काळूस:- दिनांक २७/६/२१ रोजी काळूस ता.खेड जि.पुणे या ठिकाणी काळूस च्या सरपंच सौ.धनश्री पवळे पाटील आणि मा. सौ पल्लवी रोहिदास पवळे यांच्या प्रयत्नातून आणि सहकार्यातून काळुस येथे Absulute skin clinic यांच्या मार्फत त्वचा व केसांच्या समस्या बाबत मोफत तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते,१००पेशंट ची मोफत त्वचा व केसांची मोफत तपासणी करण्यात आली आसल्याची माहिती डाॅ.सौ.धनश्री कळमकर पाटील यांनी दिली, या वेळी त्या म्हणाल्या की ग्रामीण भागातील तळागाळातील गोरगरिबांसाठी आम्ही आशा शिबिराचे आयोजन करत आसतो, या मध्ये महिला मध्ये मोठ्या प्रमाणावर त्वचेच्या व केस गळती या समश्या आढळतात, त्यांना वैद्यकीय सल्ला मिळत नसल्याने अनेकांना त्वाचारोग सारख्या आजाराचे विनाकारण बळी पडावे लागते, आसेही डाॅ.कळमकर म्हणाल्या, या कार्यक्रमात पुढे बोलताना,सरपंच सौ.धनश्री पवळे पाटील म्हणाले की सध्या ग्रामीण भागातील जनतेसाठी आसे विवीध उपक्रम राबविण्यात साठी आम्ही सर्व प्रकारचे सहकार्य करणार आहोत ,जास्तीत जास्त लोकांनी या उपक्रमात सहभागी होऊन सहकार्याची भावना व्यक्त केली त्या बद्दल आभारी आहोत, नेहमीच सामाजिक कार्यात आग्रेसर आसणारे Dr. धनश्री कळमकर पाटीलआणि टीम Absolute SKIN and HAIR CLINIC यांनी केलेला हा उपक्रम फार स्तुत्यच आसल्याचे मत,सरपंच पवळे म्हणाल्या, आसे कार्यक्रम आयोजित करता म्हणून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या, या वेळी हा कार्यक्रम यशस्वी करण्यात, सरपंच/उपसरपंच/ग्रामपंचायत सदस्य तसेच ग्रामपंचायत चे कर्मचारी याचं खूप मोलाचं सहकार्य लाभले,या वेळी श्री.रोहीदास(आबा ) पवळे पाटील (उद्योगपती) आणि गणेशशेठ पवळे पाटील (मा.सरपंच काळूस)हे उपस्थित होते.
,हा कार्यक्रम शोशल डिस्टन्स ठेवून, सॅनिटायझर व मास्कचा वापर करून पार पडला.
टिप्पण्या