तालुक्यातच पुर्ण होणार आहे.                 इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय इंदापूर येथे विज्ञान व तंत्रज्ञान अभ्यासक्रम अंतर्गत १) एम. एस्सी. इनऑरगॅनिक केमिस्ट्री २) एम.एस्सी. मायक्रो बायोलॉजी  ३) एम. एस्सी. (अनॅलिटिकल केमिस्ट्री) ४) एम. एस्सी. (ऑरगॅनिक केमिस्ट्री). तर भिगवण येथील कला महाविद्यालयात  बी.एस्सी आणि बी. कॉम अभ्यासक्रम नव्याने सुरू होत असून, बी.ए अभ्यासक्रमाच्या अतिरिक्त तुकडीस मान्यता मिळाली आहे. बावडा येथील श्री शिवाजी एजुकेशन सोसायटी संचलित श्रीमती रत्नप्रभादेवी पाटील महाविद्यालयामध्ये ...

लक्ष्मी वैभव न्युज, शिवसृष्टी न्युज

मा.खा.राहुल गांधींचा वाढदिवस इंदापूर तालुका काँग्रेस कडून गांधीगिरी करत साजरा        इंदापूर:- काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांचा 51 वा वाढदिवस इंदापूर तालुका काँग्रेस कमिटीतर्फे विविध उपक्रम घेऊन साजरा करण्यात आला इंदापूर शहरातील फळ विक्रेते भाजीपाला विक्रेते छोटे-मोठे व्यापारी तसेच विना मास्क फिरणाऱ्या नागरिकांना स्वतःच्या हाताने काँग्रेसच्या पदअधिकाऱ्यांनी वीणा मास्क फिरणार्यांना मास्क घालून मास्क चे महत्व पटवून देऊन गांधीगिरी केली. यावेळी 501 पक्षाचे चिन्ह असलेले मास्क वाटप करण्यात आली.          तसेच इंदापूर शहरातील इरिगेशन कॉलनी येते घरोघरी जांभूळ या फळझाडांची रोपे वाटप करण्यात आली. त्याच कॉलनीत असलेले गणेश मंदिर परिसरात विविध फळांची व सावली देणारी रोपे लावण्यात आली.       यावेळी बोलताना तालुका अध्यक्ष स्वप्नील सावंत म्हणाले की शेतकऱ्यांना वाचवण्यासाठी, महागाई कमी करण्यासाठी, रोजगारी हटवण्यासाठी, देशाला वाचवण्यासाठी, आम्ही सर्व काँग्रेस कार्यकर्ते राहुलजींना सत्तेत आणण्याचा निर्धार करत आहे आजचा दिव...

लक्ष्मी वैभव न्युज, शिवसृष्टी न्युज

राधा खुडे हिचा १ लाख रूपयांचा धनादेश देऊन सत्कार,पुढील काळात पालकत्वाची जबाबदारी घेणार-दत्तात्रय भरणे   इंदापूर:-राज्यमंत्री नामदार श्री दत्तात्रय (मामा) भरणे यांनी १ लाख रूपयांचा धनादेश देऊन राधा खुडे हिचा गौरव करून हजारोंच्या साक्षीने पार पडलेल्या नेत्रदिपक सत्कार सोहळ्याप्रसंगी खुडे हिचे पालकत्वही स्विकारले                 सुर नवा ध्यास नवा या कलर्स मराठी वाहिनीच्या माध्यमातून महाराष्ट्रातील लाखो जनतेच्या मनावरती आपल्या पहाडी आवाजाने मंत्रमुग्ध करून अधिराज्य गाजवणारी कु.राधा खुडे हिचा नेत्रदिपक सत्कार सोहळा कळंब ग्रामपंचायतीच्या पुढाकाराने राज्यमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार श्री दत्तात्रय मामा भरणे यांच्या प्रमुख उपस्थितीत व हजारोंच्या साक्षीने फटाक्यांच्या आतिषबाजीत उत्साही वातावरणात संपन्न झाला.               यावेळी नामदार श्री भरणे मामा यांनी कु.राधा खुडे हिचा १ लाख रूपयांचा धनादेश देऊन सत्कार करून यापुढील काळात तिच्या पालकत्वाची जबाबदारी घेणार असल्याचे जा...

