इंदापूर:- महाराष्ट्रात नव्हे तर देशभरात मराठा आरक्षण विषयांवर चर्चा सुरू आहे . समाजातील वातावरण दुषित करण्यासाठी काही अवगुणी मंडळी , संघटना व तत्सम इतर काही राजकीय मंडळी यासाठी कार्यरत आहेत . समाजात संभ्रम व गैरसमज निर्माण करतात . मराठा आणि इतर समाजात वाद निर्माण केले जातात, मराठा समाजानेच दबाव आणून पदोन्नती मधील आरक्षण व स्थानिक स्वराज्य संस्था मधील ओबीसी आरक्षण रद्द केले आहे असे गैरसमज पसरवले जात आहेत. ते सामाजिक संबंध बिघडवण्यासाठी वापरले जात आहेत. आपल्या अधिकारांसाठी कायदेशीर लढा देत आपसातील मतभेद समजून घेत सामाजिक बंधुभाव, एकात्मता व शांतता राखावी. मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने स्थगित केलेले आहे मराठा आरक्षण लढा जातीय स्वरुपाचा नाही तर उलट जातीय सलोखाचा आहे.
सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण स्थगित केले असल्यामुळे राज्यातील सामाजिक वातावरण दुषित झाले आहे .यासाठी काही राजकीय नेत्यांची अनास्था कारणीभूत आहे . मराठा, एससी , एसटी व ओबीसी वर्गात आपसात भांडणे लावण्याचा प्रयत्न काही राजकीय नेते करत आहेत. मराठा समाजातील युवकांनी मानसिकता बदलू न देता सामंजस्याची भूमिका घेत बंधुभाव, एकात्मता यांचा आदर करुन शांतता आणि संयम बाळगून कायदेशीर मार्गाने लढा देत सहकार्य करावे हे नम्र आवाहन पुणे जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने करत आहे.
छत्रपती संभाजी राजे यांनी केलेल्या आवाहन नुसार कोल्हापूर, नाशिक, संभाजीनगर, रायगड आणि अमरावती या ठिकाणाहून दिनांक 16 जून 2021 पासून मुकआंदोलन करण्यात येईल, कोरोना सारख्या जागतिक महामारीच्या काळात लोक कोरोनाशी लढत आहेत जीवन-मरणाचा प्रश्न समोर उभा आहे अशा सद्य परिस्थितीचा विचार करून शासनाने मराठा आरक्षणचा निर्णय घेऊन मराठा समाजाबाबत सकारात्मक भूमिका घ्यावी
टिप्पण्या