इंदापूर तालुक्याचेे आमदार व राज्यमंत्री तथा
सोलापूर जिल्हाचे पालक मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या प्रयत्नातून गेल्या महिन्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या माध्यमातुन ५ टि एम.सी पाणी इंदापूर तालुक्याला देण्याच निर्णय मंजुर झाला होता. तो निर्णय सोलापूर जिल्हयातील लोकप्रतीनिधी व शेतकरी नेते एकत्रीत येवून शासन निर्णय रद्द करण्यास शासनास भाग पाडले त्याचा आम्ही जाहीर निषेध करीत आहोत, आशी मागणी संजय भैय्या सोनवणे अध्यक्ष पीपल्स रिपब्लिकन पार्टी पश्चिम महाराष्ट्र यांनी केली आहे, आज पर्यंत इंदापूर तालुक्यातील जे धरणग्रस्त व प्रकल्पग्रस्त शेतकरी यांना सोलापूर जिल्हयातील लाभक्षेत्र जमिनीचे वाटप करण्यात आले. त्या जमिनी तेथील मुळ मालकांनी इंदापुर तालुक्यातील शेतक-यांस कसू दिल्या नाहीत. जिवेमारण्याची धमकी देवुन मिळालेल्या जमिनीचे खरेदीखत करून घेतले सोलापूर जिल्हयातील शेतकरी नेत्यांना आव्हान आहे.अधिकारी यांची इनकॅमेरा नार्कोटेस्ट करून घ्या,आमची कशी फसवणूक झाली हे समजेल व त्याचे उत्तर आता जे शेतकरी नेते. इंदापूर, तहसिलकचेरी समोर आमच्या हक्काचे पाणी आम्ही इंदापूर तालुक्यातील २२ गावाच्या पाणी मिळवुन देवू हे नाटक करीत आहेत. ही नौटंकी आम्ही चालू देणार नाही व महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटनेचे १६ जून रोजी होत असले बेमुदत धरणे आंदोलन उधळून लावणार आहोत. दांडा अंदोलनात पिपल्स रिपब्लिकन पक्षाचे सर्व पदाधीकारी व भिमसैनिक सामिल होणार आहेत. आमच्या हक्काची शेती हिसकावून घेणा-यास आम्ही इंदापूर तालुक्यामध्ये पाय ठेवू देणार नाही व अंदोलन करूदेणार नाही. माझ्या तालूक्यातील शेतकरी यांच्या साठी आम्ही सक्षम आहेत व आमच्या हक्काची भाकरी आम्ही आमच्या ताकदीवर मिळवणारच आहे. आमची सहनशिलता संपली आहे. आता मोर्चा नाही, आता झेंडा नाही, आत्ता त्याच झेंडयाचा दांडा हातात घेवून या! शेतकरी नेत्यांना त्याचा जाब विचारणार आहोत शेतकरी नेते आसाल तर लाभक्षेत्रातील जमीन जप्तीचे गैडबगाल काय आहे? आसेही संजय भैय्या सोनवणे म्हणाले, या निवेदनाच्या प्रती माहिती साठी वरीष्ठ स्तरांवर पाठवण्यात आल्या आहेत, प्रत्येक शेतक-यांनी आंदोलनात सहभागी होण्यासाठी घरातून च दांडा घेऊन निघावे, आसे आवाहन संजय सोनवणे यांनी केले आहे
टिप्पण्या