लक्ष्मी वैभव न्युज, शिवसृष्टी न्युज

भारतात ऑक्टोबरपर्यंत कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता- तज्ञ इंदापूर:-देशात कोरोना व्हायरसने गेल्या वर्षभरापासून कहर केला आहे. दिवसेंदिवस कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव वाढत असला तरी बाधितांची संख्या कमी-जास्त होताना दिसतेय. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतून थोडा दिलासा मिळाल्यानंतर आता तिसऱ्या लाटेची भीती व्यक्त केली जात आहे. वैद्यकीय तज्ज्ञांच्या रॉयटर्सच्या सर्वेक्षणानुसार, भारतात ऑक्टोबरपर्यंत कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. या सर्वेक्षणानुसार, नागरिकांना किमान एक वर्ष सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. या सर्वेक्षणात जगभरातील ४० आरोग्य तज्ज्ञ, डॉक्टर, वैज्ञानिक, विषाणूशास्त्रज्ञ, साथीच्या रोगाचे शास्त्रज्ञ आणि प्राध्यापकांचा समावेश होता. त्यांच्याकडून ३ ते १७ जून दरम्यान कोरोना व्हायरस संदर्भात अभिप्राय घेण्यात आला. सर्वेक्षणानुसार, ८५ टक्क्यांहून अधिक म्हणजे २४ पैकी २१ जणांनी असे सांगितले की, ऑक्टोबरपर्यंत तिसरी लाट देशात येणार आहे. त्यापैकी ३ जणांनी ऑगस्टच्या सुरूवातीस आणि १२ जणांनी सप्टेंबरमध्ये कोरोनाची तिसरी लाट येण्याचा अंदाज वर्तविला. उर्वरित तिघांनी नोव्हेंबर...

लक्ष्मी वैभव न्युज, शिवसृष्टी न्युज

चिंदादेवी सुगाव रस्ता डांबरी करण करा-रमेश तात्या पाटील   इंदापूर:-चिंदादेवी सुगाव रस्ता डांबरी करण करा कारण  सध्या पिंपरी गावातुन  रस्ता आहे.परंतु पिंपरी गावातुन आम्हाला वाहतुक करावी लागतं असलेने “गावातील लहान मुले, जनावरे, उकारंडे,कोंबड्या रस्त्यावर येऊन अनेकदा अपघात झाले आहेत.तसेच महीला वर्ग ही रस्त्यावर धुणे,भांडी करत असतात तसे-अनेक ठिकाणी भिंती कॉर्नरवर उभ्या केल्या असल्याने अपघात होत आहेत .व भविष्यात ही अपघात होण्याची शक्‍याता आहे. आमच्या सुगाव-अगोती पिंपरी असा शिव रस्ता खडीकरण केलेला आहे, परंतु गावातून फिरणं अवघड आहे, तरी आम्हाला ३ कि मी डांबरी करुन रस्ता करुन (सुगांव ते चिंदादेवी ) मिळावा या आशयाचे निवेदन रमेश तात्या पाटील यांनी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या कडे दिले आहे, या निवेदना वर अनेक गावक-यांच्या सह्या आहेत, 

लक्ष्मी वैभव न्युज, शिवसृष्टी न्युज

खाद्य तेलाच्या दरात घट झाल्याने,पुन्हा जेवणात चमचमीत पदार्थ येणार,आसल्याने गृहीणी खुष  इंदापूर:- कोरोना काळात खाद्यतेलाच्या भडकलेल्या दरवाढीची झळ सर्वसामान्यांना बसत होती. आता जागतिक बाजारपेठेतून स्थानिक बाजारपेठेत खाद्यतेलाची आवक वाढल्याने खाद्यतेलाच्या दरात घट झाली आहे. इंदापूर शहरात १६० रुपये प्रतिकिलो मिळणारे सोयाबीन तेल आता १४० रुपये प्रतिकिलोने मिळत आहे. कोरोनामुळे जागितक बाजारपेठेतून होणारी खाद्यतेलाची आवक कमी होत गेली होती. त्यामुळे देशभरात खाद्यतेलाचा तुटवडा जाणवत होता. त्यामुळे खाद्यतेलाच्या किमतीही चांगल्याच भडकल्या होत्या. अगोदरच कोरोनामुळे उद्योग, व्यवसाय ठप्प पडले. कामगारांच्या हाताचे काम गेले. शासनाने जाहीर केलेली मदतही वेळेत पोहोचली नसल्याने घर चालविताना तारेवरची कसरत करावी लागत होती आता निर्बंध शिथिल झाले असले तरी अद्याप रोजगाराचा प्रश्न कायम आहे. अशात खाद्यतेलाच्या किमती भडकल्याने सर्वसामान्यांना चांगलाच त्रास सहन करावा लागला. जेवणातून चमचमीत पदार्थ गायब झाले होते. आता जागतिक बाजारपेठेतून स्थानिक बाजारात खाद्यतेलाची आवक होत असल्याने खाद्यतेलाच्या...

