प्रविण भैय्या माने यांच्या वाढदिवसा निमित्त
सफाई महिला कर्मचा-यांना साड्यांचे वाटप-दादासाहेब सोनवणे
इंदापूर :- येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठेनगर येथील माजी नगराध्यक्ष कै. अरुणरावजी ढावरे सभागृह येथे जिल्हा परिषदेचे मा. बांधकाम व आरोग्य सभापती प्रविणभैया माने यांच्या ३५ व्या वाढदिवसाच्या निमित्ताने इंदापुर नगरपरिषदेतील घनकचरा व्यवस्थापनातील कंत्राटी काम करणा-या सफाई महिला कर्मचा-यांना साड्यांचे वाटप करून सुमारे ३८ महिलांचा सन्मान करण्यात आला.
सुरुवातीला राजमाता जिजाऊ यांच्या पुण्यतिथी निमित्त प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला.
जागतिक महामारी कोरोना व लाॅकडाऊन काळामध्ये या महिलांनी कुटुंबाचे व आपले आरोग्य धोक्यात घालून शहराचे आरोग्य अबाधित राखले. याची सामाजिक जाणीव ठेवून. प्रविणभैया माने मिञ परिवाराच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी स्थानिक मा.नगरसेवक दादासाहेब सोनवणे यांनी विशेष परिश्रम घेतले. प्रमुख मान्यवर उद्योगपती मा. अतुलदादा माने यांचा सत्कार मा. नगरसेवक दादासाहेब सोनवणे यांच्या हस्ते करण्यातआला. तसेच सर्व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते नगरपरिषदेतील घनकचरा महिला कर्मचारी माता-भगिनींना साड्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी इंदापुर नगरपरिषदेच्या कार्यक्षम नगरसेविका सौ. राजश्री अशोक मखरे, आरोग्य सभापती अनिकेत वाघ, सामाजिक कार्यकर्ते सतिश सागर यांनी मनोगत व्यक्त करून शुभेच्छा दिल्या.तसेच इंदापुर नगरपरिषद आरोग्य विभागाचे मुकादम मा. बापू मखरे, दत्तात्रय ढावरे,मोहन शिंदे, यांचा सत्कार सर्व मातंग समाजाच्या वतीने करण्यात आला..या प्रसंगी नगरसेविका राजश्री अशोक मखरे ,नगरसेवकआरोग्य सभापती, अनिकेत वाघ,मा.नगरसेवक दादासाहेब सोनवणे, दिलीप शिंदे, गौरव पवार,बाळासाहेब आडसुळ,चंदू सोनवणे, मयुर ढावरे, सतिश सागर,उमेश ढावरे, राजू गुळीक, वसिम बागवान,अंकुश दोरकर,नंदू खंडाळे, ज्ञानेश्वर सोनवणे,रणजित ढावरे, बापू आडसुळ, राहूल ढावरे, मुकिंद शिंदे,मुरलीधर सोनवणे,लकी सागर, सागर सोनवणे, सोमनाथ ढावरे,अनिल गोरे,समीर सोनवणे, छगन बनसोडे, ,साधू नरूटे,किरण आखाडे, देविदास लावंड, रोहित गेंड, साधू नरुटे, अक्षय कोकाटे, प्रविण निगडे सर्व समाज बांधव उपस्थित होते..कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुञसंचालन, आभार प्रदर्शन सतिशभाऊ सागर यांनी केले...
टिप्पण्या