इंदापूर:- संगीत शिक्षिका राधा खुडे हिने कलर्स मराठी वरील सुर नवा ध्यास नवा आशा उद्याची या कार्यक्रमाच्या महिला विशेष पर्वात तृतीय क्रमांकाने विजेती होण्याचा बहुमान पटकावल्या बदल तीचा सत्कार करण्यात आला, देशपांडे व्हेज चे उदय देशपांडे व किरण गानबोटे म्हणाले की .राधा खुडे हिने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत संगीताचे शिक्षण घेतले
व लाखेवाडी येथील विद्यानिकेतन स्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये संगीत शिक्षिका म्हणून ती रुजू झाली व प्रशालेतील मुला-मुलींना त्यांनी खूप चांगल्या प्रकारे संगीताचे गायनाचे शिक्षण दिले संगीताचे शिक्षण देत असताना स्वतः देखील संगीताची व गायनाची आवड जोपासून कलर्स मराठी वरील सुर नवा ध्यास नवा अशा उद्याची या कार्यक्रमात पाच हजार स्पर्धकातू न प्रथम तीन स्पर्धकात येण्याचा बहुमान मिळवला याच तिच्या कार्याचा गौरव करण्यासाठी देशपांडे व्हेज इंदापुर च्या वतीने कु राधा खूडे व तिच्या आई वडलांचा सत्कार करण्यात आला या वेली देशपांडे व्हेज च्या वतीने १११११रू धनादेश देण्यात अपर्णा देशपांडे यांचे हस्ते देण्यात आला आला यावेली राधा ने रंग रंग हलगी वाजती गाणे गाउन वातावरण भाराऊन टाकले या वेली पत्रकार अमोल राजपूत,महेश स्वामी, प्रशांत दूनाखे, साबळे भाऊसाहेब, अविनाश मखरे, किरण गाणबोटे, उदय देशपांडे. उपस्थित होते
टिप्पण्या