लक्ष्मी वैभव न्युज, शिवसृष्टी न्युज

शिवसेनेचा वर्धापन दिना निमित्त विवीध कार्यक्रमाचे आयोजन-नितीन दादा शिंदे    इंदापूर:-शिवसेना पक्षाच्या ५५व्या वर्धापन  दिनानिमित्त दि .१९/६/२०२१रोजी इंदापुर तालुका शिवसेनेच्यावतीने खालील कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ११ वाजता- हिंदुह्रदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन.शिवसेना जनसंपर्क कार्यालय इंदापुर येते करण्यात येणार. व सकाळी ११-१५ वाजता,माऊली आश्रम शाळेतील मुलांना फळे व खाऊ वाटप करून  ११-३० वाजता- राम मंदिर येथील आश्रम शाळेला फळे व खाऊ वाटप करून ,दुपारी १२-००औद्योगिक प्रशिक्षण केंद्र इंदापूर सरस्वती नगर वृक्षारोपण करणार आहे तरी  तालुक्यातील आजी-माजी पदाधिकारी  व शिवसैनिकांनी उपस्थितीत  राहावे.असे आवाहन नितीन शिंदे,शिवसेना तालुकाप्रमुख इंदापुर व मेजर महादेव सोमंवशी इंदापुर शहर प्रमुख यांनी दिली यावेळी दुर्वास शेवाळे, बंडू शेवाळे, व इतर कार्यकर्ते उपस्थित होते. 

लक्ष्मी वैभव न्युज, शिवसृष्टी न्युज

प्रविण भैय्या माने यांच्या वाढदिवसा निमित्त  सफाई महिला कर्मचा-यांना साड्यांचे वाटप-दादासाहेब सोनवणे    इंदापूर :- येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठेनगर येथील माजी नगराध्यक्ष कै. अरुणरावजी ढावरे सभागृह येथे जिल्हा परिषदेचे मा. बांधकाम व आरोग्य सभापती प्रविणभैया माने यांच्या ३५ व्या वाढदिवसाच्या निमित्ताने इंदापुर नगरपरिषदेतील घनकचरा व्यवस्थापनातील कंत्राटी काम करणा-या सफाई महिला कर्मचा-यांना साड्यांचे वाटप करून सुमारे ३८ महिलांचा सन्मान करण्यात आला. सुरुवातीला राजमाता जिजाऊ यांच्या पुण्यतिथी निमित्त प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला.       जागतिक महामारी कोरोना व लाॅकडाऊन काळामध्ये या महिलांनी कुटुंबाचे व आपले आरोग्य धोक्यात घालून शहराचे आरोग्य अबाधित राखले. याची सामाजिक जाणीव ठेवून. प्रविणभैया माने मिञ परिवाराच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी स्थानिक मा.नगरसेवक दादासाहेब सोनवणे यांनी विशेष परिश्रम घेतले. प्रमुख मान्यवर  उद्योगपती मा. अतुलदादा माने यांचा सत्कार  मा. नगरसेवक दादासाहेब सोनवणे यांच...

