इंदापूर:-तालुक्याच्या हक्काच्या पाण्यासाठी उजनी धरणासमोरील आंदोलनाचा आजचा 11वा दिवस पीपल्स रिपब्लिकन पार्ट च्या वतीने उजनी धरण तरटगाव गेट येथे बेमुदत धरणे आंदोलन सुरू आहे इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना हक्काचे पाणी मिळावे उजनी धरणग्रस्तांना सोलापूर जिल्ह्यात मिळालेल्या जमिनी येथील गाव गुंडांनी आणि धनदांडग्यांनी कसू दिल्या नाहीत त्या जमीनी दमदाटी करून खरेदी करून घेतल्या आणि धरणग्रस्तांना येथून हाकलून लावले त्या जमिनीच्या खरेदी रद्द करून त्या जमिनी परत धरणग्रस्तांना देण्यात यावे, मराठवाड्याचा महाकाय बोगदा बेकायदेशीररित्या चालू आहे तात्काळ त्याचं काम थांबावे मराठवाड्यासाठी 21 टीएमसी चेक केलेली तरतूद रद्द करावी या विविध मागण्यांसाठी हे आंदोलन सुरू आहे.आशी माहिती मा.संजय भैया सोनवणे,अध्यक्ष पश्चिम महाराष्ट्र, पीपल्स रिपब्लिकन पार्टी यांनी दिली या वेळी ते म्हणाले की तालुक्याच्या हक्काचे पाणी मिळवल्या शिवाय आम्ही गप्प बसणार नाही,सोनवणे म्हणाले की प्रशासनातील मुर्दाड अधिकारी मुग गिळून गप्प का बसतात,पाणी आमच्या हक्काचे आसून प्रशासन दिसून आंधळे आसल्याचे सोंग घेऊन गप्प का?आसे ही सोनवणे म्हणाले, दि. १६/६/२०२१च्या दांडा अंदोलनाला तालुक्यातील गावागातील शर्व शेतक-यांनी एकजूट दाखवून घरूनच दांडा घेऊन यावे आसे आवाहन संजय भैय्या सोनवणे यांनी केले आहे, हा कार्यक्रम शोशल डिस्टन्स ठेवून ,सॅनिटायझर व मास्कचा वापर करून पाडणार आहे.
- प्रतापराव भोसले यांना वाहिली श्रद्धांजली इंदापूर : प्रतिनिधी दि.19/5/24 ज्येष्ठ नेते आदरणीय प्रतापराव भोसले उर्फ भाऊ आमचे मार्गदर्शक होते. प्रचंड बुद्धिमत्तेची देणगी लाभलेले हे व्यक्तिमत्व होते. सध्याच्या संगणकीय युगात नव्या पिढीचा विश्वास बसणार नाही, एवढी अदभूत स्मरणशक्ती भाऊंजवळ होती. त्यांच्या निधनामुळे राज्याच्या राजकारणातील सुसंस्कृत, स्वाभिमानी व अतिशय तल्लख बुद्धिमत्तेचे रत्न हरपले आहे, या शब्दात राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष, भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली. राज्याचे जेष्ठ नेते, सातारा मतदारसंघाचे 3 वेळा खासदार राहिलेले, वाई मतदार संघाचे 4 वेळा आमदार असलेले माजी मंत्री, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे माजी अध्यक्ष प्रतापराव भोसले (वय -90) यांचे वृद्धपकाळाने भुईंज निवासस्थानी रविवारी (दि.19) निधन झाले. त्यांच्या निधनाने अनेक आठवणींना उजाळा देत हर्षवर्धन पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली. ...
टिप्पण्या