इंदापूर :-
शहाजीनगर (ता.इंदापूर) येथील निरा भिमा सहकारी साखर कारखान्यामध्ये आगामी गळीत हंगाम सन 2021-22 च्या मिल रोलरचे पूजन कारखान्याचे संस्थापक व माजी सहकार मंञी हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते आज शनिवारी (दि.12) करण्यात आले.
आगामी गळीत हंगामात नीरा भीमा कारखाना सुमारे 7 लाख मे.टन उसाचे गाळप करणार आहे. आगामी गळीत हंगामाकरिता ऊस लागवड क्षेत्रात वाढ झाली असून कारखान्याकडे 21 हजार 510 एकर ऊस क्षेत्राची नोंद झाली आहे. सध्या कारखान्यामधील मशिनरीची हंगाम पूर्व कामे सुरु आहेत, अशी माहिती कारखान्याचे संस्थापक व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी दिली.
या मिल रोलर पूजन प्रसंगी कारखान्याचे अध्यक्ष लालासाहेब पवार, उपाध्यक्ष कांतिलाल झगडे, विलासराव वाघमोडे, उदयसिंह पाटील, राजवर्धन पाटील, कृष्णाजी यादव, दत्तात्रय शिर्के, दत्तू सवासे, हरिदास घोगरे, प्रतापराव पाटील, दादासो घोगरे, संजय बोडके, प्रकाश मोहिते, मच्छिंद्र वीर, बबनराव देवकर, भागवत गोरे, चंद्रकांत भोसले, सुभाष पोळ, जबीन जमादार, राजकुमार जाधव, तानाजीराव नाईक, श्रीनिवास कोरटकर, कार्यकारी संचालक डी.एन.मरकड, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
_______________________________
टिप्पण्या