लक्ष्मी वैभव न्युज, शिवसृष्टी न्युज

करोनाच्या तिसऱ्या लाटेत अधिक सतर्क व्हा  खासदार सुप्रिया सुळे : इंदापूर येथे आढावा बैठकीत आवाहन  इंदापूरः-करोना संसर्गजन्य आजाराने सर्वत्र थैमान घातले असून, तिसरी लाट येण्याची शक्यता आरोग्य तज्ज्ञांकडून वर्तवली जात आहे. तिसरी लाट दूर ठेवायची असेल तर, नागरिकांनी सतर्क राहून अधिकची काळजी घेणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन खामदार सुप्रिया सुळे यांनी केले. इंदापूर येथील पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सभागृहात खासदार सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुबारी (दि. १७) करोना नियंत्रण आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीच्या अध्यक्षस्थानी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे होते. यावेळी खासदार सुळे बोलत होत्या. यावेळी राष्ट्वादीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर,वसंत आरडे सरचिटणीस पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस, श्रीधर बाब्रस माजी नगरसेवक, प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे, तहसीलदार अनिल ठोंबरे, गटविकास अधिकारी विजयकुमार परीट, डॉ. सुहास शेळके, डॉ. प्रशांत महाजन, पोलोस निरीक्षक  धन्यकुमार गोडसे, जीवन माने, बिरप्पा लातुरे, दिलीप पवार, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे, कार्याध्यक्...

लक्ष्मी वैभव न्युज, शिवसृष्टी न्युज

वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून तेजपृथ्वी ग्रुप तर्फे माऊली अनाथ बालकाश्रमाला खाऊ वाटप  इंदापूर:- तेजप्रुथ्वी ग्रुप चे आदेश जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त तेजप्रुथ्वी ग्रुप चे सोशल मीडिया पुणे जिल्हा अध्यक्ष  रूपेश वाघमोडे यांनी तेज पृथ्वी ग्रुप तर्फे अनाथ बालकाश्रम सरस्वती नगर येथ मुलांना खाऊ वाटप केले, या वेळी नानासाहेब खरात  म्हणाले की जगताप यांनी इतर अनावश्यक खर्च टाळून   वाढदिवसानिमित्त केक न कापता व इतरत्र अवास्तव खर्च न करता अनाथ अनाथाश्रमात मुलांना खाऊ वाटप केले हा कार्यक्रम तेज पृथ्वी ग्रुपच्या अध्यक्षा सौ.अनिता नानासाहेब खरात यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला या वेळी माऊली नाचण, म्हणाले की सध्या कोरोना चा प्रादुर्भाव जरी कमी झाला,आसला तरी भिती आजून संपलेली नाही, तरीही आपण आपली काळजी घ्यावी, तेजपृथ्वी ग्रुप चा नेहमीच सामाजिक कार्यात सहभाग आसतो, त्यांनी अनाथआश्रमाला खाऊ वाटप केले हा उपक्रम  स्तुत्यच आहे,    या वेळी तेज पृथ्वी ग्रुप चे मार्गदर्शक नानासाहेब खरात,सामाजिक कार्यक्रमासाठी सतत आग्रेसर आसणारे प्रशांत मामा उंब...

लक्ष्मी वैभव न्युज, शिवसृष्टी न्युज

शेतक-यांचा पुळका आसणारा आंदोलन कर्ता  पीपल्स रिपब्लिकन पार्टी च्या दांड्याच्या भितीने गायब -संजय भैय्या सोनवणे  इंदापूर पोलिस स्टेशन चे पोलिस निरीक्षक धन्यकुमार गोडसे यांंना निवेदन देण्यात आले या वेळी संजय भैय्या सोनवणे, धनंजय तांबिले, व इतर कार्यकर्ते  उपस्थित होते, (छाया-धनंजय कळमकर  ) इंदापूर :- इंदापूर तालुक्यात महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटनेचे दि. १६/०६/२०२१ रोजी इंदापूर तहसील कचेरी समोर बेमुदत धरणे आंदोलन करणार होते, ते गुन्हा दाखल होईल या भीतीने हजरच राहीले नाहीत,आसे नसून ते आंदोलन कर्ते पीपल्स रिपब्लिकन पार्टी पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष संजय भैय्या सोनवणे यांच्या दांडा आंदोलनाच्या  भितीने आलेच नाहीत, आशी सामान्य जनतेत चर्चा आहे, आंदोलन कर्त्यांना इंदापूर तालुक्यातील शेतक-यांची एवढी काळजी होती, तर आंदोलन न करता कोणत्या बिळात लपून कुठे बसले आहेत, नौटंकी बहाद्दर, हे मात्र कळालेच नाही, आसे संजय भैय्या सोनवणे म्हणाले,               ५० वर्षापासून २२ गावांचा पाण्याचा प्रश्‍न राज्यमंत्री व सोलापूर जिल्हा पालक म...

