इंदापूर:-कोरोना काळात रोजच नकारात्मक बातम्या ऐकायला मिळतात. वाढता मृत्युदर यामुळे अनेक तरुण लोकांचेही मृत्यू झाल्याच्या घटना घडत असताना मात्र एकीकडे एक सकारात्मक बातमी पण आहे. बेलवाडीच्या ८० वर्षे वय असणाऱ्या चांगुनाबाई भानुदास जाधव या आजींनी मात्र कोरोनाला हरवले आहे..
बेलवाडीच्या चांगुणा बाई यांना १० मे रोजी कोरोणाची लागण झाली सोबतच त्यांच्या पतीला ही कोरोनची लागण झाली. अशावेळी त्यांची ऑक्सिजन पातळी खालावली त्यातच त्यांचे वय ८० असल्याने घरातील मंडळी सुद्धा घाबरून गेली. पुढील उपचारासाठी त्यांना ऑक्सिजन बेड ची आवश्यकता होती मात्र कुठेही बेड मिळत नव्हता अशावेळी चांगुणा बाई यांचा मुलगा सुभाष जाधव यांनी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष ॲड शुभम निंबाळकर यांच्याशी संपर्क केला. शुभम निंबाळकर यांनी त्यांना धीर देत निमगाव केतकी येथील कोविड सेंटर येथे ऑक्सिजन बेड उपलब्ध करून दिला त्यांनतर त्यांना त्याठिकाणी उपचारासाठी दाखल करण्यात आले त्यावेळी त्यांची रक्तातील ऑक्सिजन पातळी ही ७० चा खाली आली होती व वय जास्त असल्यामुळे त्यांची प्रकृती चिंताजनक होती मात्र त्यांच्यावर वेळेत उपचार सुरू झाले, चांगुणाबाई उपचाराला चांगला प्रतिसाद देऊ लागल्या यामुळे त्यांना व्हेंटिलेटर बेडची आवश्यकता पडली नाही आणि चांगुणाबाई या ८० वर्ष वय असताना देखील १२ दिवसाच्या उपचारांनंतर कोरोनाला हरवुन परतल्या आहेत.आता चांगुणाबाई या ठणठणीत असून अधिकची काळजी म्हणून त्यांना घरीच विलगिकरण करून त्यांची योग्य ती काळजी घेतली जात आहे. य प्रसंगी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी घरी जाऊन प्रकृतीची विचारपूस केली व घरातील व्यक्तींना मास्क व सॅनिटायझर वापरण्याचे आवाहन केले
टिप्पण्या