तेजप्रुथ्वी ग्रुप च्या वतीने,सुर नवा ध्यास नवा,ची उपविजेती राधा खुडे चा सन्मान
इंदापुरः येथे तेजप्रुथ्वी ग्रुप च्या वतीने इदांपुर तालुक्याची शान ,सुर नवा ध्यास नवा ,या कार्यक्रमाची उपविजेती कु.राधा दत्तु खुडे यांचा सत्कार तेजप्रुथ्वी ग्रुपच्या अनिताताई नानासाहेब खरात यांच्या हस्ते फेटा बाधुंन व शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन केला, तसेच त्यांच्या पालकांनी हालाकिच्या परिस्थितीत ही राधाला पुढे नेले तिच्या अपेक्षा प्रमाणे तीला शिकण्याची संधी उपलब्ध करून दिली, या गोष्टी चा आदर्शवत पालकांनी घ्यावा असे सागुंन राधास भावी वाटचालीस अनिताताई खरात यांनी शुभेच्छा दिल्या, त्या वेळेस येथून पुढे राधा ला स्पर्धेला बाहेर कोठे ही जायचे असेल तरी त्याचा सर्व खर्च तेजप्रुथ्वी ग्रुप करेल असे नानासाहेब खरात यांनी जाहीर केले तसेच या वेळी तेजप्रुथ्वी ग्रुप तर्फे सन्मान पत्र देऊन खुडे यांचा सन्मान करण्यात आला या वेळी तेजप्रुथ्वी ग्रुप चे उपाध्यक्ष गणेश भाऊ शिंगाडे, महेश शिंदे,मनिषा हरणावळ, अनिता ताटे ,संपत पुणेकर, पुणे जिल्हा सोशल मिडीया अध्यक्ष रूपेश वाघमोडे, तसेच राधाचे आई वडील ऊपस्थित होते.
SHIVSRUSTHI NEWS
टिप्पण्या