इंदापूर:-चिंदादेवी सुगाव रस्ता डांबरी करण करा कारण सध्या पिंपरी गावातुन रस्ता आहे.परंतु पिंपरी गावातुन आम्हाला वाहतुक करावी लागतं असलेने “गावातील लहान मुले, जनावरे, उकारंडे,कोंबड्या रस्त्यावर येऊन अनेकदा अपघात झाले आहेत.तसेच महीला वर्ग ही रस्त्यावर धुणे,भांडी करत असतात तसे-अनेक ठिकाणी भिंती कॉर्नरवर उभ्या केल्या असल्याने अपघात होत आहेत .व भविष्यात ही अपघात होण्याची शक्याता आहे. आमच्या सुगाव-अगोती पिंपरी असा शिव रस्ता खडीकरण केलेला आहे, परंतु गावातून फिरणं अवघड आहे, तरी आम्हाला ३ कि मी डांबरी करुन रस्ता करुन (सुगांव ते चिंदादेवी ) मिळावा या आशयाचे निवेदन रमेश तात्या पाटील यांनी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या कडे दिले आहे, या निवेदना वर अनेक गावक-यांच्या सह्या आहेत,
- प्रतापराव भोसले यांना वाहिली श्रद्धांजली इंदापूर : प्रतिनिधी दि.19/5/24 ज्येष्ठ नेते आदरणीय प्रतापराव भोसले उर्फ भाऊ आमचे मार्गदर्शक होते. प्रचंड बुद्धिमत्तेची देणगी लाभलेले हे व्यक्तिमत्व होते. सध्याच्या संगणकीय युगात नव्या पिढीचा विश्वास बसणार नाही, एवढी अदभूत स्मरणशक्ती भाऊंजवळ होती. त्यांच्या निधनामुळे राज्याच्या राजकारणातील सुसंस्कृत, स्वाभिमानी व अतिशय तल्लख बुद्धिमत्तेचे रत्न हरपले आहे, या शब्दात राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष, भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली. राज्याचे जेष्ठ नेते, सातारा मतदारसंघाचे 3 वेळा खासदार राहिलेले, वाई मतदार संघाचे 4 वेळा आमदार असलेले माजी मंत्री, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे माजी अध्यक्ष प्रतापराव भोसले (वय -90) यांचे वृद्धपकाळाने भुईंज निवासस्थानी रविवारी (दि.19) निधन झाले. त्यांच्या निधनाने अनेक आठवणींना उजाळा देत हर्षवर्धन पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली. ...
टिप्पण्या