इंदापूर :शहाजीनगर येथील नीरा भीमा सहकारी साखर कारखान्याच्या कर्मचाऱ्यांना सापडलेली रोख रक्कम रु.3000 व कागदपत्रे ही संबंधित व्यक्तीकडे सुपूर्त करण्यात केली. या प्रामाणिकपणाबद्दल कारखान्याचे कार्यकारी संचालक डी.एन.मरकड यांनी संतोष शिंदे व सदाशिव बरकडे या कर्मचाऱ्यांचा गुरुवारी (दि.24) सत्कार करून कौतुक केले.
कारखान्याचे कर्मचारी संतोष शिंदे व सदाशिव बरकडे हे दि.21 जून रोजी कामानिमित्त इंदापुर अर्बन बँकेत गेले होते. तेथून बाहेर आलेवर त्यांना बँकेसमोर प्लॅस्टिकच्या कॅरी बॅगमध्ये रू. 3 हजार व काही कागदपत्रे सापडली. त्यानंतर संतोष शिंदे व सदाशिव बरकडे यांनी कागदपत्रातील नावावरून दूरध्वनीवरून संपर्क साधून मोहन नारायण पवार (रा. कौठळी ता. इंदापूर ) यांना कारखान्यावरती बोलावून सदरची रक्कम व कागदपत्रे प्रामाणिकपणे परत केली. या प्रामाणिकपणाबद्दल संतोष शिंदे व सदाशिव बरकडे यांचे कारखान्याचे संस्थापक व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, अध्यक्ष लालासाहेब पवार, उपाध्यक्ष कांतीलाल झगडे, संचालक राजवर्धन पाटील, जिल्हा परिषद सदस्या अंकिता पाटील व संचालक मंडळाने कौतुक केले.
_________________________
टिप्पण्या