लक्ष्मी वैभव न्युज, शिवसृष्टी न्युज

इंदापूर च्या पाण्यासाठी उजनी धरणासमोरील आंदोलनाचा आजचा 12वा दिवस मुर्दाड प्रशासनाला जाग आणनारच  -संजय भैय्या सोनवणे  इंदापूर:-तालुक्याच्या हक्काच्या पाण्यासाठी उजनी धरणासमोरील आंदोलनाचा आजचा 11वा दिवस पीपल्स रिपब्लिकन पार्ट च्या वतीने उजनी धरण तरटगाव गेट येथे बेमुदत धरणे आंदोलन सुरू आहे इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना हक्काचे पाणी मिळावे  उजनी धरणग्रस्तांना सोलापूर जिल्ह्यात मिळालेल्या जमिनी येथील गाव गुंडांनी आणि धनदांडग्यांनी कसू दिल्या नाहीत त्या जमीनी दमदाटी करून खरेदी  करून घेतल्या आणि धरणग्रस्तांना येथून हाकलून लावले त्या जमिनीच्या खरेदी रद्द करून त्या जमिनी परत धरणग्रस्तांना देण्यात यावे, मराठवाड्याचा महाकाय बोगदा बेकायदेशीररित्या चालू आहे तात्काळ त्याचं काम थांबावे मराठवाड्यासाठी 21 टीएमसी चेक केलेली तरतूद रद्द करावी या विविध मागण्यांसाठी हे आंदोलन सुरू आहे.आशी माहिती मा.संजय भैया सोनवणे,अध्यक्ष पश्चिम महाराष्ट्र, पीपल्स रिपब्लिकन पार्टी यांनी दिली या वेळी ते म्हणाले की तालुक्याच्या हक्काचे पाणी मिळवल्या शिवाय आम्ही गप्प बसणार नाही,सोनवणे म्हणाले ...

लक्ष्मी वैभव न्युज, शिवसृष्टी न्युज

सद्य परिस्थितीत मराठा समाजाने शांतता आणि संयम पाळावा - प्रा जयश्री गटकुळ इंदापूर:-  महाराष्ट्रात नव्हे तर देशभरात मराठा आरक्षण  विषयांवर  चर्चा सुरू आहे . समाजातील वातावरण दुषित करण्यासाठी काही अवगुणी मंडळी , संघटना व तत्सम इतर काही राजकीय मंडळी  यासाठी कार्यरत आहेत . समाजात संभ्रम व गैरसमज निर्माण  करतात . मराठा आणि इतर समाजात  वाद निर्माण केले जातात, मराठा समाजानेच दबाव आणून पदोन्नती मधील आरक्षण व स्थानिक स्वराज्य संस्था मधील ओबीसी आरक्षण रद्द केले आहे असे गैरसमज पसरवले जात आहेत. ते सामाजिक संबंध बिघडवण्यासाठी वापरले जात आहेत. आपल्या अधिकारांसाठी कायदेशीर लढा देत आपसातील मतभेद समजून घेत सामाजिक बंधुभाव, एकात्मता व शांतता राखावी. मराठा आरक्षण  सर्वोच्च न्यायालयाने स्थगित केलेले आहे मराठा आरक्षण लढा जातीय स्वरुपाचा नाही  तर उलट जातीय सलोखाचा आहे.  सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण स्थगित केले असल्यामुळे राज्यातील सामाजिक वातावरण दुषित झाले आहे .यासाठी काही राजकीय नेत्यांची अनास्था कारणीभूत आहे . मराठा, एससी , एसटी व ओब...

