इंदापूर: थोर समाज सुधारक, प्राथमिक शिक्षण, जातिभेद निवारण, अस्पृश्यता निवारण इत्यादी सुधारणाचे पुरस्कर्ते छत्रपती शाहू महाराज यांना 147 व्या जयंतीनिमित्त माजी मंत्री व भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून इंदापूर येथे शनिवारी (दि. 26) अभिवादन केले.
सामाजिक परिवर्तनात राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे मोठे योगदान आहे, असे गौरवोद्गार हर्षवर्धन पाटील यांनी काढले.
यावेळी नगरसेवक कैलास कदम, शकीलभाई सय्यद, संजय सानप, ललेंद्र शिंदे, संतोष देवकर, शिवाजी शिंदे , धनंजय पाटील, शेखर पाटील ,बापू जामदार, नाना जौंजाळ, सचिन जामदार, संदीप चव्हाण, प्रदीप जामदार व कार्यकर्ते उपस्थित होते.
____________________________
टिप्पण्या