लक्ष्मी वैभव न्युज, शिवसृष्टी न्युज

तालुका स्तरीय विविध शासकीय समित्यांवर काँग्रेसची वर्णी      इंदापूर तालुक्यातील विविध शासकीय समित्या जाहीर झाल्या त्यात इंदापूर तालुका काँग्रेस च्या पधदिकर्यांची नियुक्ती झाल्या त्यांचा सत्कार  तालुका काँग्रेस कमिटी च्या वतीने करण्यात आला. त्यात        संजय गांधी निराधार अनुदान योजना समिती सदस्य पदी सणसर गावचे आबासाहेब बापूराव निंबाळकर व गाघरगाव चे महादेव भगवान लोंढे       सार्वजनिक वितरण व्यवस्था व दक्षता समिती सदस्य पदी काळाशी गावचे विष्णू (काकासाहेब) दिगंबर देवकर व हिंगणगाव चे संतोष व्यंकट अरडे      नगरपालिका पातळीवरील दक्षता समिती सदस्य पदी जाकीर मिरहशम काजी व भगवान आनंत पासगे       प्रार्थमिक शिक्षण सल्लागार समिती सदस्य पदी बनकरवाडीचे निवास सखाराम शेळके       तालुका स्तरीय भ्रष्टाचार निर्मुलन समिती सदस्य पदी इंदापुरचे तुषार तुकाराम चिंचकर     यांची निवड झाली.        काँग्रेस पक्षाच्या कोट्यातून तालुका काँग्रेस कमिटी व जिल्हा अध...

लक्ष्मी वैभव न्युज, शिवसृष्टी न्युज

इंदापूर च्या पाण्यासाठी उजनी धरणासमोरील आंदोलनाचा आजचा 11वा दिवस-संजय सोनवणे   इंदापूर:-तालुक्याच्या हक्काच्या पाण्यासाठी उजनी धरणासमोरील आंदोलनाचा आजचा 11वा दिवस पीपल्स रिपब्लिकन पार्ट च्या वतीने उजनी धरण तरटगाव गेट येथे बेमुदत धरणे आंदोलन सुरू आहे इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना हक्काचे पाणी मिळावे  उजनी धरणग्रस्तांना सोलापूर जिल्ह्यात मिळालेल्या जमिनी येथील गाव गुंडांनी आणि धनदांडग्यांनी कसू दिल्या नाहीत त्या जमीनी दमदाटी करून खरेदी  करून घेतल्या आणि धरणग्रस्तांना येथून हाकलून लावले त्या जमिनीच्या खरेदी रद्द करून त्या जमिनी परत धरणग्रस्तांना देण्यात यावे, मराठवाड्याचा महाकाय बोगदा बेकायदेशीररित्या चालू आहे तात्काळ त्याचं काम थांबावे मराठवाड्यासाठी 21 टीएमसी चेक केलेली तरतूद रद्द करावी या विविध मागण्यांसाठी हे आंदोलन सुरू आहे.आशी माहिती मा.संजय भैया सोनवणे . अध्यक्ष पश्चिम महाराष्ट्र, पीपल्स रिपब्लिकन पार्टी यांनी दिली या वेळी ते म्हणाले की तालुक्याच्या हक्काचे पाणी मिळवल्या शिवाय आम्ही गप्प बसणार नाही,दि. १६/६/२०२१च्या दांडा अंदोलनाला तालुक्यातील गा...

लक्ष्मी वैभव न्युज, शिवसृष्टी न्युज

कर्मयोगी शंकरराव पाटील सह.साखर   कारखान्याचा मिल रोलर पूजन समारंभ संपन्न इंदापूर :-कर्मयोगी शंकररावजी पाटील सह. साखर कारखाना लि. बिजवडी या कारखान्याचा सिझन 2021-22 चा 32 व्या गाळप हंगामाचा मिल रोलर पूजन समारंभ आज दि. 12/6/2021 रोजी सकाळी 11 वाजता कारखान्याचे चेअरमन व राज्याचे माजी सहकार व संसदीय कार्यमंञी हर्षवर्धनजी पाटील  तसेच कारखान्याच्या व्हाईस चेअरमन श्रीमती पद्माताई भोसले, व सर्व संचालक मंडळ यांचे शुभहस्ते कारखाना कार्यस्थळावर नुकतांच संपन्न झाला. या कार्यक्रमास कारखान्याचे कार्यकारी संचालक देवराव लोकरे, सर्व अधिकारी, कर्मचारी यावेळी उपस्थित होते.     कारखान्याचा गाळप हंगाम 2021-22 संपूर्ण क्षमतेसह चालविणेत येणार असून कारखाना कार्यक्षेञातील सर्व नोंद/बिगरनोंद ऊस कारखाना गाळप करणार आहे. सध्या बंद हंगामातील ओव्हरहॉलिंगची सर्व कामे प्रगतीपथावर असून कारखाना पूर्ण गाळप क्षमतेने चालविणेसाठी आवश्यकती सर्व व्यवस्था कारखान्याने केलेली आहे. अशी माहिती कारखान्याचे चेअरमन माजी मंत्री हर्षवर्धन पाटील  यांनी यावेळी दिली.     या कार्यक्रमास अं...

लक्ष्मी वैभव न्युज, शिवसृष्टी न्युज,

निरा भिमा कारखान्याच्या मिल रोलरचे पूजन इंदापूर :-               शहाजीनगर (ता.इंदापूर) येथील निरा भिमा सहकारी साखर कारखान्यामध्ये आगामी गळीत हंगाम सन 2021-22 च्या मिल रोलरचे  पूजन कारखान्याचे संस्थापक व माजी सहकार मंञी हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते आज शनिवारी (दि.12) करण्यात आले.               आगामी गळीत हंगामात नीरा भीमा कारखाना सुमारे 7 लाख मे.टन उसाचे गाळप करणार आहे. आगामी गळीत हंगामाकरिता ऊस लागवड क्षेत्रात वाढ झाली असून कारखान्याकडे  21 हजार 510 एकर ऊस क्षेत्राची नोंद झाली आहे. सध्या कारखान्यामधील मशिनरीची हंगाम पूर्व कामे सुरु आहेत, अशी माहिती कारखान्याचे संस्थापक व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी दिली.          या मिल रोलर पूजन प्रसंगी कारखान्याचे अध्यक्ष लालासाहेब पवार, उपाध्यक्ष कांतिलाल झगडे, विलासराव वाघमोडे, उदयसिंह पाटील, राजवर्धन पाटील, कृष्णाजी यादव, दत्तात्रय शिर्के, दत्तू सवासे, हरिदास घोगरे, प्रतापराव पाटील, दादासो घोगरे, संजय बोडके, प्रकाश मोहिते, मच्...

लक्ष्मी वैभव न्युज, शिवसृष्टी न्युज

बेलवाडीच्या ८० वर्षाच्या आज्जी कोरोणाला हरवून परतल्या..राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी घरी जाऊन केली विचारपूस इंदापूर:-कोरोना काळात रोजच नकारात्मक बातम्या ऐकायला मिळतात. वाढता मृत्युदर यामुळे अनेक तरुण लोकांचेही मृत्यू झाल्याच्या घटना घडत असताना मात्र एकीकडे एक सकारात्मक बातमी पण आहे. बेलवाडीच्या ८० वर्षे वय असणाऱ्या चांगुनाबाई भानुदास जाधव या आजींनी मात्र कोरोनाला हरवले आहे..  बेलवाडीच्या चांगुणा बाई यांना १० मे रोजी कोरोणाची लागण झाली सोबतच त्यांच्या पतीला ही कोरोनची लागण झाली.  अशावेळी त्यांची ऑक्सिजन पातळी खालावली त्यातच त्यांचे वय ८० असल्याने घरातील मंडळी सुद्धा घाबरून गेली. पुढील उपचारासाठी त्यांना ऑक्सिजन बेड ची आवश्यकता होती मात्र कुठेही बेड मिळत नव्हता अशावेळी चांगुणा बाई यांचा मुलगा सुभाष जाधव यांनी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष ॲड शुभम निंबाळकर यांच्याशी संपर्क केला. शुभम निंबाळकर यांनी त्यांना धीर देत निमगाव  केतकी येथील कोविड सेंटर येथे ऑक्सिजन बेड उपलब्ध करून दिला  त्यांनतर त्यांना त्याठिकाणी उपचारासाठी दाखल करण्यात आले त्यावेळी त्यां...

लक्ष्मी वैभव न्युज, शिवसृष्टी न्युज

ना,मोर्चा,ना झेंडा,त्याच झेंडयाचा दांडा, घेवून,१६/०६/२०२१ रोजी इंदापूर तहसिल कार्यलयासमोर दांडा अंदोलन करणार-संजय सोनवणे  इंदापूर  तालुक्याचेे आमदार व राज्यमंत्री तथा  सोलापूर जिल्हाचे पालक मंत्री  दत्तात्रय भरणे यांच्या प्रयत्नातून गेल्या महिन्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या माध्यमातुन ५ टि एम.सी पाणी इंदापूर तालुक्याला देण्याच निर्णय मंजुर झाला होता. तो निर्णय सोलापूर जिल्हयातील लोकप्रतीनिधी व शेतकरी नेते एकत्रीत येवून  शासन निर्णय रद्द  करण्यास शासनास भाग पाडले त्याचा आम्ही जाहीर निषेध करीत आहोत, आशी मागणी संजय भैय्या सोनवणे अध्यक्ष पीपल्स रिपब्लिकन पार्टी पश्चिम महाराष्ट्र यांनी केली आहे, आज पर्यंत इंदापूर तालुक्यातील  जे धरणग्रस्त व प्रकल्पग्रस्त शेतकरी यांना सोलापूर  जिल्हयातील लाभक्षेत्र जमिनीचे वाटप करण्यात आले. त्या जमिनी तेथील मुळ मालकांनी इंदापुर तालुक्यातील शेतक-यांस कसू दिल्या नाहीत. जिवेमारण्याची धमकी देवुन मिळालेल्या जमिनीचे खरेदीखत करून घेतले सोलापूर जिल्हयातील शेतकरी नेत्यांना आव्हान आहे.अधिकारी यांची  इनकॅमेर...

लक्ष्मी वैभव न्युज, शिवसृष्टी न्युज

सराफवाडी येथे बहुजन परिषदेची आढावा बैठक संपन्न,तर बहुजन परिषदेच्या मिडीया प्रमुख पदी दिपक खिलारे इंदापूर :बहुजन परिषदेचे अध्यक्ष बिभीषण लोखंडे यांच्या अध्यक्षतेखाली सराफवाडी ता. इंदापूर याठिकाणी (दि. ११ ) रोजी बहुजन समाजाच्या विकासाकरिता परिषदेची आढावा बैठक पार पडली. बहुजन परिषदेचे उपाध्यक्ष दत्ता बाबर, सरचिटणीस विजय गायकवाड, खजिनदार भगवान पासगे, तालुकाध्यक्ष अनिल मोहिते, तालुका उपाध्यक्ष राजू गायकवाड, संजय कुचेकर, सुनिल आरडे, बिजू मिसाळ, आझाद मुलाणी, सुधीर लोंढे, बाळासो मिसाळ, कायदेशीर सल्लागार अॅड. नारायण ढावरे आदी पदाधिकारी या बैठकीस उपस्थित होते. बहुजन समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी एक कृती आराखडा तयार करण्यात आला. यामध्ये तालुक्यामधील सर्व गावातून समाज बांधवांची जनगणना करणे व त्यांचे वर्गीकरण करणे, त्यांच्या अडी-अडचणी जाणून घेणे व त्या सोडविण्याचा प्रयत्न करणे, बहुजन समाजातील नव युवक-युवतींकरीता रोजगार निर्मिती करणे, तालुक्यातील प्रत्येक गावोवावी परिषदेची शाखा स्थापन करुन संघटनात्मक बांधणी करणे, लोकशाहिर अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी जयंती वर्षानिमित्त विविध  क...

लक्ष्मी वैभव न्युज, शिवसृष्टी न्युज

पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने संजय भैय्या सोनवणे यांच्या अंदोलनाचा १०वा दिवस इंदापूर:-आंदोलनाचा आजचा १० वा दिवस पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने उजनी धरण तरटगाव गेट येथे बेमुदत धरणे आंदोलन संजय भैय्या सोनवणे यांनी सुरू केले आहे इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना हक्काचे पाणी मिळावे  उजनी धरणग्रस्तांना सोलापूर जिल्ह्यात मिळालेल्या जमिनी येथील गाव गुंडांनी आणि धनदांडग्यांनी कसू दिल्या नाहीत त्या जमीनी दमदाटी करून खरेदी  करून घेतल्या आणि धरणग्रस्तांना येथून हाकलून लावले त्या जमिनीच्या खरेदी रद्द करून त्या जमिनी परत धरणग्रस्तांना देण्यात यावे, मराठवाड्याचा महाकाय बोगदा बेकायदेशीररित्या चालू आहे तात्काळ त्याचं काम थांबावे मराठवाड्यासाठी 21 टीएमसी चेक केलेली तरतूद रद्द करावी या विविध मागण्यांसाठी हे आंदोलन संजय भैया सोनवणे ,अध्यक्ष पश्चिम महाराष्ट्र पीपल्स रिपब्लिकन पार्टी यांच्या आंदोलनाचा आज १०वा दिवस आहे, आसेही संजय भैय्या सोनवणे म्हणाले,